Posts

Showing posts from September, 2020

मिरची वरील रोग व्यवस्थापन

Image
  मिरची वरील रोग व्यवस्थापन Agrojay Innovations Pvt.  Ltd. (Download    Agrojay     Mobile Application:    http://bit.ly/Agrojay ) भाजीपाल्याचे जास्तीत जास्त उत्पादन काढण्याच्या दृष्टीने नुसत्या उत्कृष्ट जाती, योग्य सेंद्रिय व रासायनिक खाते आणि लागवडीच्या सुधारलेल्या पद्धती वापरून चालणार नाही. त्याचबरोबर या पिकावर पडणार्‍या रोग आणि किडींचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.   शाकाहारी लोकांच्या आहारात अन्नधान्याच्या खालोखाल भाजीपाल्याचे महत्व आहे. भाजीपाल्यात कॅल्शिअम, फॉसफरस आणि लोह ही खनिजद्रव्ये विपुल प्रमाणात असतात व शरीराचे योग्य वाढ होण्यासाठी सदर द्रव्याची गरज असते. भाजीपाल्यातून अ आणि क जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात मिळतात. त्यामुळे आहारात भाजीपाल्यास महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे शेतकरी व्यापारी तत्वावर भाजीपाला लागवडीकडे वळला आहे.   भाजीपाल्याचे जास्तीत जास्त उत्पादन काढण्याच्या दृष्टीने नुसत्या उत्कृष्ट जाती, योग्य सेंद्रिय व रासायनिक खाते आणि लागवडीच्या सुधारलेल्या पद्धती वापरून चालणार नाही. त्याचबरोबर या पिकावर पडणार्‍या रोग आणि किडींचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. भाजीपाला लावताना प्रमुख

नाचणीचे आहारातील महत्त्व आणि मूल्यवर्धित उत्पादने

Image
  नाचणीचे आहारातील महत्त्व आणि मूल्यवर्धित उत्पादने Agrojay Innovations Pvt.  Ltd. (Download    Agrojay     Mobile Application:    http://bit.ly/Agrojay ) नाचणी धान्यामध्ये असणार्या सत्त्वयुक्त अन्नघटकांचा विचार करता मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याच्या पद्धतीचा सखोल माहितीचा समावेश या लेखात केला आहे.   आहाराच्या दृष्टीने नाचणी एक अत्यंत महत्त्वाचे तृणधान्य पीक आहे. नाचणीमध्ये असणार्या पौष्टिक घटकांचा विचार करता या धान्यास तत्सम तृणधान्य न संबोधता सत्वयुक्त धान्य संबोधले जाते. सध्या प्रचलित असणारी महत्त्वाची तृणधान्ये म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी, भात, मका सर्वसामान्य माणसाच्या आहारात वापरली जातात. नाचणी धान्यामध्ये चांगल्या प्रतीचे पोषक तंतुमय भाग असल्याने बद्धकोष्ठता होत नाही. त्याचप्रमाणे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होऊन पचनक्रियेवेळी ग्लुकोज शर्करा हळूहळू रक्तप्रवाहात मिसळली जाते. नियमित नाचणी सेवन करणार्या लोकांमध्ये हृदयरोग, आतड्यावरील व्रण आणि मधुमेहाचे प्रमाण कमी असल्याचे आढळून येते.   सध्या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि आहारातील अनियमिततेमुळे माणसांना निरनिराळ्या आजाराने ग्रासल

सीताफळ प्रक्रियेसाठीच्या संधी

Image
  सीताफळ प्रक्रियेसाठीच्या संधी Agrojay Innovations Pvt.  Ltd. (Download    Agrojay     Mobile Application:    http://bit.ly/Agrojay ) हंगामात भरपूर सीताफळांचे उत्पादन होते त्या वेळी त्यांचे दर कोसळतात व उत्पादकांचे नुकसान होते. अशावेळी आपण फळांच्या गरापासून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून ठेवल्यास बाजारातील फळांचे दर स्थिर राखण्यास मदत होऊन आर्थिक फायदाही होतो. त्याचबरोबर फळांचा आस्वाद आपणास वर्षभर घेता येईल.   सीताफळ हे उष्ण, तसेच समशितोष्ण व कोरड्या हवामानाच्या प्रदेशात चांगले वाढणारे झाड आहे. हे फळ झाड जमिनीच्या बाबतीत फार चोखंदळ नाही. या फळ झाडास कोणताही प्राणी खाण्यास धजवत नाही, तसेच हानिकारक किडी व रोग या झाडावर दिसून येत नाहीत. म्हणून या झाडाची विशेष अशी काळजी न घेतादेखील चांगले उत्पादन मिळते. म्हणून या झाडाच्या लागवडीकडे शेतकरी वळू लागले आहेत. हे झाड आकाराने छोटे असते व उभट वाढणारे असल्याने प्रतिहेक्टरी झाडांची संख्या जास्त बसते. त्यामुळे प्रतिहेक्टरी उत्पादन चांगले मिळते. या झाडास पाणीदेखील फार कमी लागते. कमी पावसाच्या प्रदेशात याच्या लागवडीस चांगला वाव आहे.    सीताफळाच्या पा