मिरची वरील रोग व्यवस्थापन
मिरची वरील रोग व्यवस्थापन
Agrojay Innovations Pvt. Ltd.
भाजीपाल्याचे जास्तीत जास्त उत्पादन काढण्याच्या दृष्टीने नुसत्या उत्कृष्ट जाती, योग्य सेंद्रिय व रासायनिक खाते आणि लागवडीच्या सुधारलेल्या पद्धती वापरून चालणार नाही. त्याचबरोबर या पिकावर पडणार्या रोग आणि किडींचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.
शाकाहारी लोकांच्या आहारात अन्नधान्याच्या खालोखाल भाजीपाल्याचे महत्व आहे. भाजीपाल्यात कॅल्शिअम, फॉसफरस आणि लोह ही खनिजद्रव्ये विपुल प्रमाणात असतात व शरीराचे योग्य वाढ होण्यासाठी सदर द्रव्याची गरज असते. भाजीपाल्यातून अ आणि क जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात मिळतात. त्यामुळे आहारात भाजीपाल्यास महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे शेतकरी व्यापारी तत्वावर भाजीपाला लागवडीकडे वळला आहे.
भाजीपाल्याचे जास्तीत जास्त उत्पादन काढण्याच्या दृष्टीने नुसत्या उत्कृष्ट जाती, योग्य सेंद्रिय व रासायनिक खाते आणि लागवडीच्या सुधारलेल्या पद्धती वापरून चालणार नाही. त्याचबरोबर या पिकावर पडणार्या रोग आणि किडींचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. भाजीपाला लावताना प्रमुख भाजीपाल्याची पिके म्हणून मिरची, वांगी, टोमॅटो, भेंडी, कांदा, वेलवर्गीय पालेभाज्या, फलभाज्या आणि गवार याकडे मुख्यत्वेकरून लक्ष द्यावे लागेल.
भाजीपाल्याची रोपे लागवडीपूर्वी तयार करावी लागतात आणि तेव्हा रोपे कोलमडणे या रोगाचा प्रादुर्भाव रोपवाटिकेत हमखास जाणवतो.यामुळे भाजीपाल्याचे पीक उत्तम येण्यासाठी बियाणे, रोपवाटिका यांची काळजी घेणे महत्वाचे आहे.
निरोगी बियाण्याची निवड :
भाजीपाला पिकात बुरशीजन्य, जिवाणूजन्य आणि काही थोड्या विषाणूजन्य रोगांचा प्रसार बियाण्यामार्फत होत असतो. र्रोगविरहित बियाणे ओळखणे किंवा निवडणे कठीण आहे म्हणून प्रमाणित केलेले बियाणे वापरावे किंवा भाजीपाला पिकातील बियाणे धरताना सुरुवातीच्या काढणीतील रोगमुक्त झाडांचे / फळांचे बी धरावे, ज्या शेतात रोगाचा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी बी शक्यतो निवडावे.
रोपवाटिका :
भाजीपाल्याची रोपे तयार करण्यासाठी गाडी वाफे तयार करणे अतिशय महत्वाचे आहे वाफ्यामध्ये चांगले कुजलेले शेणखत कंपोस्ट खत 2 पाट्या व 40 ते 50 ग्रॅम ब्लायटॉक्स / ब्ल्युकॉपर चांगले मातीत मिसळावे. त्यानंतर औषधे लावलेले बी ओळींमध्ये पातळ पेरावे. प्रत्येक 2-1 मीटरच्या वाफ्यास 25 ग्रॅम फोरेट हे दाणेदार औषध बियाच्या दोन ओळींमध्ये घालावे, मात्र फोरेट औषधाचा आणि बियांचा संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी. पेरणीनंतर पाणी वेळेवर व योग्य द्यावे. बी दात पेरल्यास व पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यास रोपे कोलमडणे या रोगाचा प्रादुर्भाव हमखास होतो. बियाण्याची उगवण होईपर्यंत झारीने पाणी द्यावे. हवा खेळती राहण्यासाठी वरचेवर खुरपणी करून वाफे स्वच्छ व भुसभुशीत ठेवावेत. गरज भासल्यास बी उगवणीनंतर 15 ते 18 दिवसांनी 25 ग्रॅम कॉपर ऑक्झीक्लोराईड प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी द्यावी.
1 मिरची : या पिकावर फळे कुजणे व फांद्या वाळणे, भुरी, विषाणूजन्य चुरडा, मुर्दा, मर इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने होतो.
अ) फांद्या वाळणे व फळ कुजणे :
या रोगाची सुरुवात झाडांच्या शेंड्यापासून होते. प्रथम कोवळे शेंडे मरतात. रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास झाडे सुकून वाळतात. त्याचप्रमाणे या रोगामुळे पानावर व फड्यावर काळे चट्टे पडतात. त्यानंतर पकवा हिरव्या तसेच लाल मिरच्यांवर सुद्धा होतो व त्यामुळे मिरचीवर लांबट गोलाकार काळे डाग पडतात. रोगाची तीव्रता जास्त झाली कि संपूर्ण मिरची काली पडते व कुजते.
ब) भुरी :
या रोगामुळे पानाच्या वरील व खालील बाजूस पिठाप्रमाणे पांढरी बुरशी दिसते. या रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास फळावर तसेच फांद्यांवर सूध्दा पांढरी बुरशी दिसते. त्यामुळे सर्व पीक पांढरट पावडरीचा फवारा केल्यासारखे दिसते. त्यामुळे पाने, फुले गाळून पडतात आणि झाडे निस्तेज दिसतात.
क) चुरडा , मुरडा :
या रोगाचा प्रादुर्भाव विषाणू( व्हायरस ) मुळे होतो आणि रोगाचा प्रसार फुलकिडे, कोळी या किडीमार्फत होतो. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे पानाच्या शिरांमधील भागावर सुरकुत्या पडून पाने वेडीवाकडी होतात आणि अशी पाने आकाराने लहान राहतात व पानावर चुरडा मुरस्याची लक्षणे दिसतात. झाडाची वाढ ना होता ती खुजी राहतात.
उपाय :
वरील रोगांच्या एकत्रित नियंत्रणासाठी खालीलप्रमाणे काळजी घेतल्यास पीक निरोगी राहून उत्पादनात भरघोस वाढ होते.
1) पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम 3 ग्रॅम किंवा बाविस्टीन 2 ग्रॅम या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
2) वाफ्यामध्ये बी पेरतेवेळी पूर्वी सांगितल्याप्रमाणे 25 ग्रॅम फोरेट हे दाणेदार औषध प्रति वाफ्यास द्यावे.
3) रोपे तयार झाल्यानंतर ती 25 ग्रॅम डायथेन एम-45, 30 ग्रॅम पाण्यात विरघळणारे गंधक व 10 लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे व या द्रावणात रोपे साधारण 5 मिनिटे बुडवून नंतर लागण करावी.
4) लागवडीनंतर 10 दिवसांनी फोरेट हे औषध प्रति हेक्टरी 10 किलो याप्रमाणे चंद्रकोर कोरी घेऊन प्रत्येक झाडास चिमूटभर द्यावे.
5) लागवडीनंतर 45 दिवसांनी 1500 ग्रॅम डायथेन एम -45, 1500 ग्रॅम पाण्यात विरघळणारे गंधक व 500 लिटर पाण्यात मिसळून दार 10 दिवसांनी फवारणी करावी. साधारण 3 ते 4 फवारण्या कराव्यात.
6) भुरी रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास कॉपर ऑक्झीक्लोराईड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

Agrojay Innovations Pvt. Ltd.
Comments
Post a Comment