Posts

Showing posts from February, 2020

पेपरपॉट ट्रान्सप्लॅंटर

Image
पेपरपॉट ट्रान्सप्लॅंटर (Download Agrojay Mobile Application :-  http://bit.ly/Agrojay ) पेपरपॉट ट्रान्सप्लॅंटर जपान येथील खासगी कंपनीने रोपांच्या लागवडीसाठी सोपे आणि अत्यंत कार्यक्षम असे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याला ‘चेन पॉट’ किंवा ‘पेपर पॉट’ असे म्हणतात. जाड कागदाच्या साह्याने मधमाश्‍यांच्या पोळ्याप्रमाणे षटकोनी आकार तयार केले जातात. या कागदी पट्ट्या तीन ते चार प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. त्यात कोकोपीट भरून बिया लावल्या जातात. एकाच वेळी संपूर्ण ट्रेमध्ये बिया लावण्यासाठीही खास प्लेट तयार केली आहे. लागवडयोग्य रोपे तयार झाली की त्यांची लागवड करण्यासाठी ‘पेपर पॉट ट्रान्स्प्लॅंटर’ या यंत्राचा वापर करावा. हे यंत्रही एका माणसांच्या साह्याने खेचून चालवता येते. वेगवान आणि कार्यक्षम : ग्रीन सिटी एकर फार्मचे मालक कुर्टीस स्टोन यांनी सांगितले, की पालक लागवडीसाठी पेपरपॉट रोपवाटिका आणि लागवड यंत्राचा वापर करत असून, वेळेमध्ये ८८ टक्के बचत झाली आहे. पूर्वी जो बेड लावण्यासाठी माणसांना एक तास लागत असे, तो आता केवळ सात मिनिटांमध्ये लावून पूर्ण होतो. जपा

फुलांचे जागतिक मार्केट : फ्लोरा हॉलंड

Image
फुलांचे जागतिक मार्केट : फ्लोरा हॉलंड (Download Agrojay Mobile Application :-  http://bit.ly/Agrojay ) फ्लोरा हॉलंड हे जागतिक स्तरावरील फुलांकरिता प्रसिध्द असलेले सर्वात मोठे फुलांचे मार्केट आहे. या बाजारपेठेतुन संपुर्ण जगभरात शेकडो प्रकारच्या फुलांची निर्यात केली जाते. फ्लोरा हॉलंड ही एक सहकारी संस्था असुन या संस्थेचे सुमारे ५०० सदस्य आहेत. शेतकरी आणि व्यापारी यांच्यात योग्य तो समन्वय साधुन उत्पादन झालेल्या फुलांचा लिलाव करण्यामध्ये ही संस्था महत्वाची भुमिका बजावत असून या मार्केटमध्ये ६ लिलाव केंद्र आहेत. लिलाव : शेतक-यांनी बाजारपेठेत विक्रीसाठी आणलेल्या फुलांचा या ठिकाणी अत्याधुनिक पध्दतीने लिलाव केला जातो. प्रथम शेतक-यांकडुन विक्रीसाठी आलेल्या फुलांचे तांत्रिक निरिक्षण करुन कृलिर्ट कंट्रोल नॉर्मसप्रमाणे तपासुन त्याचे वर्गीकरण करता येते. त्यानंतर ही फुले २०-१००-२००  अशाप्रकारचे गुच्छे (बंच) करुन बास्केटमध्ये ठेवुन लिलावाकरिता आणली जातात. फुलांचा लिलाव करण्यासाठी १३ हॉल असुन एका हॉलमध्ये साधारणतः ७५ ते १०० व्यापारी असतात. हॉलची बैठक जमिनीपासुन १० फुट उंचीवर ऑर्डटोरि

पुन्हा उत्तम शेती, हा युटर्न शक्य आहे ?

Image
पुन्हा उत्तम शेती, हा युटर्न शक्य आहे ? (Download Agrojay Mobile Application :-  http://bit.ly/Agrojay ) आजच्या टोकाच्या औद्योगिकीकरणामुळे ग्लोबल वॉर्मिंगचे फटके जगाला बसत आहेत. त्यातून सुटका करण्यासाठी शाश्‍वत विकासाची क्षमता असलेल्या नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्याची अपरिहार्यता जगाला मान्य करावी लागणार आहे. असे झाल्यास ती भारतासारख्या आजही शेतीप्रधान असलेल्या देशाला ही एक संधी ठरणार आहे. भारत हा शेतीप्रधान देश असल्याने शेतीमध्ये सर्वाधिक गुंतवणूक व्हायला हवी होती, याविषयी सरकार आणि सरकारबाहेरील अनेक तज्ञांचे एकमत आहे. पण या मताच्या पुलाखालून ७० वर्षे खूपच पाणी वाहून गेले आहे. अमेरिकेनंतर सर्वाधिक सुपीक जमीन असलेल्या भारताला शेतीला प्रथम प्राधान्यक्रम देणे परवडले नाही. दुसर्‍या महायुद्धानंतर किंवा अगदी गेल्या शतकाच्या सुरुवातीपासूनच जगभर शेती मागे पडत गेली आणि उद्योगांचे महत्त्व वाढत गेले. त्याचे महत्त्वाचे कारण शेतीमध्ये होणारे अमाप उत्पादन आणि त्यामुळे त्याला पुरेसा भाव न मिळणे. गेल्या शतकात शेती व्यवसायाचे एवढे पैशीकरण झाले नव्हते आणि शेतीमाल एवढ्या मोठ्या प्र

शतावरी - औषधी वनस्पती

Image
शतावरी - औषधी वनस्पती (Download Agrojay Mobile Application :-  http://bit.ly/Agrojay ) शतावरी (Asparagus Wild) ही लिलीएशी (Liliaceae) फुलातील प्राचीन कालापासून उपयोगात असणारी वनौषधी आहे. आयुर्वदामध्ये या वनस्पतीस महत्त्वपूर्ण स्थान असून तिच्या शत गुणांच्या प्रभावांवरूनच 'शतावरी' हे नाव दिले आहे. ही वनस्पती मूळची भारतीय असली तरी तिची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात नाही. महाराष्ट्रात सर्व कृषी विभागांमध्ये हिची लागवड करता येऊ शकते. तिचा औषधांमधील शतगुणांचा प्रभाव पाहता लागवडीस मोठा वाव आहे. शतावरी 'पौष्टिक' पीक म्हणून प्रगत देशात प्रसिद्ध असली तरीही आपल्याकडील नैसर्गिकरीत्या जंगलात आढळणारी शतावरी हळूहळू नष्ठ होत चालली आहे. डोंगर - दऱ्यातील आदिवासी या वनस्पतींच्या मुळांच्या विक्रीपासून थोडी फार कमाई करत असले, तरीही ही दिव्य वनौषधी नामशेष होत असल्याची जाणीव होण्यास मोठा कालावधी लागणार आहे. या वनस्पती मुळासकट काढल्या जातात व त्यांचे पुनरुत्पादन शाखीय पद्धतीने मुळांपासून होत असल्याने त्या समूळ नष्ट होताहेत. त्यांचा ऱ्हास रोखण्यासाठी लागवड अत्यावश्यक ठरते व त्यामध

फार्मिंग 3.0

Image
फार्मिंग 3.0 (Download Agrojay Mobile Application :-  http://bit.ly/Agrojay ) भारतातील 50 टक्‍क्‍यांहून अधिक रोजगार शेतीतून निर्माण झालेले आहेत. परंतु, 80 टक्‍क्‍यांहून अधिक शेतकरी लहान व अल्प भूधारक आहेत, त्यामुळे शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शतीची उत्पादकता वाढण्याची गरज असल्याचे महिंद्रा ऍग्री सोल्यूशन्सचे व्यवस्थापकीय संचालक अशोक शर्मा यांनी सांगितले. 23 डिसेंबर हा भारतीय शेतकरी दिवस पाळला म्हणून पाळला जातो. त्यानिमित्त बोलताना ते म्हणाले की, प्रवासाच्या बाबतीतील सर्वात मोठ्या कंपनीकडे स्वतःची एकही कार नाही. सर्वात मोठ्या हॉटेल साखळीचे स्वतःच्या मालकीचे एकही हॉटेल नाही. स्वयंचलित कारचे उत्पादक म्हणून गूगल व ऍपल हे जगातील सर्वात मोठे ऑटोमेकर्स स्पर्धक असतील. शेती क्षेत्रातही असे बदल घडू शकतात. शेती क्षेत्रामध्ये अजूनही डिजिटायझेशनचा प्रवेश तितका झालेला नाही. तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास पूर्णपणे नवी क्रांती निर्माण होईल व त्पादकता व भरभराट यांची सुगी येऊ शकेल. भारतात जमिनीचे लहान तुकडे असल्यामुळे आणि 50 टेक्‍क लोक शेतीवर अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्यांना ना

कांदा बिजोत्पादन

Image
कांदा बिजोत्पादन (Download Agrojay Mobile Application :-  http://bit.ly/Agrojay ) कांदा उत्पादन व क्षेत्राच्या बाबतीत भारत जगात अग्रेसर असला, तरी प्रति हेक्‍टर उत्पादकतेच्या बाबतीत भारताचा क्रमांक बराच खाली लागतो. कांदा पिकवणाऱ्या राज्यांत क्षेत्र आणि उत्पादन या दोन्ही दृष्टीने महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व आंध्र प्रदेश ही राज्ये आघाडीवर आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील हवामान हे वर्षभर म्हणजे खरीप, रांगडा, रबी व उन्हाळी हंगामात लागवडीस पोषक असते. देशाचे २५ टक्के उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. नाशिक, पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, धुळे हे जिल्हे कांदा उत्पादनात आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील ३७ टक्के, तर देशातील १० टक्के कांद्याचे उत्पादन नाशिक जिल्ह्यात होते. भारतात कांद्याच्या जवळजवळ ३३ जाती विकसित झाल्या आहेत. परंतु ३-५ जाती प्रामुख्याने लागवडीसाठी वापरल्या जातात. एकूण क्षेत्राचा विचार केला तर शिफारस केलेल्या सुधारित जातींखाली फक्त ३० टक्के क्षेत्र येते. बाकी क्षेत्रावर शेतक-यांनी स्वत: तयार केलेल्या बियाणांची लागवड केली जाते. स्वत:चे बी तयार करीत असताना बीज

लेट्यूस उत्पादन तंत्रज्ञान

Image
लेट्यूस उत्पादन तंत्रज्ञान (Download Agrojay Mobile Application :-  http://bit.ly/Agrojay ) पाश्चिमात्य देशामध्ये काही भाज्या न शिजविता कच्याच खाण्याची पद्धत आहे. अशा भाज्यांना सॅलड पिके म्हणतात. अशा कच्च्या भाज्या खाणे प्रकृतीला फारच हितकारक आहे. यापैकीच लेट्यूस हे पीक आहे. लेट्यूस ही पालेभाजी अमेरिका, यूरोपियन राष्ट्रे या देशांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. आपल्याकडे या भाजीचा फारसा प्रसार झालेला नाही. मोठ्या शहारच्या आसपास मर्यादित प्रमाणात स्थानिक ग्राहकांसाठी या भाजीची लागवड केली जाते. इतर पालेभाज्यांप्रमाणे या पालेभाजी मध्ये मोठ्या प्रमाणात पोषक अन्नघटक आहेत. जिवनसत्व अ सोबतच या पालेभज्यात प्रथिने तसेच खनिजे जसे- चुना, लोह इ. भरपुर प्रमाणात आहेत. विशेषत: ही कच्चीच सॅलड म्हणून पाश्चिमात्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणात खातात. तसेच याची शिजवून भाजीही करतात. लेट्यूस या पालेभाजी सुट्ट्या पानाचा किंवा पानाच्या गुड्ड्यांचा (पान कोबीसारख्या) किंवा देठांचा भाग कच्चा (सॅलड) खाण्यासाठी वापर करतात. भारतात या पिकाचा तितकसा प्रसार झाला नाही. हळूहळू त्याचे महत्व पाट्वून बहुतेक राज्यांतू