लेट्यूस उत्पादन तंत्रज्ञान


लेट्यूस उत्पादन तंत्रज्ञान

(Download Agrojay Mobile Application :- http://bit.ly/Agrojay)

पाश्चिमात्य देशामध्ये काही भाज्या न शिजविता कच्याच खाण्याची पद्धत आहे. अशा भाज्यांना सॅलड पिके म्हणतात. अशा कच्च्या भाज्या खाणे प्रकृतीला फारच हितकारक आहे. यापैकीच लेट्यूस हे पीक आहे. लेट्यूस ही पालेभाजी अमेरिका, यूरोपियन राष्ट्रे या देशांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. आपल्याकडे या भाजीचा फारसा प्रसार झालेला नाही. मोठ्या शहारच्या आसपास मर्यादित प्रमाणात स्थानिक ग्राहकांसाठी या भाजीची लागवड केली जाते.
इतर पालेभाज्यांप्रमाणे या पालेभाजी मध्ये मोठ्या प्रमाणात पोषक अन्नघटक आहेत. जिवनसत्व अ सोबतच या पालेभज्यात प्रथिने तसेच खनिजे जसे- चुना, लोह इ. भरपुर प्रमाणात आहेत. विशेषत: ही कच्चीच सॅलड म्हणून पाश्चिमात्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणात खातात. तसेच याची शिजवून भाजीही करतात. लेट्यूस या पालेभाजी सुट्ट्या पानाचा किंवा पानाच्या गुड्ड्यांचा (पान कोबीसारख्या) किंवा देठांचा भाग कच्चा (सॅलड) खाण्यासाठी वापर करतात. भारतात या पिकाचा तितकसा प्रसार झाला नाही. हळूहळू त्याचे महत्व पाट्वून बहुतेक राज्यांतून मर्यादित स्वरूपांत मोठ्या शहरांच्या परिसरात ही भाजी लावतात.


हवामान आणि जमीन :
लेट्युस कोबिवर्गीय पिकांसारखेच थंड हवामानात येते. १३ ते १६ अंश सेल्सियस तापमान लेट्युस या पिकाला चांगले मानवते. यापेक्षा उष्ण व कोरड्या हवामानात पानांची प्रत वाईट होवून ती कडवट होतात आणि पीक फुलावर लवकर येते. चांगला निचरा होणार्‍या, माध्यम व हलक्या माळरानच्या जमिनीत हे पीक चांगले येते. हलक्या जमिनीत सेंद्रिय खताचा चांगला पुरवठा करावा लागतो. या पिकासाठी जमिनीचा समु ५.५ ते ६.७ असणे योग्य आहे.


उन्नत वान :
 लेट्युस ह्या पिकच्या निरनिराळ्या प्रकारामध्ये गड्ड्यांचा प्रकार, पानांच प्रकार, सरल वाढणारा रोमेण प्रकार आणि खोडचा प्रकार असे चार प्रकार पडतात.


गड्ड्यांचा गट : 
या गटात कोबी सारखे गड्डे तयार होतात त्यामुळे एका काढनीतच पण किंवा फुलकोबिसारखा गड्डा काढून घेतात. बाहेरच्या देशात विकसित केलेल्या आणि भारतीय कृषि अनुसंधान संस्था, नवी दिल्ली, यांनी भारतात लागवडीसाठी शिफारस केलेल्या जाती पुढीलप्रमाणे आहेत.


१.ग्रेट लेक : 
ही गड्डा प्रकारातील जात आहे. गड्डा घट्ट आणि मोठा असतो. पाने हिरवी असतात. बाहेरच्या पानावर फोडसारखे उंचवटे असतात. शेंडा करपणे (टिपबर्न) या रोगला ही जात कमी बळी पडते. पण यावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो. उत्पादन ६५ क्विंटल हेक्टरी तर बियाण्याचे हेक्टरी १-२ क्विंटल उत्पादन येते.


२.इम्पेरियल : 
या वानामध्ये गड्डा मध्यम आकाराचा व घट्ट असून तो बाहेरील पानांनी बराचसा झाकला जातो. पानावर फोडसारखे उंचवटे असतात. ही जात अधिक तापमानात तग धरू शकते.


सुट्ट्या पानांचा गट :
 या गटात पाने लांबट व झाडावर सुट्टी (वेगवेगळी) आलेले असतात. ही पानेच खुडुन विक्रीला पाठवितात. पानांची तोडणी एकापेक्षा जास्त वेळा होवू शकते. या गटातील आपल्याकडे लागवडीसाठी शिफारस केलेलयालया जाती,


१.स्लोबोल्ट : 
ही सुट्ट्या पानाची किंवा बिनगड्ड्यांची  जात आहे. पाने रुंद असून कडा झालरीसारख्या दिसतात . पानाचा रंग पोपटी असतो. ही जात लवकर फुलावर येत नाही, त्यामुळे परसबागेत लावण्यासाठी उत्तम आहे


२.चायनीज यल्लो :
ही सुट्ट्या पानाची लवकर येणारी जात असून पाने फिकट हिरवी, कुरकुरीत आणि कोवळी असतात. ही लवकर येणारी व भरपूर उत्पन्न देणारी पांढर्‍या बियांची जात आहे. उत्पन्न ६०-६५ क्विंटली प्रती हेक्टर आणि बियांण्याचे उत्पन्न हेक्टरी २ क्विंटल येते.


लागवडीचा हंगाम आणि बियाण्याचे प्रमाण :
लेट्युस हे पीक थंड हवामानात येणारे असल्यामुळे बियांची पेरणी सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये गादी वाफ्यावर करून ४ ते ५ आठवड्यांनी रोपांची पुनर्लागवड करावी. रोपांना रोपवाटिकेत नियमित पाणी आणि खते द्यावीत. १ हेक्टर लागवडीसाठी लेट्यूसचे ५०० ग्राम बी लागते.


लागवड पद्धती :
शेत नागरून, वखरुण भुसभुशीत झाल्यावर त्याला सेंद्रिय खते आणि पाणी देवून वापसा आल्यावर दुसर्‍या दिवशी लेट्युसची लागवड ३०-४५ सेमी अंतरावर ओळीत करावी दोन ओळीतील अंतर ६० सेमी अंतर ठेवावे.


खते आणि पाणी व्यवस्थापन :
मशागतीच्या वेळी २०-३० टन सेंद्रिय (शेणखत) खत जमिनीत चांगले मिसळून द्यावे. हेक्टरी ५० ते ८० किलो नत्र, २५ ते ५० किलो स्फुरद ५० ते ६० किलो पालाश द्यावे, तसेच लागवडीच्यावेळी संपूर्ण स्फुरद, पालश आणि  अर्ध नत्र द्यावे. तर नत्राचा निम्मा हप्ता नंतर १ महिन्यांनी द्यावा. या पिकाला १२ ते १५ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे, उन्हे तापू लागल्यास लवकर लवकर पाणी द्यावे. सुरूवातीला हलक्या खुरपणी देवून तन काढावे व भर द्यावी.


महत्वाच्या किडी,रोग आणि त्यांचे नियंत्रण :
लेट्युस या पिकावर काही किडींचा जसे मावा, तुडतुडे आणि पाने पोखरणारी आळी (लीफमायनर) यांचा प्रादुर्भाव होतो. यासाठी मॅलॅथिऑन २० मिलि. १० लीटर पाणी या प्रमाणात फवारावे. औषध फवारल्यावर ८-१० दिवसांनी काढणी करावी.


  लेट्यूस या पिकावर पुढील रोग येतात, :


१.स्लायमी सॉफ्ट Rot :
 यात पानावर तेलकट, फुगिर सडके डाग दिसतात. नंतर ते तपकिरी होवून सर्वत्र पसरतात आणि तेलकट बुळबुळीत वाटतात.

उपाय : जमिनीत बेताचा ओलावा ठेवल्यास हा रोग आटोक्यात राहतो.


२.केवडा( डाऊनी मिल्ड्यु) : 
 यात पानांच्या खालच्या भागात केवड्यासारखी पांढरी वाढ झालेली दिसते. पानाच्या वर फिक्कट पिवळे चट्टे दिसतात. नंतर पाने पिवळी पडून वळतात.
उपाय : डायथेन एम-४५ या औषधाची १० लिटरला २५ ग्रामप्रमाणे फवारणी द्यावी  किंवा बोर्डो मिश्रण (२:२:५०)फवारावे


३.मोझ्याक : 
हा विषाणूजन्य रोग रोपवाटिकेत दिसून येतो. पानाच्या कडा किंचित आतल्या बाजूला वळलेल्या तसेच पानावर पिवळे हिरवे चट्टे दिसतात. व रोपे पिवळी पडतात.


काढणी, उत्पादन आणि विक्री :
लेट्युसच्या पानांसाठी लावलेल्या जातींची पाने वाढलेली पण कोवळी असतानाच काढवीत. पानांचे २-३ तोडे घ्यावे. गड्ड्याच्या जातीमध्ये मात्र गड्डा पूर्ण वाढीचा झाल्यावरच तो काढतात. काढताना बाहेरच्या पानांना इजा होणार नाही ही काळजी घ्यावी. कारण ती फारच लुसलुशीत असतात.त्वरित विक्रीसाठी पाठवावे. लेट्युसच्या पानांची काढणी ५० दिवसांनी सुरू करावी तर गड्डा लेट्युस १००-१२० दिवसांनी काढतात.हेक्टरी १००ते १४० क्विंटल उत्पादन मिळते.
झाडांची कापणी जमिनीलगत करतात. म्हणजे सर्व पाने एकत्रित राहतात.त्यांच्या जुडया बांधून विक्रीला पाठवतात. 0 अंश सेल्सियस तापमानवर आणि ९०-९५% आद्रता (हयुमिडिटी) असणार्‍या शितगृहात २-३ महीने लेट्युस साठवून ठेवता येते.


बिजोत्पादन :
लेट्युस हे स्वपराग सिंचित (सेल्फ पोलीनेटेड) पीक आहे. याच्या पायाभूत बिजोत्पादनासाठी ५० मीटर तर प्रमाणित बियांसाठी १० मीटर अंतर दोन जातींत ठेवावे. भाजीसारख्याच पद्धतीने बिजोत्पादन घेता येते. गड्डे धरणार्‍या जातींमध्ये गड्ड्यांना थोडे कापावे लागते किंवा हातांनी वरची पाने काढावी लागतात म्हणजे फुलांचे सोट बाहेर पडतात. फळ-बोंड विटकरी रंगाचे (ब्राऊन) होते, तेव्हा बी काढावे. गड्ड्यांच्या जाती १००-१२५ किलो बियाण्यांचे उत्पादन देतात.तर सुट्ट्या पानाच्या जातीपासून अधिक म्हणजे ४-५ क्विंटल हेक्टरी बी मिळते.



See Below for More Information https://digitalagribirds.blogspot.com

(Download Agrojay Mobile Application :- http://bit.ly/Agrojay)

Comments

Popular posts from this blog

How to Prevent Soil Erosion on Farmlands

Agrojay Fruit and Vegetable Processing an Agricultural Industry

वांगी लागवड