फुलांचे जागतिक मार्केट : फ्लोरा हॉलंड

फुलांचे जागतिक मार्केट : फ्लोरा हॉलंड


(Download Agrojay Mobile Application :- http://bit.ly/Agrojay)

फ्लोरा हॉलंड हे जागतिक स्तरावरील फुलांकरिता प्रसिध्द असलेले सर्वात मोठे फुलांचे मार्केट आहे. या बाजारपेठेतुन संपुर्ण जगभरात शेकडो प्रकारच्या फुलांची निर्यात केली जाते. फ्लोरा हॉलंड ही एक सहकारी संस्था असुन या संस्थेचे सुमारे ५०० सदस्य आहेत. शेतकरी आणि व्यापारी यांच्यात योग्य तो समन्वय साधुन उत्पादन झालेल्या फुलांचा लिलाव करण्यामध्ये ही संस्था महत्वाची भुमिका बजावत असून या मार्केटमध्ये ६ लिलाव केंद्र आहेत.

लिलाव :
शेतक-यांनी बाजारपेठेत विक्रीसाठी आणलेल्या फुलांचा या ठिकाणी अत्याधुनिक पध्दतीने लिलाव केला जातो. प्रथम शेतक-यांकडुन विक्रीसाठी आलेल्या फुलांचे तांत्रिक निरिक्षण करुन कृलिर्ट कंट्रोल नॉर्मसप्रमाणे तपासुन त्याचे वर्गीकरण करता येते. त्यानंतर ही फुले २०-१००-२००  अशाप्रकारचे गुच्छे (बंच) करुन बास्केटमध्ये ठेवुन लिलावाकरिता आणली जातात. फुलांचा लिलाव करण्यासाठी १३ हॉल असुन एका हॉलमध्ये साधारणतः ७५ ते १०० व्यापारी असतात. हॉलची बैठक जमिनीपासुन १० फुट उंचीवर ऑर्डटोरियमसारखी असते. खालच्या बाजुला फुले भरलेली ट्रॉली येत असते. त्या ट्रॉलीचे फुलांचे चित्र समोरच्या स्क्रीनवर व्यापायांना दिसते. त्यामधे उत्पादकाचे नाव, फुलांचा प्रकार, फ्रालिटी कंट्रोलचे अभिप्राय तसेच फुलांची एकुण संख्या या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती असते.


ही माहिती बघुन व्यापारी ऑनलाईन पध्दतीने फुलांची खरेदी करतात. या केंद्रामध्ये दररोज एकुण ४२ ऑक्शन क्लॉकव्दारे विक्री केली जाते. याव्दारे दरदिवशी सुमारे १,२0,000 ऑक्शन व्यवहार होतात. याचाच अर्थ जवळपास १२ बिलीयन फुले व ६ बिलीयन झाडे दरवर्षी विकली जातात. फ्लोरा हॉलंड येथे असलेल्या परफेक्ट लॉजिस्टीकल फॅसिलिटीजमुळे अत्यंत चांगली व्यवसायेिक उलाढाल होते. संपुर्ण जगभरातुन रोज जवळपास ६ हजार उत्पादक आपली फुले व झाडे फ्लोरा हॉलंड येथे पाठवितात. अशाप्रकारची प्रचंड उलाढाल इतर कुठेही बघण्यास मिळत नाही.
आंतरराष्ट्रीय उत्पादकतानेदरलँड हे आंतरराष्ट्रीयस्तरावर फुले व झाडांचा व्यापार करणारे प्रमुख केंद्र आहे. फ्लोरा हॉलंड येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची झाडे व फुले आपण मिळवु शकता. केनिया, खरेदी केलेल्या फुलांचे सर्वोत्कृष्ट पध्दतीने पॅकींग करुन त्याची हमी दिली जाते. या फुलांचे सर्वोत्तम प्रेझेंटेशन केले जाते. व्यापा-यांना हवे त्या संख्येमध्ये आणि आवश्यकतेप्रमाणे फुलांचे पॅकींग होत असते. पॅकींग झालेले बॉक्स मोठ्या ट्रॉलीत ठेवण्यात येतात. प्रत्येक बॉक्सला एक पॅकींगकोड दिलेला असतो त्यानुसारच सर्व व्यवहार अत्यंत सुरळीतपणे चालतात . या केंद्रात एकुण ४ हजार कर्मचारी काम करतात. कामाव्यतिरिक्त कोणीही एकमेकाशी बोलतांना दिसत नाही. नेमुन दिलेली सर्व कामे व्यवस्थितपणे होतांना दिसतात.

या सर्व कामांसाठी तंत्रज्ञानाचा अतिशय योग्यप्रकारे वापर झालेला दिसून येतो. जवळपास १oo एकर परिसरामध्ये फुलांच्या ट्रॉलीज नेण्यासाठी छोट्या ट्रॅक्टरसारख्या गाड्यामधुन पॅकींग केलेला माल मोठ्या ट्रॅक्सपर्यंत व नंतर विक्रेत्यापर्यंत पोहोचविण्याची सोय केली जाते. इतर पिंकापेक्षा फुलशेतीतुन जास्त प्रमाणात उत्पन्न मिळते. फुलशेतीमध्ये ३६५ दिवस काम करावे लागते. एका एकरात सुमारे २५ हजार झाडे बसतात. फुलांच्या झाडांना तुलनेने पाणी देखील कमी लागते.
जरबेरा, गुलाब, अॅन्थुरियम या सारख्या फुलांच्या वेगवेगळ्या जातीची शेती करता येते .

नियंत्रित वातावरणात शेती करण्याचा प्रयत्न  केल्यास त्यासाठी जास्त खर्च येतो. बाजारपेठेत मागणी असणा-या फुलांची शेती केल्यास जास्त खप होऊन जास्त पैसा मिळु शकतो. दिल्ली हे देशातील मोठे फुल मार्केट आहे. चांगल्या प्रकारची फुले भारतात सुध्दा उत्तम प्रकारे चांगल्या भावात विकली जाऊ शकतात. याबाबत फुलांची शेती करणा-या काही प्रगतीशील शेतक-यांना येथील फुलांच्या शेतीबाबत विचारणा केली असता अशाप्रकारे शेती करावयाची झाल्यास काय करावे, याबाबत शेतक-यांनी आपल्याकडे ग्रेडेंशनची पध्दत अस्तित्वात नसल्यामुळे किंमत कमी मिळते

ग्रेडेशनकरिता शासनाने एका समितीची नेमणुक करावी, असे काही शेतक-यांनी यावेळी सुचविले. जोपर्यंत शेतकरी संघटीत होणार नाही, तोपर्यंत आपल्याकडे किंमत मिळत नाही.  असेही ते म्हणाले. आपल्याकडे या विषयाची सखोल माहिती असलेला डाटाबेस तयार करून या कुठे काय चांगले पिकते याची नोंद घेवून त्याला सर्वथा मदत केिंवा तिथपर्यत विक्रेता केिंवा एक्सपोर्टर शेतक-यापर्यंत पोहोचल्यास भारतामध्ये सुद्धा अशाप्रकारची फुलशेती चांगल्या प्रकारे होऊ शकणार आहे.




See Below for More Information https://www.royalfloraholland.com


(Download Agrojay Mobile Application :- http://bit.ly/Agrojay)


Comments

Popular posts from this blog

How to Prevent Soil Erosion on Farmlands

Agrojay Fruit and Vegetable Processing an Agricultural Industry

वांगी लागवड