लिंबू लागवडी विषयी माहिती

 लिंबू लागवडी विषयी माहिती

Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download Agrojay Mobile Application: http://bit.ly/Agrojay)

जमीन :

मध्यम काळी,  हलकी, मुरमाड, पाण्याचा उत्तम निचरा होणारी, ६.५-८.० सामू, चुनखडी विरहीत, क्षारांचे प्रमाण ०.१%  पेक्षा कमी व चुन्याचे प्रमाण ७-८% पेक्षा कमी असलेली जमीन लागवडीस योग्य आहे.

सुधारित जाती :

साई शरबती, फुले शरबती.

लागवडीचे अंतर :

६ X ६ मीटर, खड्डयाचे आकारमान १ X १ X १ मीटर.

खत व्यवस्थापन :

१) लागवडीचे वेळी शेणखत १० किलो, सिंगल सुपर फॉस्फेट २ किलो, निंबोळी पॅड १ किलो ट्रायकोडर्मा २५ ग्रॅम                    
२) शेणखत १५ किलो नत्र १०० ग्रॅम, निंबोळी पेंड २ किलो
३) शेणखत १५ किलो, सुफला (१५:१५:१५) १ किलो, निंबोळी पेंड २ किलो
४) शेणखत १५ किलो, सुफला (१५:१५:१५) २ किलो, म्युरेट ऑफ पोटॅश ५०० ग्रॅम, निंबोळी पेंड १५ किलो

चौथ्या वर्षानंतर वरील खतांशिवाय ५०० ग्रॅम व्हॅम + १०० ग्रॅम स्फुरद विरघळणारे जिवाणू + १०० ग्रॅम अॅझोस्पिरिलम + १०० ग्रॅम ट्रायकोडर्मा हरजियानम द्यावे. सूक्ष्म अन्नद्राव्याची कमतरता आढळल्यास ०.५ % मॅग्नेशिअम सल्फेट, ०.५ % मॅगेनीज सल्फेट ०.५ %  आणि फेरस सल्फेट व कॉपर सल्फेट या सूक्ष्म अन्नद्राव्यांची एकत्रीत फवारणी करावी.

पाणी व्यवस्थापन :

चार वर्षानंतर झाडांना दुहेरी अळी (डबल रिंग) पध्दतीने जमिनीच्या मगदुराप्रमाणे उन्हाळ्यात १०-१५ दिवसांनी तर हिवाळ्यात अंतराने पाणी द्यावे.

आंतरपीक :

सुरुवातीच्या ४-५ वर्षापर्यत पट्टा पध्दतीने मूग, चवळी, भुईमूग, उडीद, श्रावण घेवडा, कांदा, लसूण, कोबी, हरभरा, मेथी दोन ओळीतील मोकळ्या जागेत आंतरपिक म्हणून घ्यावे.

बहार व्यवस्थापन :

कागदी लिंबूच्या हस्त बहारातील अधिक उत्पादनासाठी जून महिन्यात जिब्रेलिक अॅसीड (जी.अे.३) १० पी.पी.एम.सप्टेंबरमध्ये सायकोलीन १००० पी.पी.एम. संजिवकाची व ऑक्टोबर महिन्यात १ टक्का पोटॅशिअम नायट्रेट द्रावणाची फवारणी करावी.

तण व्यवस्थापन :

ग्लायफोसेट (ग्लायसेल) १००-१२० मि.लि + १००-१२० ग्रॅम युरिया १० लिटर पाण्यात मिसळून तणांचा प्रादुर्भाव दिसून आल्यावर फवारणी करावी, त्यानंतरच्या दोन फवारणी तणांची पुर्नउगवण ३० % आढळून आल्यानंतर कराव्यात.

कीड व रोग नियंत्रण :

पाने पोखरणारी अळी – अबामेफ्टीन ४ मि.ली  किंवा नोहॅलूरॉन ५ मि.ली किंवा इमीडॅक्लोप्रीड २.५ मि.लि. किंवा थायडीकार्ब १० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पाने खाणारी अळी – क्किनॉलफॉस २० मि.लि. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

काळी माशी – अॅसेफेट १५ ग्रॅम किंवा ट्रायझोफॉस २० मिली १०  लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

सिल्ला, मावा – अबामेक्टीन ४ मि.ली किंवा पोरपगाईट १० मि.ली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पिठ्या ढेकूण – क्लोरपायरीफॉस २५ मि.लि किंवा डायमिथोएट  १५ मि.लि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

लाल कोळी – अबामेक्टीन ४ मि.लि किंवा पोपरगाईट १०.मि.लि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

कॅकर/खै-या – रोगग्रस्त फांद्यांची छाटणी करावी, छाटलेल्या ठिकाणी बोर्डो पेस्ट लावावे, पावसाळ्यातील महिन्यात स्ट्रेप्टोसायक्लीन १ ग्रॅम + कॉपर ऑक्सीक्लोराईड ३० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून ३-४ फवारणी कराव्यात. किंवा जून महिन्यातील छाटणीनंतर कॉपर ऑक्सीक्लोराईड ( ३० ग्रॅम १० लि.पाणी) ची एक फवारणी नंतर ३० दिवसाच्या अंतराने बोर्डो मिश्रण ( १ कि.मोरचूद + १ कि. चुना + १०० लि.पाणी) च्या दोन फवारण्या व नंतर निंबोळी अर्क च्या दोन फवारण्या ( ५०० ग्रॅम १० लि.पाणी) कराव्यात.

ट्रिस्टेझा – मावा या रोगवाहक किडींचे आंबा बहार, मृग बहार व हस्त बहारातील नवीन पालवीचे आंतरप्रवाही किटकनाशक वापरून रोगाचा प्रसार नियंत्रित ठेवावे.

पायकूज व डिंक्या – पावसाळ्यापुर्वी फोसेटाईल अल (३० ग्रॅम १० लि.पाणी) ची फवारणी करावी आणि झाडाच्या खोडास ६०-९० सें.मी. उंचीपर्यत पावसाळ्यानंतर बोर्डो पेस्ट लावावे. किंवा मेटॅलॅक्झिल अधिक मॅकोझेब हे संयुक्त बुरशीनाशक २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून खोडाशेजारील मातीत एक महिन्याच्या अंतराने दोनदा ओलेचिंब किंवा ड्रेंचिग करावी.

शेंडे मर – पावसाळ्यापूर्वी व नंतर रोगग्रस्त फांद्या छाटून त्या ठिकाणी बोर्डो पेस्ट लावावे. कार्बनडेझिम १० ग्रॅम किंवा मॅन्कोझेब २० ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड ३० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून वर्षातून ३-४ फवारण्या कराव्यात.

उत्पादन :

७५ ते १२५ किलो/ झाड (५ वर्षावरील झाड)



Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download Agrojay Mobile Application: http://bit.ly/Agrojay)



Comments

Popular posts from this blog

Agricultural Innovation in India

Technology in Agriculture: Feeding the Future

India Vs. World Farm Mechanization and Technology