गुळवेल उपयोग
गुळवेल उपयोग
गुळवेल किंवा गुडूची (शास्त्रीय नाव: Tinospora cordifolia, टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया) हृदयाच्या आकाराची पाने म्हणून कॉर्डिफोलिया हे नाव पडले . भारत, श्रीलंका, म्यानमार अशा उष्णकटिबंधीय प्रदेशांत आढळणारी एक वेल आहे. हीस अमृतवेल म्हणतात. या वनस्पतीचे सत्त्व औषध म्हणून वापरतात. त्याला गुळवेलसत्त्व असे नाव आहे.
गुळवेल ह्या वनस्पतीला आयुर्वेदात फार महत्त्व आहे. आयुर्वेदात गुळवेलाला अमृता हे नाव दिले आहे. या नावाप्रमाणेच ही वनस्पती अमर आहे, जमिनीतील पाण्याची पातळी कमी झाली तरीही ही वनस्पती जिवंत राहते. भारतातील सर्व भागात ही वनस्पती सहज आढळते. या वनस्पतीच्या उपयोगासंदर्भात विविध ऋषींनी आयुर्र्वेदिक ग्रंथांमध्ये बरीच माहिती लिहून ठेवलेली आहे.
या वनस्पतीच्या कंदाचा आणि खोडाचा वापर औषधात केला जातो. या वनस्पतीची पानेही औषधी आहेत. गुळवेलीमध्ये टिनोस्पोरिन, टिनोस्पोरिन आम्ल, टिनोस्पोरिन गिलोइन, गिलोनिन ही रासायनिक गुणद्रव्ये आहेत. ही रसायने चवीला कडू असतात. तो कडवटपणा गुळवेलीच्या पानांत आला आहे.
गुळवेलीचे खोड चवीला कडू, तुरट आणि किंचित गोड असते. गुळवेलीच्या अनोख्या गुणांमुळे आयुर्वेदिक औषधांमध्ये या वनस्पतीचा उपयोग करतात. जुलाब, पोटातील मुरडा, हगवण, कृमींचा त्रास, कावीळ, मधुमेह, मूळव्याध, अशक्तपणा, संधिवात अशा निरनिराळ्या व्याधींमध्ये गुळवेलीचा उपयोग होतो. त्यामुळे गुळवेल ही वनस्पती आयुर्वेदात 'अमृतकुंभ' म्हणून ओळखली जाते. वाढत्या उकाड्यामध्ये गुळवेलीच्या पानांची भाजी आरोग्यदायी ठरते. मेथीच्या भाजीप्रमाणे भाजी केली जाते. भाजीपासून केलेले पराठेही चवदार लागतात.

Comments
Post a Comment