आंब्यामध्ये नियमित फळे

 आंब्यामध्ये नियमित फळे

Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download   Agrojay  Mobile Application:  http://bit.ly/Agrojay )

आंब्यामध्ये नियमित फळे धरावीत यासाठी प्रौद्योगिकी :

आंब्याचा मोहोर ही एक गुंतागुतीची प्रक्रिया आहे. साधारणतः त्याला एका वर्षी (चालू वर्ष) खूप फळे लागतात आणि दुस-या वर्षी (बंद वर्ष) कमी फळे लागतात. परत पुढील वर्षी त्याला भरपूर फळे लागतात.

म्हणजेच आंब्यांमध्ये फळे धरण्याचे चक्र हे एक वर्षाआड नसते तर ‘अनियमित’ किंवा ’अनिश्चित’ असते. संशोधनांती असे स्पष्टपणे दिसून आले आहे की असे झाडे छाटणे, पोषण, जलसिंचन, झाडांची सुरक्षितता यांसह बागायत व्यवस्थापन पध्दती तसेच विविध पर्यावरणीय घटकांमुळे होते.

अनियमित फळलागणीची संभाव्य कारणे :

दक्षिणेकडील सर्वात महत्त्वाच्या व्यावसायिक जातींपैकी नीलम (कझालड्डू), बांगनापल्ली (सप्पातई), बांगलोरा (किझिमूकु, तोतापुरी), कालेपाड आणि सेंथुरा (चिन्नास्वर्णरेखा) यांना मध्यम ते जास्त प्रमाणात फळे लागतात आणि ती ब-यापैकी नियमित असल्याचे आढळते.

निवडक जाती, जसे की हापूस (गुंडू), इमाम पसंद (हिमायुद्दीन), मुलगोवा, पीटर (पायरी, नाडूसलाई) इत्यादिंची फळलागणी सर्वात जास्तप अनिश्चित असतेहवामानाची परिस्थिती
आंबा हे अत्यंत बळकट झाड असते मात्र तरी ही विपरीत हवामान परिस्थितींमुळे ’चालू’ वर्ष ’बंद’ वर्षामध्ये बदलू शकते.

कमी पाऊस: २०१० च्या आंबा हंगामात हे दिसून आले की तामिळनाडूमधील बहुतेक सर्व जातींना मोहोर आला नाही. ह्याचे मुख्य कारण होते कमी पाऊस. त्यावर्षीचा पाऊस तामिळनाडूच्या त्याआधीच्या वर्षाच्या वार्षिक सरासरी पर्जन्यमानापेक्षा ३०० मि.मी.ने कमी होता.
मोहोराला सुरुवात होण्याच्या कालावधीत (ऑक्टोबर
नोव्हेंबर) आणि मोहोर धरण्याच्या कालावधीत (जानेवारी) जर सतत पाऊस पडला तर मोहोर आणि फळ या दोहोंवरही विपरीत परिणाम होतो.
कोरडे आणि थंड हवामान व हिवाळ्यात दिवस/रात्रीचे तपमान २० अंश/१५ अंश सेल्सियसच्या आसपास असल्यास मोहोर चांगला येतो.

आंब्यामध्ये फळलागणी नियमित करण्यास मदत करणा-या सुचविलेल्या व्यवस्थापन पद्धती :

नियमित छाटणी करणे महत्त्वाचे आहे.
मृदेच्या अहवालावर आधारि‍त गरजांवर आधारि‍त खते वापरणे महत्त्वाचे आहे.
२% पोटॅशियम नायट्रेट + ४० पीपीएम एनएए (किंवा) १% पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट + १% पोटॅशियम नायट्रेट ऑक्टोबरदरम्यान फवारावे.
जर झाडांना जानेवारीपर्यंत मोहोर आला नाही तर ०.५% युरीया फवारावा.
जलसिंचन केलेल्या बागांना कॅनॉपी क्षेत्राच्या १ मिली/ मी {+२} पाल्कोब्युट्राझोलचे शिंपण करून माती ओली करावी.

Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download   Agrojay  Mobile Application:  http://bit.ly/Agrojay )


Comments

Popular posts from this blog

Agricultural Innovation in India

Technology in Agriculture: Feeding the Future

India Vs. World Farm Mechanization and Technology