यांत्रिक पद्धतीने फवारणी

यांत्रिक पद्धतीने फवारणी

Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download   Agrojay   Mobile Application:   http://bit.ly/Agrojay )

यांत्रिक पद्धतीने फवारणीमुळे वेळ व औषध यांची बचत होते. त्यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पनात भर पडण्यास मदत होत आहे.

भारतामध्ये सद्यस्थितीत विशेषत: द्राक्षेशेती (खाण्याची द्राक्षे)ची केली जाते. यामध्ये एकूण क्षेत्राच्या 90% पेक्षाही जास्त क्षेत्रावर शेती केली जाते. द्राक्षबागेमध्ये बहुतांशी कामे हे अकुशल-अर्धकुशल मजुरांमार्फत केली जातात. साधारणत: द्राक्षेबागेवरील कामे जसे छाटणी, विरळणी, शेंडा मारणे, घडांची डिपिंग इ. कामांमध्ये यांत्रिकीकरणाला भारतीय परिस्थितीमध्ये फार कमी वाव आहे. नजीकच्या काळामध्ये द्राक्षेबगेतील कामे करण्यासाठी मजुरांना वापरता येतील असे काही औजारे उपलब्ध झालेली आहेत. त्यामुळे (वेली विस्तार व्यवस्थापन)च्या कामांमध्ये काही प्रमाणात वेळेची बचत होऊ शकते. 


रोगनियंत्रणासाठी तसेच संप्रेरके व सूक्ष्मद्रव्यांचा वापर करण्यासाठी मोठ्याप्रमाणात ट्रॅक्टरचलित फवारणी यंत्रांचा वापर केला जातो आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात नवीन अशा कल्पनेतून फवारणीच्या कामामध्ये यांत्रिकीकरणाने मोठा पल्ला गाठला आहे. यांत्रिक पद्धतीने फवारणीमुळे वेळ व औषध यांची बचत होते. त्यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पनात भर पडण्यास मदत होत आहे. 

फवारणी यंत्रामध्ये साधारणत: खालील प्रकारची यंत्रे उपलब्ध आहेत : 
1) अळी इश्ररीीं फवारणी यंत्रे : यामध्ये साधारणत: 100 लि / एकर द्रावणाचा वापर केला जातो. यामध्ये नोझलमधून येणार्‍या द्रावणाला सोबत असलेल्या हवेच्या ब्लोअरमधून जोराने येणार्‍या हवेमुळे द्रावणाचे थेंब तोडून छोटे केले जातात व लहान होते व फवारणी जास्त अशा हवेच्या वेगाने वेली विस्तारात आतपर्यंत पोहचण्यास मदत होते व ऊीेश्रिशीं लहान झाल्याने द्रावण कमी प्रमाणात वापरले जाते. अशाप्रकारच्या फवारणी यंत्रामधून 100-200 मायक्रॉन जाडीचे ऊीेश्रिशीं बाहेर पडतात.

2) एडड फवारणी यंत्रे या फवारणी यंत्रामध्ये साधारणत: 40-50 लि. / एकर फवारणीचे मिश्रणाचा वापर केला जातो. हे यंत्र द्राक्षवेलींच्या/घडांच्या वाढीसाठी लागणारे (संप्रेरक) जसे ॠअ/उझझण यासाठी मुख्यत: वापरले जाते. फवारणीसाठी 50 मायक्रॉनच्या आसपास राखली जाते. यामुळे मिश्रणाचा मोठ्या प्रमाणात होणारा वापर टाळण्यात येतो. 

फवारणी करण्यापूर्वी काही वर्षे हाताने घड बुडवणे हे काम सर्रास केले जायचे. पण ते काम खूपच खर्चिक व मोठ्या प्रमाणात मजुरांचे होते, पण त्याची जागा आता एडड फवारणी यंत्राने घेतली आहे. या यंत्रामध्ये 50 मायक्रॉन जाडीचे द्रावणाचे थेंब हे गुरुत्वाकर्षापेक्षा ही 75 पट वेगाने चुंबकीय पद्धतीने वेली विस्ताराती पानांवर असलेल्या विरुद्ध अशा उहरीसशव भागावर आकर्षित होतात. या द्रावणाच्या थेंबांनी वेलीच्या पानांवर व घडाच्या समोरील बाजू व्यापल्यानंतर हे थेंब विस्तरित होऊन पानांच्या व घडाच्या न पोहचलेल्या भागावर जातात. त्यासाठी फवारणीच्या वेळेस द्राक्षवेलीविस्तार व द्राक्षांचे घड हे विरळणी करतात. सुटसुटीत व समोरच्या बाजूला औषधाच्या सान्निध्यात येतील अशाप्रकारे वळण लावले गेले पाहिजे. 

एडड फवारणी यंत्राचे काही तोटे-फायदे 

1) वार्‍याचा वेग जास्त असल्यास फवारणी पिकावर एकसारखी पोहचत नाही. 
2) दाट वेली विस्तारामध्ये औषधाचे द्रावण व्यवस्थित पोहचत नाही. 
3) फवारणीच्या औषधाची तीव्रता दहा पटीने जास्त असते, पण लागणारे द्रावण कमी प्रमाणात लागत असल्याकारणाने हे स्वस्त व वेळेची बचत करणारे ठरते. 

बागेच्या खुरपणीसाठी यांत्रिकीकरण : 
पारंपरिक खुरपणीचे प्रमाण द्राक्षबागेत मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहे. त्यासाठी पर्याय म्हणून दोन प्रकारचे तणनियंत्रण करणारे ट्रॅक्टरचलित औजारे सध्या बाहेरच्या देशातून आयात केले गेले आहेत व त्यावर भारतामध्ये ठर्शींशीीश एपसळपशशीळपस च्या धर्तीवर कमी किमतीच पण प्रभावीपणे काम करणारे उपयुक्त असे औजारे बनविण्याचे प्रयत्न चालू आहेत. 

) द्राक्षबागेच्या दोन ओळींमध्ये येणारे गवत हे उरपश ीहीशववशी म्हणून प्रचलित असलेल्या औजारामार्फत गवत जमिनीच्या वरच्या भागापासून कापण्यात येते व कापलेले गवत हे मागील बाजूस बसवलेल्या उेर्पींशपेीच्या साहाय्याने द्राक्षवेलींच्या बोधावर फेकली जाते. त्याचा झीळे-चरीी म्हणून जमिनीसाठी वापर होतो, तसेच हे औजार द्राक्षबागेतील छाटणीच्यादरम्यान खाली पडलेल्या काड्यांचे लहान तुकडे करतात. द्राक्षवेलींच्या बोधावर टाकण्यात येते. त्याचासुद्धा जैविक खत म्हणून वापर द्राक्षबागेत होतो. 

ब) द्राक्षबागेमध्ये दोन ओळींच्यामध्ये येणार्‍या तणांव्यतिरिक्त द्राक्ष ओळींच्या बोधावरसुद्धा तणनियंत्रण करणे गरजेचे असते. हे गवत ट्रॅक्टरचलित अशा थशशवशी चरलहळपश (तणनियंत्रणासाठी वापरण्यात येणारेयंत्र)च्या साहाय्याने 90% पर्यंत तणनियंत्रण करता येते. या यंत्राला सेन्सार असल्यामुळे हे यंत्र फक्त दोन झाडांमधून असलेले तण व्यवस्थितपणे काढता येते. तसेच द्राक्षवेलीच्या खुंटाला इजा पोहचत नाही. 

सध्या वरील ट्रॅक्टरचलित औजारांव्यतिरिक्त खालील नमूद केलेली औजारे बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे द्राक्षबागेतील यांत्रिकीकरणाला चालना मिळण्यास मदत होते. 

1) बॅटरी-चलित धाटणी व काडी बांधायचे औजार. 
2) द्राक्षकाडी बांधण्यासाठीचे कमी खर्चात उपलब्ध असे ढरशि-इळीवशी.
3) नवीन द्राक्षबाग लागवडीच्यासाठी गउइ मशिनने चारी घेण्याऐवजी जास्त कझच्या हेवी ट्रॅक्टरचलित ठळिशिी मशिनने जमिनीचा 3-4 फुटांपर्यंतचा भाग हलविण्यात येतो. त्यामुळे जमिनीचा वरच्या भागातील कठीण असा स्तर फोडता येतो. यामुळे जमिनीत हवा चांगल्या प्रमाणात खेळती राहते. 

वरील नमूद केलेल्या 1) बॅटरीचलित छाटणी व काड्या बांधायचे औजार वजनाने जास्त असल्याकारणाने भारतीय मजूर चांगल्या प्रकारे हाताळू शकत नाही. त्यामुळे याचा उपयोग भारतीय परिस्थितीत प्रभावीपणे करण्यास मर्यादा येतात. परंतु हे औजार युरोपियन देशांतील दणकट शरीरयष्टीच्या स्थानिक लोकांच्या क्षमतेचा विचार करून बनविण्यात आल्यामुळे त्या परिस्थितीत त्यांचा प्रभावीपणे यांत्रिकीकरणाचा भाग म्हणून वापर केला जातो. 


Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download   Agrojay   Mobile Application:   http://bit.ly/Agrojay )



Comments

Popular posts from this blog

How to Prevent Soil Erosion on Farmlands

Agrojay Fruit and Vegetable Processing an Agricultural Industry

वांगी लागवड