तांदुळ खोडकिडीचे व्यवस्थापन
तांदुळ खोडकिडीचे व्यवस्थापन
राइस स्टेम बोअररमुळे कणसांची संख्या व एकंदर उत्पादन घटते. ह्या किडीच्या सहा प्रमुख प्रजाती आहेत आणि त्या भातपिकाचे भरपूर नुकसान करतात. कावेरी नदीच्या त्रिभुज प्रदेशात खोडकिड्याच्या चार जाती सापडतात – स्कर्पोफेगा इंसर्ट्यूला (पिवळ्या रंगाचा), चिलो सप्रेसालिस (अंगावर पट्ट्या असलेला), चिलो ऑरिसिलस (सोनेरी) आणि सेसामिया इन्फरन्स (गुलाबी) ह्या जाती वेगवेगळ्या अवस्थांतील भातपिकाचे अखंड नुकसान करीत असतात असे अडुथुराई येथील तामिळनाडू भात संशोधन संस्थेच्या एका संशोधनात्मक पाहणीत आढळले आहे.
खोडात राहणार्या अळ्या (लार्व्हा) खोड आतून पोखरून खातात. काहीवेळा अन्नवाहक नलिका तोडतात आणि ह्यामुळे पीक तुर्यावर येण्याआधीच 'डेड हार्ट्स' तयार होतात किंवा तुरे आल्यानंतर 'व्हाइट हेड्स' किंवा 'व्हाइट इअर' दिसून येतात.
पोषक घटक :
हवामानाच्या विविध स्थितींमध्येही कीड टिकून राहण्यास अनेक घटक पोषक ठरतात, उदा. नायट्रोजनचे जास्त प्रमाण, मातीमध्ये सिलिकाचा अभाव, कमी तापमान व अधिक आर्द्रता असलेली थंड कोरडी हवा, पूर्वीच्या पिकाचे अवशेष शेतात शिल्लक असणे इ.
व्यवस्थापनात्मक उपाय :
किडीच्या बंदोबस्तासाठीच्या एकात्मिक उपायांमध्ये संवर्धनात्मक (कल्चरल), जीवशास्त्रीय (बायोलॉजिकल) तसेच वर्तनात्मक (बिहेवियरल) दृष्टीने विचार करता येतो, तो असा (हवामानानुसार) लवकर तयार होणार्या व चांगल्या नांगरणीची गरज असलेल्या जातींची लागवड करणे :
जमिनीचा pH ७ पेक्षा जास्त असल्यास, दर एकरी 2.5 किलो स्यूडोमोना फ्लुरोसंस/ PGPR कंसोर्टियाचा, 25 किलो कडुनिंब-पेंड आणि 250 किलो चांगल्या कुजलेल्या खतासहित, वापर करणे. तसेच, अखेरच्या नांगरटीनंतर जमिनीचा pH ७ पेक्षा कमी असल्यास ट्रायकोडर्मा व्हिरिडचा वापर करणे.
बियाण्यावर प्रक्रिया करणे - प्रत्येकी एक किलो बियाण्यावर १० ग्रॅम ह्याप्रमाणात स्यूडोमोना फ्लुरोसंस/ पीजीपीआर कंसोर्टियाची प्रक्रिया करणे / एक हेक्टर जमिनीवर लावता येतील इतकी रोपे 2.5 किलो कंसोर्टिया पी फ्लुरोसंसमध्ये बुडवणे.
रोपांची पुर्न पेरणी करण्याआधी त्यांवरील खोडकिड्याची अंडी काढून टाकणे
पिकाच्या वाढीतील किडीला बळी पडण्याच्या नाजूक दिवसांमध्ये शेताची नीट पाहणी करून डेड हार्ट्स तसेच व्हाइट हेड्सचा छडा लावणे.
रोपांची पुर्न पेरणी केल्यानंतर २८ दिवसांनी, एक आठवड्याच्या अंतराने तीन वेळा, अंडी खाणार्या ट्रायकोग्रामा जॅपोनिकमचा वापर करणे. तसेच ह्या पुर्न पेरणी नंतर ३७, ४४ व ५१ दिवसांनी ट्रायकोग्रामा चिलोनिक्सचा वापर करणे
Comments
Post a Comment