उस - पोक्का बोंग रोग

 उस - पोक्का बोंग रोग

Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download   Agrojay  Mobile Application:  http://bit.ly/Agrojay )

उसामधील पोक्का बोंग रोगाचे नियंत्रण कसे करावे :

पो क्का बोंग हा बुरशीजन्य रोग असून, फुजॅरियम मोनिलीफॉरमी या हवेद्वारे पसरणाऱ्या बुरशीमुळे होतो. कोसी- 671, को- 86032, कोएम- 0265, को- 8014, को- 94012, कोव्हीएसआय- 9805, व्हीएसआय- 434, को- 7527, को- 7219 आणि को- 419 या ऊस जाती या रोगास कमी-अधिक प्रमाणात बळी पडतात. उन्हाळा हंगाम संपतेवेळी पडणाऱ्या वळीव पावसानंतर या रोगाची लागण ऊस पिकामध्ये दिसून येते. पावसाळी हंगामात पडणाऱ्या सततच्या पावसामुळे आणि शेतात पाणी साचल्याने पिकांमध्ये सापेक्ष आर्द्रता वाढते, तापमान कमी होते. अशा परिस्थितीत या रोगाची बुरशी कमी कालावधीत मोठ्या प्रमाणावर वाढून रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. राज्यातील सर्व कृषी हवामान विभागांत या रोगाचा प्रादुर्भाव कमी - अधिक प्रमाणात आढळतो. दक्षिण महाराष्ट्रात मात्र पावसाळा हंगामात सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण हवेत जास्त काळ राहिल्याने या रोगाचे प्रमाण जास्त दिसून येते.रोगाची लक्षणे

पावसाळा हंगाम सुरू झाल्यानंतर किंवा पावसाळा हंगामापूर्वी पडलेल्या वळीव पावसामुळे हवेत आर्द्रता वाढते. त्या वेळी पोक्का बोंग या रोगास कारणीभूत असणाऱ्या फुजॅरियम मोनिलीफॉरमी या हवेद्वारे पसरणाऱ्या बुरशीची लागण उसाच्या शेंड्याकडील कोवळ्या पानांवर दिसून येते. सुरवातीस पोंग्यातील तिसऱ्या व चौथ्या पानांच्या बेचक्‍यात (पानाच्या व देठाच्या जोडाच्या ठिकाणी) पांढरट - पिवळसर पट्टे दिसून येतात. रोगाची लागण झालेल्या पानांवर सुरकुत्या पडून पाने आकसतात; तसेच त्यांची लांबी घटते. रोगाची तीव्रता वाढल्यानंतर उसाची पाने सडतात, कुजतात. यानंतर पाने गळून पडतात किंवा एकमेकांत गुरफटतात. पाने गुरफटल्याने कांड्यांचे पोषण होत नसल्याने कांड्या आखूड व वेड्यावाकड्या होतात. कधी रोगाची तीव्रता वाढल्यावर पोंगा मर किंवा शेंडाकूज दिसून येते. काही वेळेस रोगग्रस्त उसाच्या कांड्यांवर कांडी काप (नाइट कट) रोगाची लक्षणे दिसून येतात. शेंडाकूज व कांडी काप (नाइट कट) झालेल्या उसातील शेंडा जोम नष्ट झाल्याने उसावरील डोळ्यातून पांगशा फुटतात, कालांतराने असे ऊस वाळतात. रोगट उसाच्या कांड्या आखूड झाल्याने व पांगशा फुटलेल्या उसाच्या उत्पादनात घट येते. रोगामुळे उसाच्या बेटातील रोगग्रस्त उसाचेच नुकसान होते. रोगाने बाधित न झालेल्या उसाचे नुकसान होत नाही.

रोगाचा प्रसार :

पोक्का बोंग या रोगाचा प्रसार प्रामुख्याने हवेमार्फत होतो. याशिवाय पाणी, पाऊस व कीटकांद्वारेदेखील या रोगाचा प्रसार होतो; मात्र रोगाचा प्रसार बेण्याद्वारे होत नाही.


Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download   Agrojay  Mobile Application:  http://bit.ly/Agrojay )


Comments

Popular posts from this blog

Agricultural Innovation in India

Technology in Agriculture: Feeding the Future

India Vs. World Farm Mechanization and Technology