यांत्रिक पद्धतीने फवारणी

यांत्रिक पद्धतीने फवारणी Agrojay Innovations Pvt. Ltd. (Download Agrojay Mobile Application: http://bit.ly/Agrojay ) यांत्रिक पद्धतीने फवारणीमुळे वेळ व औषध यांची बचत होते. त्यामुळे शेतकर्यांच्या उत्पनात भर पडण्यास मदत होत आहे. भारतामध्ये सद्यस्थितीत विशेषत: द्राक्षेशेती (खाण्याची द्राक्षे)ची केली जाते. यामध्ये एकूण क्षेत्राच्या 90% पेक्षाही जास्त क्षेत्रावर शेती केली जाते. द्राक्षबागेमध्ये बहुतांशी कामे हे अकुशल-अर्धकुशल मजुरांमार्फत केली जातात. साधारणत: द्राक्षेबागेवरील कामे जसे छाटणी, विरळणी, शेंडा मारणे, घडांची डिपिंग इ. कामांमध्ये यांत्रिकीकरणाला भारतीय परिस्थितीमध्ये फार कमी वाव आहे. नजीकच्या काळामध्ये द्राक्षेबगेतील कामे करण्यासाठी मजुरांना वापरता येतील असे काही औजारे उपलब्ध झालेली आहेत. त्यामुळे (वेली विस्तार व्यवस्थापन)च्या कामांमध्ये काही प्रमाणात वेळेची बचत होऊ शकते. रोगनियंत्रणासाठी तसेच संप्रेरके व सूक्ष्मद्रव्यांचा वापर करण्यासाठी मोठ्याप्रमाणात ट्रॅक्टरचलित फवारणी यंत्रांचा वापर केला ज...