मेथीची लागवड
मेथीची लागवड
Agrojay Innovations Pvt. Ltd.
महाराष्ट्रात सर्वत्र मेथीची भाजी पालेभाजी म्हणून लोकप्रिय आहे. लवकर येऊन सर्वत्र विकली जाणारी मेथी ही एक चांगली भाजी आहे. मेथीचे मूळ स्थान पूर्व आशिया हे आहे. मेथीच्या बिया मेथीची पाने यांचे महत्त्व समजल्याने अनेक देशांमध्ये मेथीची यशस्वीपणे लागवड केली जाते. मेथीची लागवड जम्मू काश्मिर, उत्तरप्रदेश , मध्यप्रदेश, तमिळनाडू, पंजाब, महाराष्ट्र अशा विविध राज्यातून केली जाते. मेथीची लागवड खरीप व रब्बी हंगामात करता येते. मेथीचे लागवडीचे तंत्र सहज सोपे आहे. मेथी साधारण वीत ते दोन वीत उंच वाढते.
जमीन व हवामान :
मेथी ओलिताची सोय असलेल्या जुन्या मुरलेल्या बागायत जमिनीमध्ये उत्तम येते. पाण्याचा निचरा असणारी, मध्यम खोलीची, कसदार जमीन असावी.
मेथी लागवड थंड हवामानात तसेच योग्य सुर्यप्रकाश व हवेत आर्द्रता असताना करणे आवश्यक असते.
लागवड :
मेथीचे रान नांगरू नये कारण बी खोल जाऊन उगवण मार खाते. त्यासाठी जमिनीची फणणी करून मशागत करावी. म्हणजे बियांची उगवण होऊन मुळे चांगली जमिनीत रुजतात. चांगले कुजलेले शेणखत टाकून सारे ओढावेत. मेथी बी रात्रभर पाण्यात भिजवून नंतर उपसून सावलीत प्लॅस्टिक कागदावर सुकवावे. नंतर वाफ्यात पेरावे किंवा फोकावे. बी साधारण ४ ते ५ दिवसात कडक उन्हाळा असतानाही उगवून येते. एकरी ८० किलो बियाणे लागते. भाजीसाठी मेथी करायची असल्यास लांब सारे पाडणे.
जाती :
महराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांकडे नव्या वाणांच्या बियांची लागवड झालेली दिसते.
१) कसुरी सिलेक्शन (पुसा सिलेक्शन),
२) पुसा अर्लि बंचिग,
३) मेथी नं. ४७ या प्रकारच्या जाती आढळतात.
याशिवाय बऱ्याच ठिकाणी स्थानिक वाणांची लागवड केली जाते. हिरवी, कोवळी लुसलुशीत पाने, लवकर फुलावर न येणे, कोवळेपणा जास्तीत जास्त टिकून राहणे ही या चांगल्या जातीची काही वैशिष्ट्ये आहेत.
खत व्यवस्थापन :
बी टाकण्याअगोदर वाफ्यात शेणखताचा वापर एकरी ४० ते ५० किलो करावा. शेणखतामुळे जमीन भुसभुशीत राहून ओलावा टिकून धरला जाते. रासायनिक खते शक्यतो देऊ नयेत.
पीक संरक्षण :
मेथीवर रोग व किडींचा प्रादुर्भाव शक्यतो होत नाही. उन्हाळ्यात पालेभाज्यांचे बाजारभाव वाढलेले असतात. त्यामुळे बाजारभाव मिळण्यासाठी मेथी केली जाते. मात्र उन्हाळ्यातील उष्णतेमुळे मेथीची मर मोठ्या प्रमाणात होते.
काढणी व उपादन :
मेथीची भाजी जातीनुसार ३५ ते ४० दिवसात काढणी योग्य होते. फुलोऱ्यावर येण्याअगोदर भाजीची काढणी करावी.
पावसाळ्यात मेथीच्या १ गुंठ्यात १००-१५० गड्ड्या निघतात. आरोग्यदृष्ट्या मेथी फलदायी असल्याने बाजारपेठेत मेथीला मागणी असते.
Agrojay Innovations Pvt. Ltd.
Comments
Post a Comment