हिरवा चारा निर्मितीचे हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान

हिरवा चारा निर्मितीचे हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान

Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download Agrojay Mobile Application: http://bit.ly/Agrojay)


बदलते हवामान आणि पाण्याची कमतरता यामुळे जनावरांना १२ महिने दर्जेदार चारा उपलब्ध करून देणे हि समस्या ठरू लागली आहे. पण आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास या समस्येवर तोडगा निघू शकतो. हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानामुळे हे शक्य आहे. पारंपारिक पद्धतीपेक्षा या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कमी वेळेत सकस चारा उपलब्ध होऊ शकतो. मुळात या तंत्रज्ञानाने चारा तयार केल्यास खर्च आणि वेळ दोन्ही गोष्टी नियंत्रणात राहतात.

हायड्रोपोनिक्स चारा म्हणजे काय?

हायड्रोपोनिक्स चारा म्हणजे मातीशिवाय मका, गहू, बाजरी, ज्वारी, बार्ली किंवा तत्सम पिकांपासून हायड्रोपोनिक्स तंत्राचा वापर करून कमी जागेत व कमी पाण्याच्या मदतीने हिरवा चारा निर्माण करणे. हायड्रोपोनिक्स चारा तयार करण्यासाठी हायड्रोपोनिक्स यंत्र (हरितगृह) चारापिके (मका,गहू,बाजरी, इत्यादी), प्लास्टिक ट्रे (साधारण ३ x २ फूट) पाणी देण्याची यंत्रणा(मिनी स्पिंकलर किंवा ऑगर सिस्टम व टाईमर) ची आवश्यकता असते. या पद्धतीत फक्त ७ ते ८ दिवसात (20 ते 25 से. मी. उंचीचा) चारा तयार होतो. साधारण ५० चौ. फूट जागेत एक वर्षात ३६ हजार ५०० किलो चारा तयार होतो. यासाठी वर्षाला ३६ हजार ५०० लिटर पाणी लागते. जनावरांच्या गोठ्याजवळ युनिट असल्यास खर्च अत्यल्प होऊ शकतो. या तंत्रज्ञानाअंतर्गत चारा निर्मिती करताना कमी मजूर लागतात तसेच मशागतीची आवश्यकता भासत नसल्यामुळे लागवडीवर कमी खर्च होतो. ट्रेमध्ये पाण्याचा वापर करून चारापिक घेणे शक्य असल्यामुळे कमी जागेत अशाप्रकारे चारा निर्मिती करणे शक्य होते. यामुळे शेत जमिनीवर इतर नगदी पिक घेणे शक्य होते.


हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती :

हायड्रोपोनिक्स चारायंत्र हे परदेशी बनावटीचे व महागडे असल्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना परवडणारे नाही. परंतु ते भारतीय बनावटीनुसार उपलब्ध साधन – सामग्रीचा (बांबू, तट्ट्या, प्लास्टिक ट्रे, ५० टक्के शेडनेट व प्लास्टिक ट्रे यांचा वापर करून साधारण ७२ चौ. फूट जागेत बसतील अशा २५ x १० x १० फूट अवघ्या १५ हजार रुपये खर्चात हे सांगाडा यंत्र तयार करता येते. याद्वारे दररोज १०० ते १२५ किलो पौष्टिक हिरवा चारा निर्मिती करता येते. यामध्ये प्रकाश, तापमान, आर्द्रता आणि पाण्याचे नियंत्रण करून जास्तीत जास्त हिरवा चारा उत्पादन घेतले जाते.


असा तयार करा हिरवा चारा :

१. चारा तयार करण्यासाठी मका, गहू, बाजरी, बार्ली इत्यादी वापर होतो. या धन्याला सोडीअम हायपोक्लोराईड किंवा ई.एम.च्या द्रावणात बीजप्रक्रिया करून घेतले जाते. नंतर हे धन्य १२ तास भिजत ठेवून, २४ तास तरटाच्या पोत्यात किंवा गोन्पातात अंध्र्या खोलीत ठेवले जाते.

२. त्यानंतर प्लास्टिक ट्रेमध्ये ( ३ x २ फूट x ३ इंच उंची) पसरून ठेवले जाते. प्रती दुभत्या १० ट्रे या प्रमाणे जानावरांच्या संख्येवरून ट्रे ची संख्या ठरवावी.

३. प्लास्टिक ट्रे हायड्रोपोनिक्स चारा निर्मिती यंत्रात पुढील ७ ते ८ दिवस ठेवावेत. १ इंची विद्युत मोटारीला लॅटरलचे कनेक्शन देऊन फोंगर सिस्टीम द्वारे प्रत्येक न्दोन तासाला ५ मिनिटे या प्रमाणे दिवसातून ६ ते ७ वेळा पाणी दिले जाते. एकूण २०० लिटर पाणी दिवसभर वापरले जाते.

४. हि यंत्रणा स्वयंचलित आहे, पाण्याची टाकी उंच ठिकाणी ठेवल्यास सायफन पद्धतीने विद्युत मोटारीचा वापर न करता पाणी देता येते. फक्त पाण्यावरच या चाऱ्याची ७ ते ८ दिवसात २० ते २५ सें. मी. पर्यंत वाढ होते.

या पद्धतीचा अवलंब केल्यास जनावरांना चारा कसा उपलब्ध करून द्यावा हि चिंता कमी होईल. आणि दुभत्या जनावरांना १२ महिने चारा उपलब्ध होईल. गरज आहे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याची.



(Download Agrojay Mobile Application: http://bit.ly/Agrojay)



Comments

Popular posts from this blog

Agricultural Innovation in India

Technology in Agriculture: Feeding the Future

India Vs. World Farm Mechanization and Technology