पत्ताकोबीची लागवड
पत्ताकोबीची लागवड
हवामान आणि जमीन :
पानकोबीचे पीक थंड हवामानात चांगले वाढते. या पिकाच्या वाढीसाठी तसेच गड्डा जोपासण्यासाठी 15 ते 25 अंश सेल्सियस तापमान अतिशय पोषक असते. कोबीचा गड्डा भरत असताना तापमान वाढले तर पानांची वाढ होऊन गड्डे पोकळ राहतात. तसेच तापमान सारखे कमी-जास्त झाल्यासही पिकाची वाढ चांगली होत नाही आणि गड्ड्यांची प्रत खराब होते. तापमान 0 अंश सेल्सियसपेक्षा कमी झाल्यास कोबीच्या झाडाची वाढ खुंटते. अलीकडच्या काळात उष्ण हवामानातही दर्जेदार उत्पन्न देणार्या कोबीच्या नवीन आणि संकरित जाती विकसित केल्यामुळे प्रतिकूल हवामानातही कोबीचे पीक घेणे शक्य झाले आहे. कोबी लागवडीसाठी मध्यम ते भारी पोयट्याची सुपीक आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. हलक्या जमिनीत सेंद्रिय खत वापरून कोबीची लागवड व्यापारीदृष्ट्या करता येते. जमिनीचा सामू 6 ते 6.5 इतका असलेली जमीन कोबीच्या उत्पादनासाठी उत्तम समजली जाते. मात्र, आम्लयुक्त जमिनीत पिकास बोरॉन, मॉलिष्डेनम या सूक्ष्मद्रव्यांची कमतरता पडून रोपे रोगट दिसू लागतात.
उन्नत आणि संकरित वाण :
कोबीच्या अनेक सुधारित आणि संकरित जाती उपलब्ध आहेत. तसेच दरवर्षी नवनवीन जाती संकरित केल्या जातात. पाश्चिमात्य देशात (युरोप, अमेरिका) फिकट हिरव्या व पांढरट हिरव्या किंवा गोल गड्ड्यांच्या जातीशिवाय रंगांचे व सुरकुतलेल्या पानांचे (सेव्हॉय कॅबेज) तसेच गोल उभट चपटे किंवा गड्डे असलेले अनेक प्रकार आहेत.
भारतात फिकट हिरवे, गोल आणि किंचित चपट्या आकाराचे गड्डे जास्त लोकप्रिय आहेत. या प्रकारच्या कोबीचे गड्डे तयार होण्याच्या कालावधीवरून 1) हलक्या जाती (लवकर तयार होणार्या), 2) गरव्या जाती (उशिरा तयार होणार्या) अशा दोन गटांत कोबीच्या जातींची विभागणी करतात. ती पुढीलप्रमाणे :
1)हलक्या जाती : या जातींचे गड्डे रोपांच्या लागवडीनंतर 60 ते 70 दिवसांत तयार होतात. गड्डे गोल, घट्ट, मध्यम आकाराचे असून त्यांचा रंग फिकट पांढरट हिरवा दिसतो. या गटातील ‘गोल्डन एकर’ ही जात उत्तम असून भारतात अत्यंत लोकप्रिय आहे. उदाहरणार्थ : प्राइड ऑफ इंडिया. कोपनहेगन मार्केट, सिलेक्शन एक्स्प्रेस इ. या जातींचे उत्पादन हेक्टरी 20 ते 30 टन इतके मिळते.
2)गरव्या जाती : या जातींचे गड्डे रोपांच्या लागवडीपासून 100 ते 110 दिवसांत काढणीसाठी तयार होतात. या जातींचे गड्डे मोठे 3 ते 5 किलो वजनाचे अर्धगोल ते चपट्या आकाराचे आणि फिकट रंगाचे असतात. या जातींचे उत्पादन दर हेक्टरी 40 ते 50 टन इतके मिळते. उदा. पुसा ड्रम हेड, लेट ड्रम हेड सप्टेंबर या पानकोबीच्या उशिरा येणार्या जाती आहेत. गड्ड्यांच्या आकारावरून पानकोबीच्या जातींची खालीलप्रमाणे तीन गटांत विभागणी करतात.
अ)गोल गड्ड्यांच्या जाती : उदाहरणार्थ : गोल्डन एकर, प्राइड ऑफ इंडिया, एक्स्प्रेस, श्रीगणेश गोल्ड इ.
ब) चपट्या गड्ड्याच्या जाती : (गड्डे उशिरा तयार पण उत्पादन जास्त)
उदाहरणार्थ : पुसा ड्रम हेड, लेट ड्रम हेड
क) उभट गड्ड्याच्या जाती : या प्रकारात चार्ल्ससन वेकफील्ड, जर्सी या जाती प्रसिद्ध आहेत. तसेच कल्याणी, सिलेक्शन 9.
संकरित जाती (हायब्रीड)
1) कावेरी
बेंगळुरू इथे इंडो-अमेरिकन सीड कंपनीने विकसित केली.
जास्तीत जास्त तापमान सहन करू शकते.
पाने निळसर व हिरव्या रंगाची असून गड्डे घट्ट असतात.
कालावधी (65 ते 70 दिवस)
दर हेक्टरी उत्पादन 50-75 टन
2) तांबडा कोबी (रेड कॅबेज)
गडव्यावर तांबड्या किंवा जांभळसर रंगाची झाक असते.
परस बागेत लावण्यासाठी चांगली.
भारतात या कोबीचा प्रकार अद्याप परिचित नाही.
3) चायनीज कॅबेज
बहुतेक जाती चीनमधून आलेल्या आहेत.
सॅलड म्हणून वापर
4)रोपे तयार करणे :
बीजप्रक्रिया : 50 ते 100 ग्रॅम बियांसाठी 20 ते 20 मिली जर्मिलेटर आणि 15 ते 20 ग्रॅम प्रोटेक्टंची पेस्ट बनवून बियाणास चोळतात व नंतर लागवड करावी. गादीवाफ्याच्या रुंदीशी समांतर 5 ते 6 सें.मी. अंतरावर पुरेल अशा तर्हेने बियाणे विरळ पेरावे. साधारणपणे एका चौरस मीटरला 5 ग्रॅम बियाणे पडेल अशा तर्हेने बियाणाची लागवड करावी. साधारणपणे 2 ते 5 आठवड्यांत कोबीची रोपे लागवडीसाठी तयार होतात.
हंगाम, बियाणाचे प्रमाण आणि अंतर : कोबी लागवडीसाठी अनुकूल हवामानाबरोबर बाजारभाव बाजारात मालाला असलेली मागणी, उठाव आणि किड या रोगांची लागण या गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे. बेताचा पाऊस (500-700 मिमी) आणि सरासरी तापमान 20 अंश सें. कमी असल्यास कोबीची लागवड महाराष्ट्रात खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात करता येते. ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत रोपांची लागवड केल्यावर भरपूर उत्पादन मिळते आणि मालाचा दर्जासुद्धा उत्तम मिळतो. किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. परंतु बाजारभाव साधारण कमी मिळतो, तर जुलै-ऑक्टोबर या काळातील लागवडीस बर्यापैकी बाजारभाव मिळतात. रब्बी हंगामात सप्टेबर-ऑक्टोबर आणि उन्हाळी हंगामासाठी जानेवारी महिन्यात रोपे तयार करावीत.
बियाणे :
खरीप हंगामातील लागवडीसाठी हळव्या जातींचे सुमारे 500 ग्रॅम बियाणे लागते. गरव्या जातीचे 300 ते 400 ग्रॅम बियाणे लागते, तर संकरित जातीचे एक हेक्टर लागवडीसाठी 200 ते 250 ग्रॅम बी पुरेसे होते.
रोपवाटिकेला नियमित पाणी देणे आवश्यक आहे. मात्र, कोबीवर्गीय भाजीपाला पिकाच्या रोपांना जास्त पाणी देऊ नये. तणांचा वेळोवेळी बंदोबस्त करावा. रोपवाटिकेतील कोवळ्या रोपांवर काळी माशी (मस्टर्ड सॉल फ्लाय) आणि हिरवी अळी (फ्लो बीटल) या किडींचा प्रामुख्याने उपद्रव होतो. त्यांच्या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात 10 मिली झुवाक्रॉन आणि रोगार+10 ग्रॅम बाविस्टीन+अर्मिनेटर, थ्राईवर प्रत्येकी 25 मिली आणि 20 ग्रॅम प्रोटेक्टेट या प्रमाणात मिसळून दर 10 दिवसांच्या अंतराने रोपवाटिकेत फवारणी करावी.
बियाणांच्या पेरणीनंतर हंगामानुसार 3-4 आठवड्यांत रोपे लागवडीसाठी तयार होतात. रोपांची आटोपशीर वाढ मध्यम आकाराचा गड्डा आणि लवकर काढणीला येणार्या जातींसाठी 45 बाय 45 सें.मी/30 बाय 30 सें.मी. अंतर ठेवावे. रोप लावताना मुळ्या जमिनीत सरळ राहतील अशा तर्हेने रोपांची लागवड करावी. लागवडीनंतर लगेच हलके पाणी द्यावे. लागवडीनंतर दुसर्या किंवा तिसर्या दिवशी आंबवणी द्यावी.
पानकोबीवरील काही महत्त्वाचे रोग :
1)करपा (ब्लॅक स्पॉट) : या बुरशीजन्य रोगाचा प्रसार बियाणात वाढणार्या बुरशीपासून होतो. बुरशीचा प्रादुर्भाव झालेल्या रोपांची पाने, देठ आणि खोडांवर वर्तुळाकार किंवा लंबगोल काळसर रंगाचे डाग दिसू लागतात. नंतर हे डाग एकमेकांत मिसळून लागण झालेला सर्व भाग करपल्यासारखा काळपट रंगाचा दिसतो. कोबी आणि फुलकोबीच्या तयार गड्ड्यांवर तसेच बियाणे तयार होण्याच्या काळात रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. अशा रोगट झाडांपासून तयार झालेल्या बियाणातून रोगाचा प्रसार होतो.
उपाय : वरील रोगाच्या नियंत्रणासाठी रोगाला पोषक हवामान आढळून आल्यास किंवा रोगाची प्राथमिक लक्षणे दिसताच पिकावर 1% बोर्डो मिश्रण फवारावे किंवा 10 लि. पाण्यात 25 मली. थ्राईवर +25 मिली क्रॉपशायनर + 25 ग्रॅम डायथेन एम-45 हे औषध मिसळून 10 दिवसांच्या अंतराने 2 फवारण्या कराव्यात.
2)भुरी (पाउड्री मिलड्यू) : कोबीवर्गीय पिकांवर भुरी हा बुरशीजन्य रोग क्वचितप्रसंगी आढळतो. सुरुवातीला पानांच्या वरच्या बाजूला पांढर्या रंगाचे ठिपके दिसतात. काही काळाने संपूर्ण पानावर करड्या रंगाची बुरशी वाढलेली दिसते.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगाची लागण दिसून येताच 10 लि. पाण्यात थ्राईवर 25 मिली+25 ग्रॅम पाण्यात विरघळणारे गंधक मिसळून फवारणी करावी.
3)गूळकुजव्या (क्लबरूट) : या बुरशीजन्य रोगामुळे झाडांच्या मुळांवर अनियमित गाठी तयार होतात. झाडाची पाने पिवळी पडतात आणि सुकतात. ज्या जमिनीचा सामू 7 पेक्षा कमी आहे अशा जमिनीत या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळतो.
उपाय : जमिनीत चुना टाकून जमिनीचा आम्ल-विम्ल निर्देशांक वाढवावा. रोपांच्या लागवडीपूर्वी रोपे जमिनीवर जर्मिनेटर, 10 मिली आणि 2 ग्रॅम बाविस्टीन 1 लि. पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात बुडवून नंतर रोपांची लागवड करावी.
वरील कीड व रोगांवर प्रतिबंधात्मक उपाय व जोमदार पिकाच्या वाढीसाठी तसेच दर्जेदार अधिक उत्पादनासाठी डॉ. बम्माकर टेक्नॉलॉजीचा खालीलप्रमाणे फवारण्या कराव्यात.
फवारणी :
1)पहिली फवारणी : (लागवडीनंतर 10 ते 15 दिवसांनी.) जर्मिनेटर 250 मिली +थ्राईवर 250 मिली+क्रॉपशायनर 250 मिली+प्रोटेक्टंट 100 ग्रॅम+ प्रिझम 100 मिली +100 लि. पाणी
2)दुसरी फवाणी : (लागवडीनंतर 25 ते 30 दिवसांनी) जर्मिनेटर 350 मिली+क्रॉपशायनर 750 मिली. +प्रोटेक्टंट 250 ग्रॅम +प्रिझम 250 मिली+ न्यूट्राटोन 250 मिली+150 लि. पाणी
3)तिसरी फवारणी : (लागवडीनंतर 40 ते 45 दिवसांनी) थ्राईवर 750 मिली+क्रॉपशायनर 750 मिली+रायपनर 500 मिली+प्रोटेक्टंट 500 ग्रॅम+ न्यूट्राटोन 500 मिली+200 मिली. पाणी.
4)चौथी फवारणी : (लागवडीनंतर 55 ते 60 दिवसांनी) थ्राईवर 1 मिली+ क्रॉपशायनर 1 लि. +राईपनर 750 मिली + न्यूट्राटोन 750 मिली+250 लि. पाणी.
काढणी आणि उत्पादन :
रोपांच्या लागवडीपासून पानकोबीच्या हलक्या जातींची काढणी 60 ते 70 दिवसांनी सुरू होते. संकरित जातींचे सर्व गड्डे एकाच वेळी तयार होत असल्यामुळे 8 ते 10 दिवसांतच संपूर्ण पिकाची काढणी होते. निमगरच्या (मध्यम कालावधीच्या) जातींचे गड्डे 80 ते 90 दिवसांनी काढणीसाठी तयार होतात, तर गरव्या जाती रोपांच्या लागवडीनंतर 100 ते 115 दिवसांनी गड्डे काढणीला तयार होतात.
पानकोबीचे तयार गड्डे अंगठ्यांनी किंवा तळहातांनी दाबल्यास घट्ट लागतात. असे घट्ट आणि पूर्ण तयार गड्डे बाहेरच्या तीन-चार पानांसकट कापून टाकावेत. काढलेले सर्व गड्डे लगेच सावलीत हलवून त्यातून किडलेला खराब माल निवडून वेगळा करावा.
गड्ड्याचा घट्टपणा, आकार आणि वजन लक्षात घेऊन मालाची दोन किंवा तीन गटांत प्रतवारी करावी. गड्ड्याचे लांब दांडे व भोवतालची वाळलेली, किडलेली आणि पिवळी पाने असल्यास ती छाटून टाकावीत. अशा निवडक माल प्रतवारीप्रमाणे मोठ्या करंड्यातून किंवा गोण्यांमध्ये भरून बाजारात विक्रीसाठी पाठवावा. कोबीचे गड्डे वाहतुकीत चांगला टिकाव धरत असेल तर मालाची हाताळणी जपून करावी, आदळआपट टाळावी.
Agrojay Innovations Pvt. Ltd.
Comments
Post a Comment