कोरफड लागवड
कोरफड लागवड
कोरफड ही वनस्पती कुमारी, कुवारकांड या नावाने ही वनस्पती सर्वपरिचित आहे. लिलियाशी या कुळातील ही बारमाही उष्णदेशीय वनस्पती असून हिचे उत्पत्तिस्थान वेस्ट इंडीज आहे. आफ्रिका, अरबी द्वीपकल्प, दक्षिण आशिया येथे उगवणारी ही एक बहुवार्षिक औषधी वनस्पती आहे. आफ्रिका, चीन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया हे कोरफडीचे उत्पादन करण्यामध्ये अग्रेसर देश आहेत. या वनस्पती मुख्यत: कॉस्मेटिक कंपन्या, औषधी, अन्न इत्यादी मध्ये प्रामुख्याने वापरल्या जाते.
पाने जाड मांसल असून पानामध्ये पाणी गराच्या रूपात साठवलेले असते. पाने लांबट असून खोडाभोवती गोलाकार वाढतात. पानांची लांबी ४५ ते ६० सें.मी. आणि रुंदी ५ ते ७ सें.मी. असते. पानाच्या कडांना काटे असहवामान -
कोरफड हे एक उबदार उष्णकटिबंधीय पिक असल्याने कोरफडीला उष्ण व कोरडे हवामान अनुकूल असते. हि वनस्पती विविध प्रकारच्या वातावरणामध्ये जगू शकते. कमी पाउस पडणाऱ्या क्षेत्रात तसेच उबदार दमट वातावरणामध्ये ही वनस्पती चांगल्या प्रकारे येऊ शकत असल्यामुळे कमी पावसाच्या प्रदेशात याची लागवड करता येते. अत्यंत थंड प्रदेशामध्ये ही वनस्पती तग धरू शकत नाही.
जमिन :
कोरफड ही विविध प्रकारच्या मातीमध्ये लागवड करता येते. तथापि, हलकी ते मध्यम, वालुकामय व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकास उत्तम असते. पाणी साठून राहणारी जमीन या पिकासाठी अत्यंत संवेदनशील आहे. चांगला निचरा केलेल्या काळ्या कापसाच्या मातीमध्ये या पिकाची वाढ लवकर होते. जमिनीचा सामू ८.५ च्या वर असल्यास तसेच खारट जमिनीमध्ये या पिकाची लागवड करू नये. टांगलेले कोरफडीचे रोप मातीशिवाय नुसत्या हवेमध्ये जगू शकते.तात. झाडाच्या मध्यातून एक लालसर उभा दांडा निघतो व त्यावर केशरी रंगाची फुळे घोसाने येतात.
व्यावसायिक प्रजाती :
एलो बार्बीडेन्सीस, पर्फोलियाटा, चीनेन्सीस, लीट्टोरालीस, इंडिका, अबायसिनिका, व्हुल्गारसी, एएल-१, आयसी १११२६९, आयसी १११२७१, आयसी १११२८०, इत्यादी.
लागवड :
कोरफडीची अभिवृद्धी फुटव्या-मुनव्यांपासून करतात. पावसाळा सुरू होताच म्हणजे जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये लागवड पूर्ण करावी. लागवडीसाठी जमीन नांगरून, कुळवून भुसभुशीत करावी. एकरी ५ ते ८ टन चांगले कुजलेले शेण व लेंडी खत मिसळावे. जमिनीच्या मगदुरानुसार योग्य आकाराचे सपाट वाफे किंवा सरी-वरंबे तयार करावेत. लागवड करतांना दोन ओळीत ६० किंवा ७५ सें.मी. व दोन झाडात ४५ किंवा ६० सें.मी. अंतर ठेवावे. लागवड केलेल्या वाफ्यात किंवा वरंब्यावर पानांच्या वजनामुळे कोरफड कोलमडू नये म्हणून वेळोवेळी गरजेनुसार मातीचा आधार द्यावा. पिकाच्या वाढीच्या काळात एक-दोन खुरपण्या करुन वाफे तणरहीत ठेवावेत. बुंध्याजवळील माती भुसभुसशीत ठेवल्याने झाडाची वाढ चांगली होत असल्याचे निदर्शात आलेले आहे.
अन्नद्रव्ये व्यवस्थापन :
कोरफड ही औषधी वनस्पती असल्याने त्यात रासायनिक खतांचा वापर टाळून गांडूळ खत व निंबोळी खताचा वापर करावा. जमीन हलकी असल्यास, रासायनिक खते द्यायची असल्यास माती परीक्षणानुसार प्रति एकरी १५ किलो नत्र, १० किलो स्फुरद व १० किलो पालाश द्यावे.
पाणी व्यवस्थापन :
जमिनीच्या मगदुरानुसार व पिकाच्या अवस्थेनुसार पिकास पाणी द्यावे. पावसाळ्यात व हिवाळ्यात कोरफडीस पाण्याची जास्त आवश्यकता नसते. याउलट उन्हाळ्यात सर्वसाधारणपणे १२ ते १५ दिवसातून एकवेळ पाणी द्यावे लागते.
पिक संरक्षण :
पानावर काळे ठिपके, मूळकूज, करपा या रोगांचा तर पिठ्या ढेकुण, वाळवी या किडींचा प्रार्दुभाव कोरफड पिकावर आढळून येतो. पानावर काळे ठिपके या रोगाच्या नियंत्रणासाठी गंधकयुक्त बुरशीनाशकांचा वापर करावा.
कापणी व उत्पादन :
पानाचे टोक किंवा पानाचा रंग पिवळसर झाल्यानंतर, पूर्ण वाढ झालेल्या पानांची साधारणतः लागवडीनंतर १४ ते १६ महिन्यांनी कापणी करतात. वर्षाला सुमारे दोन कापण्या करतात. एक कापणी ऑगस्ट महिन्यामध्ये तर दुसरी कापणी जानेवारी महिन्यामध्ये केली जाते. सर्वसाधारणपणे एकरी ५ ते ८ टन ओली पाने मिळतात. काढणीपूर्वी झाडास पाणी दिल्यास पानातील पाण्याचे प्रमाण वाढते. कोरफडीची गुणवत्ता पानांच्या आकारावर व मांसलपणावर आधारित नसून त्यामध्ये असलेल्या ‘ऍलोइन' या औषधी तत्त्वावर अवलंबून असते. म्हणून कोरफड काढण्यापूर्वी एक महिना अगोदर पाणी तोडावे. मागणीनुसार कंपनीच्या वेळेमध्ये बदल करतात. कापणी करताना मुख्य झाडाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. सुमारे चार ते पाच वर्षांनी हे पीक पुन्हा लावावे लागते. कमी मेहनत व कमी खर्चात उत्पादन व उत्पन्न मिळत असल्याने इतर पिकांच्या तुलनेत कोरफड किफायतशीर ठरते. कोरफड प्रक्रियेतून सरबत, ज्यूस बनवून जास्त आर्थिक फायदा करून घेतला जावू शकतो.
कोरफड ही शीतल, कडू, मधुर, पुष्टीकर, बलकर व विशेष गुणधर्माची आहे. कोरफडीपासून कुमारी आसव बनवितात. हे शारीरिक अशक्तपणा, खोकला, दमा, क्षय यासारखे आजार बरे करण्यासाठी उपयोगी आहे. कोरफडीपासून बनविण्यात येणारे तेल केसांना चकाकी आणण्यासाठी उपयोगी आहे. त्वचेचा दाह होत असल्यास कोरफडीचा गर लावतात. हा गर पोटदुखी, अपचन, पित्तविकार यावर सुध्दा उपयोगी आहे. डोळ्यांच्या विकारावर तसेच भाजल्यामुळे झालेल्या जखमेवर कोरफडीचा गर उपयोगी आहे. सौदर्यवृध्दीसाठी कोरफडीच्या गराचा उपयोग करतात. कोरफडीत एवढे औषधी गुण आहेत की प्रत्येक घरात कोरफड असलीच पाहिजे.
बाजारपेठेच्या मागणीवरच कोरफड उत्पन्नाची हमी असते. म्हणून स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करून लागवड करणे योग्य होईल. स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करूनच कोरफड लागवडीचा विचार करावा. कोरफड शेती करताना अनेक शेतकरी कंपन्यांशी करार पद्धतीने शेती करतात; परंतु यामधून लागवडीनंतर फसवणूक झाल्याची अनेक उदाहरणे आपल्या समोर असल्याने बाजारपेठ व प्रक्रिया उद्योजकांशी ठराव करून, योग्य काळजी घेऊनच कोरफड लागवड करावी. लागवड करण्यापूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे.
Agrojay Innovations Pvt. Ltd.
Comments
Post a Comment