ऑइल पाम ची लागवड

ऑइल पाम ची लागवड Agrojay Innovations Pvt. Ltd. (Download Agrojay Mobile Application: http://bit.ly/Agrojay ) ऑइल पामया वृक्षाला मराठीत “तेल माड” असे संबोधले जाते. सुमारे ६-२४ मीटर उंच, उपयुक्त, शोभिवंतआणिनारळासारखा हा सरळ वृक्ष.बहुवर्षीय पिकांपैकी सर्वात जास्त तेल उत्पादन देणारे पिक असल्याने “गोल्डन पाम” या नावाने संभूषण.ऑइल पाम हा मूळचा उष्ण कटिबंधीय, पश्चिम व मध्य आफ्रिकेतील असून तेथे तो जंगलात व समुद्रकिनारी आढळतो. ऑइल पामचे शाखाहीन खोड भरभक्कम असून त्यावर खोलगट वलये असतात. शेंड्याकडे संयुक्त व पिसासारख्या, मोठ्या, काटेरी देठाच्या भरपूर पानांचा झुबका असतो व प्रत्येकावर ५०-६०, तलवारीसारखी लांब, टोकदार व जाड दले असतात. शेंड्यांकडे पानांबरोबरच आखूड आणि जाड फुलोरे येतात. ते एकाच वेळी ३ ते ७ असून नर-फुलोरे प्रथम व स्त्री-फुलोरे नंतर येतात. फुले एकलिंगी व एकाच झाडावर असून त्यांची संरचना सामान्यपणेपामकुलात ...