सिंचनाकरिता चुंबकीय पाणी तंत्राचा वापर

सिंचनाकरिता चुंबकीय पाणी तंत्राचा वापर

Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download Agrojay Mobile Application: - http://bit.ly/Agrojay)

मागील काही वर्षांमध्ये कमी झालेल्या पावसामुळे जमिनीतील क्षार धुऊन जाण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. जमिनीच्या पृष्ठभागावर ते साचत गेल्याने गंभीर समस्या उत्पन्न झालेली आहे. नदीकाठचे तसेच कॅनॉल काठच्या सिंचनाखालील क्षेत्रातील जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे. भूगर्भातील पाण्यातही क्षारांचे प्रमाण वाढलेले आहे. क्षारयुक्त पाण्याचा सिंचनासाठी वापर केल्यास पाण्यातील विद्राव्य क्षार जमिनीत शोषले जाऊन त्यांचे प्रमाण वाढत जाते. अशा क्षारयुक्त जमिनीत पाणी आणि अन्नद्रव्ये यांचे पिकाकडून शोषण होत नाही. त्यामुळे या अश्या पाण्याचा वापर प्रक्रिया करूनच सुरक्षित पद्धतीने करायला हवा.

क्षारयुक्त पाण्याचे पिकांच्या व मानवाच्या आरोग्यावर होणारे परिणाम-

क्षारांचा मुळांवर विषारी परिणाम होऊन मुळांची टोके मरतात, पिकांची वाढ खुंटते.बियाण्याची उगवण कमी होते.जमिनीत अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी होऊन सुपीकता घटते. पीक वाढीसाठी आवश्यक अशा नत्र, जस्त, लोह यांची उपलब्धता कमी होते.उत्पादन कमी होते व उत्पादीत शेतमालाची गुणवत्ता खालावते.जमिनीच्या पृष्ठभागावर पाणी पिकांना प्राणवायू उपलब्ध होऊ देत नाही व जमिनीचा सामू वाढतच जातो.दीर्घकाळ वापर केल्यास जमिनीत जडधातू साचून ते पिकांवाटे मानवी आहारातून प्रवेश करू शकतात. अश्या पिकांमध्ये ऑक्झलेटचे प्रमाण जास्त असल्याने पाण्यातील कॅल्शियम, सोडियम सारख्या क्षारांबरोबर संयोग होऊन क्षारखडे मुत्राक्षयात तयार होतात.जास्त क्षारयुक्त पाणी मनुष्याच्या पिण्यात आले तर मुतखड्याचे आजार जडतात. सिंचन पाणी क्षारयुक्त होण्याची मुख्य कारणे –

सिंचन पाण्याचे प्रयोगशाळेतून परिक्षण करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. शेतीसाठी वापरण्यात येणारया पाण्याचा सामू हा 6.5 ते 8.0 पर्यंत असावा तर विद्युत वाहकता म्हणजे पाण्याची क्षारता ही 0.75 डेसीसायमन प्रति मीटर पेक्षा कमी असावी. ठिबक सिंचनासाठी पाण्याची विद्युत वाहकता (क्षारता) ही 3.12 डेसीसायमन प्रति मीटर किंवा टीडीएस 2000 पीपीएम पेक्षा जास्त असल्यास अयोग्य समजले जाते. त्यामुळे ठिबक सिंचनाच्या तोटयामध्ये क्षारांचे खडे होऊन ठिबक संचाची कार्यक्षमता कमी होते. आपल्या भागातील पाणी क्षारयुक्त होण्याची काही कारणे खालिलप्रमाणे…कमी झालेले पावसाचे प्रमाणसिंचनासाठी पाण्याचा शेतीसाठी अमर्याद वापरजमिनीतील कमी झालेले सेंद्रिय कर्बपिक पद्धतीमध्ये बदल नसणेशिफारशींपेक्षा अधिक रासायनिक खतांचा वापरजमिनींना निचऱ्याचा अभावक्षारपड जमिनींचे वाढत असलेले क्षेत्रचुंबकीय पाणी –आपण सर्व हे जाणतोच की पाण्याचा रेणू हा दोन हायड्रोजन अणू व एक ऑक्सिजन अणूपसून बनलेला असतो. निसर्गामध्ये केवळ शुद्ध पाणी अस्तित्त्वात नाही. त्यामध्ये नेहमी इतर पदार्थ विशेषत: खनिजांचे क्षार विरघळलेले असतात. निरोगी सजीव सृष्टीकरिता पाण्यामध्ये संतुलित प्रमाणात खनिजे असणे आवश्यक असते. तथापि, पाण्यात विरघळलेल्या क्षारांच्या टक्केवारीनुसार पाण्याचे ‘जड’ किंवा ‘हलके’ प्रकारात वर्गीकरण केले जाते. मुळात, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारख्या खनिज पदार्थांचे पाण्यातील जास्त प्रमाण पाण्याला ‘जड’ म्हणजेच क्षारयुक्त (मचूळ) बनवते. अश्या क्षारयुक्त पाण्यात मोठ्या प्रमाणात लोह, मँगनीज, सोडियम, बायकार्बोनेट्स आणि सल्फेट मोठ्या प्रमाणात आढळतात. अनेक पाण्याचे व विविध क्षारांचे रेणू मिळून पाण्याचे मोठे-मोठे पुंजके तयार होतात. असे हे आकाराने मोठे बनलेले पुंजके वनस्पती पेशी भित्तिकेतून आत सुरळितपणे किंबहुना प्रवेश करत नाहीत. यामुळे पिकाला कितीही प्रमाणात सिंचन पाणी दिले तरी प्रत्यक्षात ते पिकाला मिळत नाही. परिणामी पिकाची वाढ खुंटते, पिक वाळून जाते, उत्पादन कमी होते, शेतमालाची गूणवत्ता खालावते. असे पाणी फवारणीद्वारे वापराकरिताही  अयोग्य असते.


चुंबकीय पाण्याचे फायदे –


शेती उत्पादनात १०-३० टक्के वाढ होते.शेतमालाची गुणवत्ता व प्रत सुधारते. फळांचा आकार वाढतो; रंग सुधारतो.शेतीत पेरलेल्या बियाणाची उगवण क्षमता वाढते.बहूवर्षिय पिकांच्या मुळांची वाढ अधिक प्रमणात होते.पिकाचा काढणी कालावधी कमी होतो.नाशवंत शेतमालाचा काढणी पश्चातचा टिकवण कालावधी वाढतो.पिकांची जैविक-अजैविक ताण सहन करण्याची क्षमता वाढते.जमिनीची पाणी शोषून घेण्याची तसेच निचरा करण्याची क्षमता वाढते.जमिनीचा सामू योग्य होण्यास मदत होते.शेतीला लागणाऱ्या पाण्यामध्ये ३० टक्क्य़ांपर्यत बचत होते.पाण्यामधील क्षारांचे अतिशय सूक्ष्म क्षारांमध्ये रुपांतर झाल्यामुळे पाईप व नळ्या स्वच्छ राहतात. ठिबक/तुषारसंच ब्लॉक होत नाही. पाण्यामधील क्षार पाईपला चिकटत नाहीत. ते पाण्याबरोबर पुढे जातात.चुंबकीय पाणी पाजल्यामुळे गाई, म्हशी यांच्या दुधांच्या गुणवत्तेमध्ये वाढ दिसून आली आहे. तसेच पोल्ट्री फार्ममधील पक्षांचे वजन वाढल्याची नोंद आहे. सिंचनाकारिता क्षारयुक्त पाणी असल्यास करावयाच्या आणखी काही ऊपाययोजना –






इस्राईल या आधुनिक शेतीमध्ये अतुलनीय कार्य करणारया देशाने क्षारयुक्त पाण्यावर ऊपाय म्हणून ही चुंबकीय पाणी पद्धत विकसित केलेली आहे. इजिप्त, स्पेन, अरब देश या प्रणालीचा शेतीमध्ये अवलंब करत आहे. याकरिता वापरण्यात येणारया उपकरणामध्ये  फीड पाईपच्या अक्षासोबत आतिल बाजूने सममितीयपणे दोन चुंबकीय रॉड जास्तीत जास्त चुंबकीय क्षेत्र निर्माण करतिल या पद्धतीने बसविलेले असतात. पाण्याच्या प्रवाहाची दिशा चुंबकाच्या उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे असेल अश्या अनुषंगाने मुख्य झडप आणि सिंचन पाईपादरम्यान हे उपकरण बसवावे. साधारणपणे 3.5 ते 136 मिलीटेस्ला ध्रुवीकरण क्षमता असणारया चुंबकांचा याकरिता वापर केला जातो.

या प्रक्रियेमध्ये पाण्याचे रासायनिक गुणधर्म बदलत नाहीत; परंतु द्रव पाण्याची रचना आणि गुणधर्म बदलतात. यामध्ये चुंबकीय ऊर्जेच्या माध्यमातून तयार होणारया कंपणांद्वारे क्षारयुक्त पाण्याच्या रेणूचे समान सहा भागांमध्ये परावर्तन केले जाते. म्हणजेच अनेक पाण्याचे रेणू व विविध खनिजांच्या क्षारांच्या रेणूपासून तयार झालेल्या मोठ्या आकाराच्या पुंजक्यांचे छोट्या-छोट्या पुंजंक्यांमध्ये रुपांतर होते. पाण्यामधील क्षार पाण्यातून वेगळे न होता या क्षारांचे रुपांतर अतिशय सूक्ष्म अशा खनिजांच्या रेणूंमध्ये होते. या दोन्ही गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे कमी पाण्यामध्ये पिकाचे सिंचन व पाण्यामधील खनिजांचे पिकाकडून अतिशय चांगल्या प्रकारे शोषण होते.


सिंचनातील बदल – क्षारयुक्त पाणी चांगल्या पाण्यात मिसळून पिकांना दयावे किंवा आलटून पालटून दयावे. क्षारयुक्त पाण्याचा वापर अमर्याद न करता मर्यादित हलके परंतु वारंवार दयावे. पिकांना पाणी देण्यासाठी सुधारित सिंचन पद्धतींचा; ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करावा.

आच्छादन – जमिनीत दिलेल्या पाण्याचे उन्हामुळे अधिक प्रमाणात  बाष्पीभवन क्रिया घडून क्षार जमिनीच्या पृष्ठभागावर येतात. जमिनीवर आच्छादन केल्यास बाष्पीभवनाची हि प्रक्रिया मंदावते व क्षार जमा होण्याचे प्रमाण कमी होते. मल्चिंग पेपर, शेतातील तण, शेतमालाचे निरुपयोगी घटक, उसाचे पाचट, भुसा, काड, इ. वापरून आच्छादन करावे.

पिकांची लागवड – एकसारख्या पीक पद्धतीचा अवलंब न करता पीक पद्धतीमध्ये बदल करत रहावा. पिकांची लागवड सपाट वाफ्यात न करता सारी वरंबा पद्धतीने करून लागवड वरंब्याच्या बगलात करावी. पेरणीसाठी शिफारशीपेक्षा 15 ते 20 टक्के जास्त बियाणांचा वापर करावा. मुग, उडीद, चवळी, तीळ, वाटाणा, घेवडा आणि लिंबूवर्गीय फळपिके इ. क्षार संवेदनशील पिकांची लागवड न करता गहु, मका, बाजरी, ज्वारी,  सोयाबीन, कपाशी, ऊस, कोबी, वांगे, पालक, आवळा, पेरू, चिकू, इ. क्षार प्रतिकारक पिकांची लागवड करावी. काळ्या खोल जमिनीस बाजूने चर खोदून अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

सेंद्रिय कर्ब – दोन ते तीन वर्षातून एकदा तरी धैचा किंवा ताग जमिनीत पेरून नंतर फुले आल्यावर गाडावेत. प्रत्येक पिकास शिफारशीनुसार शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळखत इ. सेंद्रिय खतांचा वापर करावा.

बाजारपेठेमध्ये या प्रकारची अनेक उपकरणे विक्रीकरिता उपलब्ध असून त्यांची उपयुक्तत्ता तपासूनच खरेदी करावीत. या प्रणालीला अंदाजे हेक्टरी 35 ते 80 हजार खर्च येतो. चुंबकीय उपकरणांना तांत्रिक देखभाल करण्याची आवश्यकता नसते आणि त्यांना चालविण्याकरिता विद्युत उर्जेचीही आवश्यकता नसते. उत्तम दर्जाच्या उपकरणांचे आयुष्य किमान 25 वर्षे असते. जिरायत क्षेत्र असणारया तसेच अल्पभूधारक शेतकरयांनी एकत्र येवून गटाद्वारे हे उपकरण खरेदी केल्यास खर्चामध्ये बचत होऊ शकते. आजच्या काळात जेव्हा शेती व्यवसाय अत्यंत बिकट परिस्थिीतून जात आहे. त्या वेळी अत्यंत माफक किमतीत हे पर्यावरणाला हानिकारक नसणारे तंत्रज्ञान शेतकऱ्याला उपलब्ध व्हावे ही काळाजी गरज आहे.



(Download Agrojay Mobile Application: - http://bit.ly/Agrojay)




Comments

Popular posts from this blog

Agricultural Innovation in India

Technology in Agriculture: Feeding the Future

India Vs. World Farm Mechanization and Technology