रब्बी ज्वारी लागवडीचे नियोजन Planning for Rabbi sorghum cultivation
रब्बी ज्वारी लागवडीचे नियोजन
(Planning for Rabbi sorghum cultivation)
Agrojay Innovations Pvt. Ltd.
(Download Agrojay Mobile Application: - http://bit.ly/Agrojay)
जमीन : हलक्या आणि भारी जमिनीत हे पीक घेता येते.
जाती :
१)हलक्या जमिनीसाठी सिलेक्शन-3, फुले अनुराधा, तसेच मध्यम जमिनीसाठी फुले माऊली, फुले सुचित्रा, मालदांडी 35-1,
२)भारी जमिनीसाठी- फुले वसुधा, फुले यशोदा, सी एच व्ही. 22, पीकेव्ही क्रांती, परभणी मोती या जाती निवडाव्यात.
३)हुरड्यासाठी फुले उत्तरा व लाह्यांसाठी फुले पंचमी या जातींची निवड करावी. भारी जमीन बागायतीसाठी फुले रेवती जातीची निवड करावी.
रब्बी ज्वारी पेरणीपूर्वी मूलस्थानी जलसंधारण करावे. त्यासाठी उतारानुसार 10x12 चौ.मी. आकाराचे सपाट वाफे तयार करावेत. किंवा 2.70 मीटर अंतरावर उताराला आडवे सारा यंत्राने सारे पाडून दर 20 मीटरवर बळिराम नांगराच्या साहाय्याने दंड टाकावेत.
पेरणी : 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी.
बियाणे :
प्रतिहेक्टरी 10 किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास चार ग्रॅम गंधक (300 मेश) बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर प्रति 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्टर व 250 ग्रॅम स्फुरद विरघळविणारे जिवाणू खताची बीजप्रक्रिया करावी.
अंतर : पेरणीसाठी 45 x 15 सें.मी.
खते :
१) भारी जमिनीस एकूण 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश प्रतिहेक्टरी द्यावे. त्यापैकी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश पेरणीच्यावेळी पेरून द्यावे. उरलेले 50 किलो नत्र पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी द्यावे.
२)मध्यम जमिनीस 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 40 किलो पालाश द्यावा. त्यापैकी अर्धा नत्र संपूर्ण स्फुरद व पालाश पेरताना द्यावा व उर्वरित 50 टक्के नत्र पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी द्यावा.
३)कोरडवाहू हलक्या जमिनीतील पिकासाठी हेक्टरी 25 किलो नत्र पेरणीच्यावेळी पेरून द्यावे.
ज्वारी पीक पेरणीसाठी दोन चाडी पाभरीचा वापर करावा.
Agrojay Innovations Pvt. Ltd.
Comments
Post a Comment