घड निर्मितीसाठी द्राक्ष वेलींना पोषक घटक (Nutrients for grapevines for bunch formation)

ड निर्मितीसाठी द्राक्ष वेलींना पोषक घटक(Nutrients for grapevines for bunch formation)

Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download Agrojay Mobile Application: - http://bit.ly/Agrojay)
Agrojay Towards Farmers Prosperity

खरड छाटणीनंतर द्राक्ष काड्यांच्या डोळ्यांमध्ये घड निर्मिती होणे ही मोठी शरीरशास्त्रीय गुंतागुंतीची क्रिया असते. छाटणीनंतर काड्या फुटू  लागल्यावर त्यामधील डोळ्यांमध्ये घड  निर्मितीची  क्रिया चालू होते.  आपल्या हवामानामध्ये पहिल्या तीन डोळ्यांमध्ये फार कमी घड निर्मिती होते.  ओलांड्या  पासून पहील्या  तीन डोळ्या पर्यंत घड निर्मिती नाही म्हटले तरी चालेल,  परंतु पाचव्या  ते आठव्या  डोळ्यांपर्यंत मात्र आपल्याला हमखास घड  निर्मिती मिळते. द्राक्ष काडीच्या  डोळ्यांमध्ये घड बनवायचा की  बाळी हे त्यावेळचे तापमान व सूर्यप्रकाश हे वातावरणीय घटक ठरवत असतात. तर त्याच वेळी वेलीचे पोषण व पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे असते, अन्यथा घड  तयार होण्याऐवजी बाळीत  रूपांतर होते.  खरड छाटणीनंतर पहिल्या तीस दिवसापर्यंत  नत्र, स्फुरद व पालाश या  अन्नद्रव्यांची कमतरता भासू देऊ नये. वेलीच्या  वाढीसाठी नत्राची आवश्‍यकता असते.  फल धारक डोळे तयार करण्यासाठी फॉस्फरसची  आवश्यकता लागते. किड व रोग प्रतिकार शक्ति साठी पालाशची  आवश्यकता असते.  त्यामुळे पहिल्या तीस दिवसापर्यंत नत्र, स्फुरद व पालाश ही तिन्ही मुख्य अन्नद्रव्य समप्रमाणात वेलीच्या  जोम   व माती परीक्षणानुसार वापरावीत.  खरड छाटणी नियमावलीमध्ये दिल्याप्रमाणे खतांच्या मात्रा द्याव्यात. जास्त तीव्रतेचा सूर्यप्रकाश  काडीच्या  डोळ्यावर अधिक   तापमानामध्ये पडल्यावर तसेच पाणी व अन्नद्रव्यांचा समतोल साधल्यावर फलधारक  डोळे तयार होण्यास कोणतीच अडचण येत नाही.  म्हणूनच सर्व द्राक्ष बागायतदारांना विनंती आहे की  सबकेनच्या  वेळेसच काड्यांची विरळणी करून सूर्याच्या दिशेने वाढणाऱ्या प्रतिचौरस फुटाला  एक याप्रमाणात काड्या ठेवाव्यात.
Agrojay Towards Farmers Prosperity

(Download Agrojay Mobile Application: - http://bit.ly/Agrojay)
Agrojay Innovations Pvt. Ltd.






Comments

Popular posts from this blog

Agricultural Innovation in India

Technology in Agriculture: Feeding the Future

India Vs. World Farm Mechanization and Technology