मराठी- वाल, हिंदी-पापडी, इंग्रजी – बाड बीन.

मराठी- वाल, हिंदी-पापडी, इंग्रजी – बाड बीन.
Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download Agrojay Mobile Application: - http://bit.ly/Agrojay)
Agrojay Towards Farmers Prosperity

हवामान आणि जमिन :

वालाचे पीक हे प्रामुख्याने दमट हवामानात येते. शास्त्रीय वाढ ही खरीप हंगामात चांगली होते. वालास फुले आणि शेंगा लागण्यासाठी कोरडे आणि मध्यम हवामान आवश्यक असते. काही प्रकार उष्ण आणि कोरड्या हवामानात उत्तम येतात.
वालासाठी मध्यम, पोयट्याची आणि उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. हलक्या जमिनीत वाढ कमी वेळात होते. पण फुलेही लवकर लागतात. फुलांचे आणि शेंगांचे उत्पादन मात्र फारच कमी येते. भारी खोल आणि काळ्या जमिनीत फांद्यांची वाढ जोमाने आणि पुष्कळ दिवस चालू राहते. फुले आणि शेंगा उशिराने आणि कमी लागतात. तसेच शेंगाची गुणवत्ताही कमी होते.


प्रकार आणि जाती : 

1. काळ्या दाण्यांचे साल

2. खाकी रंगाच्या दाण्यांचे वाल
3. पांढरट रंगाच्या दाण्याचे वाल
4. वेलीसारखे पसरणो वाल
5. झुडूपासारखे वाढणारे वाल

वालाच्या लागवडीखालील काही महत्त्वाच्या जाती:

1. दिपाली वाल
2. दसरा वाल
3. वाल नं. 6-5-24
4. कोईमतूर 1 (सी. ओ. 1)
5. कोईमतूर 2 (सी.ओ.1)
6. कोकण भूषण
7. हेब्बाल – 3
8. हेब्बल अव्हेर
9. पुना रोड
10. पुसा अर्ली प्रॉलीफीक
11. डी. एल. -269
Agrojay Towards Farmers Prosperity

पूर्वतयारी- लागवड- हंगाम : 

वालाची लागवड खरीपात तसेच हिवाळा संपून उन्हाळा सुरू होण्याच्या सुमारास करता येते. लागवडीपूर्वी जमीन नांगरून आणि कुळवाच्या पाळ्या देऊन तयार करावी. हेक्टरी 20 ते 25 बैलगाड्या म्हणजेच 10 ते 12 टन कुजलेले कंपोस्ट खत मातीत मिसळून घ्यावे. खरीप हंगामात कोरडवाहू पीक म्हणून घेता येते. त्यासाठी पाभरीने किंवा तिफणीने पेरणी करावी. काही भागात विशेष करून कोकणात पावसाचा जोर कमी झाल्यावर किंवा खरीप भाताची कापणी झाल्यावर खाचराच्या बांधावर वालाची लागवड केली जाते. ही लागवड टोकन पध्दतीने केली जाते. बी टोकन करण्यापूर्वी केलेल्या खड्डयात मुठभर शेणखत आणि नत्र, स्फुरदचे मिश्रण घालावे. वालाच्या हिरव्या आणि ताज्या शेंगांचे उत्पादन घेण्यासाठी जी लागवड केली जाते, त्यासाठी रुंद वरंबे पध्दत किंवा अधिक अंतरावर काढलेल्या सरी वाफ्याच्या अवलंब करावा. अशा वाफ्यांवर टोकण पध्दतीनेच लागवड करावी. लागवड करण्यापूर्वी बियांवर रायझोबियम जीवाणूंचा वापर दर दहा किलो बियाण्यांसाठी अर्धा किलो या प्रमाणात करावा.

आंतरमशागत व आंतरपीके:

वालाचे काही प्रकार कमी दिवसात तयार होणारे आणि कमी वाढणारे आहेत. त्यामध्ये मेथी, राजगीरा, चवळी, कोथिंबीर ही पिके चांगली येतात. उंच वाढणाऱ्या आणि पसरणाऱ्या प्रकारात भेंडी, गवार ही पीके घ्यावीत. काही ठिकाणी कपाशी आणि तंतुमय बुटक्या आणि कडव्या वालांची आंतरपीके म्हणून लागवड करता येते.
वालाची लागवड केल्यानंतर काही जातींमध्ये दोन महिन्यात फुले यायला लागतात. त्या अगोदर एक खुरपणी आणि एक कोळपणी करावी. काही प्रकार जास्त दिवस जमिनीत राहतात. त्यांचा हंगामही उशिराने सुरू होतो. अशा लागवडीत शेंगा लागायला सुरू झाल्यानंतर खुरपणी करावी.

खते आणि व्यवस्थापन : 


जास्त दिवस चालणाऱ्या लागवडीत शेंगांचा लाग सुरू होताना प्रति अडिच 50 किलो नत्र आणि 36 किलो स्फुरद घालावे. शेंगांची पहिली तोडणी झाल्यानंतर पिकावर सुक्ष्म द्रव्यांची फवारणी करावी. सूक्ष्म द्रव्यांत लोह, जस्त आणि बोरॉन यांचे प्रमाण अधिक ठेवावे. खरीप हंगामातील पिकास पाणी देण्याची सहसा गरज पडत नाही. मात्र त्यापुढील लागवडीच्या पिकासाठी सहा ते नऊ दिवस अंतर राखुन पाण्याचा चार ते सहा पाळ्या द्याव्यात.
Agrojay Towards Farmers Prosperity

उत्पादन वाढीच्या बाबी, पीक संजीवके :


1. सुधारीत जातीचे वाण आणि सेंद्रिय पध्दतीने तयार केलेले बियाणे वापरावे.
2. लागवडीपूर्वी जीवाणूवर्धकांचा वापर करावा.
3. पीक फुलावर येताना एनएए हे संजीवक 20 पीपीएक या तीव्रतेने फवारावे.
4. शेंगा लागायला सुरू झाल्यानंतर बोरॉनयुक्त सूक्ष्म द्रव्यांच्या दोन ते तीन फवारण्या कराव्यात.
5. जोमदार वाढीच्या जातींमध्ये वेलींना आधार मिळण्यासाठी एरंडीचे आंतरपीक घ्यावे.

काढणी व उत्पादन :

कोवळ्या आणि हिरव्या शेंगांची काढणी हि सुरुवातीच्या काळात करावी. अशा शेंगाच्या एक किंवा दोन काढण्या कराव्यात. या ओल्या आणि हिरव्या कोवळ्या शेंगांचे उत्पादन हेक्टरी 400 ते 600 किलो मिळते. शेंगात दाणे भरल्यानंतर आणि दाणे हुरडयात आल्यानंतर एक तोडणी करावी. या तोडणीपासून हेक्टरी सुमारे 500 किलो इतके उत्पादन निघते. शेंगांची पुर्ण वाढ होऊन आतील बी तयार झाल्यानंतर तयार शेंगांची काढणी करून आतील बी वेगळे करावे. यापासून सुमारे हेक्टरी 500 किलोपर्यंत बियांचे उत्पादन मिळते.






(Download Agrojay Mobile Application: - http://bit.ly/Agrojay)
Agrojay Towards Farmers Prosperity


  • Check other blogs

Comments

Popular posts from this blog

Agricultural Innovation in India

Technology in Agriculture: Feeding the Future

India Vs. World Farm Mechanization and Technology