पीकसंरक्षणासाठी जैविक घटक

पीकसंरक्षणासाठी जैविक घटक (Biological factors for crop protection)

(Download Agrojay Mobile Application: - http://bit.ly/Agrojay)

Agrojay Towards Farmers Prosperity

एक जीव दुसऱ्या जीवावर जगतो हा निसर्ग नियमाच आहे.  त्यामुळे पिकावर किडी आल्या की त्यावर जगणाऱ्या किडी ( मेलेल्या जनावरावर गिधाडे जमतात तशा ) या येतातच.  त्यांचा फडशा पडतात.
जवळजवळ ९८ टक्के किडींचा नाश या पद्धतीनेच होत असतो.  फक्त २ टक्के किडींचे नियान्त्यान करावे लागते.  तेही ते आपण जैविक घटकांमार्फत केले तर फायद्याचे ठरते.
१) रोग अगर कीड आल्यावर लगेच रासायनिक औषधे फवारू नयेत.  किडींच प्रकार आणि प्रमाण पाहावं.  गुळावर मुंग्या जमतात अगदी तसेच कीड आल्यावर परभक्षी कीटक तिथे येतातच.  निसर्गानेच केलेली ही व्यवस्था आहे.  आपले मित्र आणि किडींचे कर्दनकाळ असणारे परभक्षी कीटक नुकसानानुसार किडींच्या शोधतच असतात.
क्रायसोपर्ला कार्निया हा मित्रकीटक मावा तुडतुडे, फुलकिडे ( सर्व पीक ) या किडी खाऊन टाकते.  लेडी बर्ड बिटल ही मावा कीड ( सर्व पिके ) खाते.  शिरफीडमाशी ही मावा कीड ( सर्व पिके ) खाते.  कुंभारीण ही घाटे आली खाते.  कोपीडोसोमा ही बटाटा पोखरणारी आली खाते.  इपिकॅनिया मेलॉनिलक कीड पायरिला ( ऊस ) खाते.  कोनोबाथ्रा ऑफिडो हारो ही लोकरी मावा खाते.  एच. एन. पी. व्ही. विषाणू घातेअळी, शेंगा पोखरणारी अळी यांचा फडशा पाडते.  क्रीप्टोलियस मॉन्टोझिअरी ही  पिठ्या ढेकूण लोकरी मावा खाते.  व्हर्टिसिलीयम लेकॅनी बुरशी पिठ्या ढेकुण ( सिताफळे, द्राक्षे, डाळिंब, पेरू, ऊस ) खाते.  ट्रायकोडर्मा – बुरशी मार मुळकुज ( सर्व पिके ) यांचा नाश करते. ट्रायकोग्रामा कीटक खोडकिडा, बोंड अळ्या, फळ आणि फूल पोखरणाऱ्या अळ्या खातो.
२) पिकांवरील किडींची नुकसान पातळी अजमावण्यासाठी तसेच किडींच नयनात करण्यासाठी प्रकाश सापळ्यांचा वापर करतात.  प्रकाशाकडे कीड आकर्षित ( रात्री ) होतात आणि खाली ठेवलेल्या तेल्पाण्याच्या भांड्यात पडून मरतात.  यावरून त्यांच्या प्रादुर्भावाचे प्रमाण समजते.
३) स्वकीयाशी संवाद आणि मिलनासाठी किडी एक प्रकारचा सुगंध सोडतात.  या तत्वाचा वापर करून वेगवेगळ्या पिकांत वेगवेगळे कामगंध (फेरोमन) सापळे लावून किडींची नुकसान पातळी समजवण्यासाठी तसेच त्यांचा नयनात करण्यासाठी उपयोग होतो.  वेगवेगळ्या किडींना आकर्षित करण्यासाठी फेरोमन संयुगे ( लूर ) वापरली जातात.
हेलिलूर - बोंडअळी शेंगा, फळे पोखरणारी अळी.  कापूस, टोमॅटो, वांगी, भुईमुग, सोयाबीन, भाजीपाला यासाठी स्पोडोल्यूर पाने खाणारी अळी.  कापूस, भुईमुग, सुर्यफुल, तंबाखू, भाजीपाला, पेक्टिनो लूर शेंदरी बोंडअळी, कापूस, भेंडी, इरविन लूर टिपक्याची बोंडअळी ही फळ पोखरणारी अळी सिरपोफ्या गालूर खोडकिडा भात, पोक्टिनो फोरा लूर डायमेंड बॅकमॉथ कोबी, फुलकोबी, मिथील युजेनॉल फळमाशी सर्व पिके.

सापळ्याचे तीन प्रकार म्हणजे नरसापळा, चिकट सापळा, फळमाशी सापळा असे हे प्रकार आहेत.
१) जैविक किडनाशाकामध्ये दशपर्णी अर्क हे कीडनाशक अतिशय प्रभावशाली आहे.  सर्व प्रकारच्या किडी, प्रथम अवस्थेतील अळ्या आणि ३८ प्रकारच्या बुरशीचे नियंत्रण दशपर्णीमुळे होते.
२) कडूनिंबाचा ओला रसरशीत पाला ५ किलो घाणेरी ( टनटनी ) निरगुडी, पपई, गुळवेल, पांढरा धोत्रा, पांढरी रुई, लाल कण्हेर, मोगली एरंड, करंज, सीताफळ यांचा रसरशीत ओला पाला प्रत्येकी २ किलो आणि २ किलो हिरव्या मिरचीचा ठेचा, पाव किलो लसणाचा ठेचा आणि ३ किलो देशी गाईचे शेण आणि ५ लिटर गोमुत्र या सगळ्या वस्तू २०० लिटर पाण्यात झाकून महिन्याभर ठेवाव्यात.  दिवसातून १-२ वेळा ढवळावेत. त्यानंतर वस्त्रगाळ करून १ मि.लि. १ लिटर पाण्यातून पिकावर फवारावे.
३) ५ टक्के लिंबोळी ( घरी तयार केलेला ) अर्क कीड नियंत्रणासाठी वापरावा.  ४५ किडींवर
परिणामकारक आहे.  किडीप्रमाणेच बुरशी आणि सूत्रकृमींचाही कडुनिंब निंबोळी अर्क फवारल्यामुळे नयनात होतो. मित्रकिटकांवर परिणाम होत नाही.
४) लसूण मिरची तंबाखू ( लमित ) यांच्या उकळून केलेल्या द्रावण फवारणीमुळे अनेक किडींचा नायनाट होतो.
५) अनेक पक्ष्यांचे जैविक कीड नियंत्रणात मोठे योगदान आहे.
६) काही किडी हाताने वेचून मारता येतात.
      उदा. हुमणी, स्पोडोप्टोरा इ.
७) ५ लिटर गोमूत्र २०० लिटर पाण्यातून फवारावे.
८)  गोमूत्र १० लिटर आणि ३ किलो कडूनिंबाचा पाला आणि ५०० ग्रॅम तंबाखू ७-८ दिवसांत मडक्यात सडवून वस्त्रगाळ केलेला अर्क फवारावा.  आणखी काही वनस्पतींपासून तयार केलेली जैविक कीडनाशक कीड नियंत्रणासाठी उपयोगी पडतात.
९) जैविक किडनाशकाच्या जोडीला उन्हाळ्यात खोल नांगरट केली असता रोगकीडीला आळा बसतो.  सापळा पीक पद्धतीचा वापर करावा.
एकंदरीत २ टक्के किडीचे नियंत्रण करण्यासाठी आपल्या हातात असणाऱ्या या जैविक किडनियंत्रण पद्धतीने पिकाचे किडीरोगापासून संरक्षण केल्यास कमी खर्चात जास्त परिणामकारकरीत्या कीडनियंत्रण होऊन औषधावरचा होणारा खर्च कमी होऊन दर्जेदार निर्यातक्षम पीक उत्पादने आपण घेऊ शकू.  याशिवाय पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ही जैविक कीडनियंत्रण पद्धत अतिशय उपयुक्त ठरते.मित्रकीटकांची संख्या  वाढते.त्यामुळे आपोआपच नियंत्रणाचे सोपस्करही कमी करता येतात. म्हणून किडीरोगाचे जैविक पद्धतीने नियंत्रण करावे.






(Download Agrojay Mobile Application: - http://bit.ly/Agrojay)

Agrojay Towards Farmers Prosperity



  • Check other blogs





Comments

Popular posts from this blog

Agricultural Innovation in India

Technology in Agriculture: Feeding the Future

India Vs. World Farm Mechanization and Technology