चाफा लागवड

चाफा लागवड 

Agrojay Innovations Pvt. Ltd.
(Download Agrojay Mobile Application: - http://bit.ly/Agrojay)
Agrojay Towards Farmers Prosperity

सोनचाफा हा सदापर्णी व शोभिवंत वृक्ष ३०-४० मी. पर्यंत उंच वाढतो (सामान्यतः सु. १०-१५ मी); याचा बुंधा मोठा, घेर ३.५ मी., साल करडी व जाड आणि माथा त्रिकोनी असतो. पाने साधी, चिवट, उपपर्णयुक्त, एकाआड एक, पोपटी लांब टोकाची व भाल्यासारखी असून त्यांच्या कडा तरंगित असतात. फुले मोठी, सच्छद, कक्षास्थ (पानांच्या बगलेत), सुवासिक, फिकट किंवा गर्द पिवळी अथवा नारिंगी छटेची (५-८ सेंमी. व्यासाची) व एकेकटी येतात; ती द्विलिंगी असून परिदले सु. १५ व सुटी असतात; केसरदले व किंजदले सुटी व अनेक, किंजदले फिरकीप्रमाणे अक्षावर चिकटलेली व किंजपुटात दोन किंवा अधिक बीजके असतात. [⟶ फूल]. घोसफळातील प्रत्येक लहान फळ पेटिका फळ (शुष्क व एका शिवणीवर पेटीसारखे उघडणारे) असते; त्याच्या सालीवर अनेक बारीक फोड असून सर्व घोसफळ लांबट (५-१० सेमी.) गोलसर आणि पेटिका फळातील बिया (दोन किंवा अधिक) लालसर पिंगट असतात; त्यांवर गुलाबी अध्यावरण (बीजावरणावर झालेली अधिक वाढ) असते. इतर सामान्य शारीरिक लक्षणे चंपक कुलात [⟶ मॅग्नोलिएसी] वर्णिल्याप्रमाणे. फुले सर्व वर्षभर थोडी थोडी येतात, परंतु मे-ऑक्टोबरमध्ये अधिक येतात.

उपयोग :

या वृक्षाचे लाकूड नरम, हलके व टिकाऊ असून जहाज व विमानबांधणीत आणि खांब, फळ्या, सजावटी सामान, तक्ते, कापीव व कातीव काम, ढोलकी, चहाचे खोके, पेन्सिली, खेळणी, मणी इ. हरएक वस्तूकरिता वापरतात; जळणासही ते चांगले असते. फुलांपासून मिळणारा रंग कापडउद्योगात कापड रंगविण्यास वापरतात. खोडाची साल स्तंभक (आतड्याचे आंकुचन करणारी), मूत्रल (लघवी साफ करणारी), तापनाशक, कफोत्सारक (कफ काढून टाकणारी) व उत्तेजक असते. मूळ व त्याची साल रेचक असून दुधातून गळवांस लावतात; ती आर्तवजनक (विटाळ सुरू करणारी) असतात. खोडाच्या सालीत ०.३% अल्कलॉइडे व टॅनिने असतात. सुपारीबरोबर साल चघळतात; दालचिनीत सालीची भेसळ करतात. काही प्रकारचे रेशमी किडे सोनचाफ्यावर वाढवितात. फुले व फळे दीपक, उत्तेजक, जंतुनाशक, पौष्टिक, मूत्रल, कडू व थंड असून अग्निमांद्यावर व मूत्रपिंडाच्या विकारांवर उपयुक्त असतात. फळे व बी पायांवर भेगा पडल्यास बाहेरून लावतात. फुलांचे तेल (चंपक तेल) नेत्रविकार, संधिवात, डोकेदुखी इत्यादींवर लावण्यास उपयुक्त असते. ते सुगंधी असल्याने अत्तरांत व सुगंधी तेलांत वापरतात. फुलांचे गजरे, हार व तुरे बनवितात.


पिवळा चाफा(हीं. पीला चंपा; क. बिली संपिगे; इं. हिल चंपा; लॅ. मायकेलिया निलगिरिका, सोनचाफ्याच्या वंशातील ही दुसरी लहान जाती निलगिरी, अन्नमलाई व पलनी टेकड्यांत (सु. १,५०० ते १,८०० मी. उंचीपर्यंत) आणि सह्याद्रीवर फार उंचीवरच्या प्रदेशांत आढळते. या जातीची झाडेही बागेत लावतात. या वृक्षाचे सोनचाफ्याशी बरेच साम्य आहे. याची पाने सोनचाफ्यापेक्षा लहान व फिकट रंगाची असून त्यांवर रेशमी लव असते. फुले पिवळट पांढरी, सायीच्या रंगाची व सोनचाफ्यापेक्षा थोडी मोठी असतात. फळे लांबट (७.५-१० सेंमी.) व बिया लाल असतात. लाकूड फार कठीण, जड व टिकाऊ असते. घरबांधणीकरिता व सजावटी सामानाकरिता वापरतात. साल व पाने ज्वरनाशक असून सालीत बाष्पनशील (उडून जाणारे) तेल, जहाल राळ, टॅनीन व कडू द्रव्य असते. फुलांतील व सालीतील तेल सारखेच असते. मायकेलिया किसोपा या जातीची फुले पिवळी आणि मा. फिगोची पिंगट पिवळी असतात; मायकेलिया च्या इतर जातींची  फुले पांढरी व सुगंधी असून बहुतेकांचे लाकूड उपयुक्त असल्याचे आढळले आहे. या वंशातील जातींना आग सहन होत नाही.

लागवड, मशागत व उत्पादनसर्द हवा व ओलसर खोल जमीन सोनचाफ्याला चांगली मानवते. हिमतुषार त्याला सहन होत नाहीत; सौम्य प्रकाशात वाढ चांगली होते. पावसाळी व गरम हवेत त्याला फुले अधिक येतात आणि बी ऑगस्टअखेर पक्व होते. बियांची अंकुरणक्षमता कमी असते, परंतु बी पक्व होण्याची वेळ प्रत्यक्ष ते जमिनीत पेरण्यास गैरसोयीची असते; म्हणून बी पन्हेरीत रूजवून १२-१५ महिन्यांनी रोपे तेथून काढून बाहेर लावतात. साधारण जून मुळांचे व खोडांचे तुकडे (कलमे) अथवा खुंट लावूनही नवीन लागवड काही ठिकाणी यशस्वी झाली आहे. झाड जमिनीजवळ कापल्यास उरलेल्या खुंटापासून नवीन धुमारे जलद फुटतात व वाढ चालू राहते. वर्षाला घेर सुमारे अडीच सेंमी. वाढतो.


मॅलॅगॅसी व रियून्यन बेटे येथे चंपक तेलाकरिता लहान प्रमाणात या वृक्षांची लागवड करतात. पेट्रोलियम ईथरचा वापर करून मिळविलेल्या अर्कातून (रियून्सनमध्ये ०.१६-०.२०% आणि ०.१३.१५% मॅलॅगॅसीत) पुढे ५०% तेल मिळते. भारतात चंपकफुलांपासून अत्तरे व सुगंधी केश-तेले बनवितात; चंपक तेलही थोड्या प्रमाणात काढतात. त्याला आल्हादकारक सुगंध येतो; तो काहीसा चहाच्या वा संत्र्यांच्या वासासारखा असतो. अत्तरांत वापरल्या जाणाऱ्या प्रमुख मौलिक पदार्थांत त्याची गणना होते. उत्कृष्ट प्रतीच्या फ्रेंच अत्तरांत त्याचा वापर केला जातो. पानांपासून ०.४% बाष्पनशील व तुळशीसारखा वास असलेले तेल काढतात; जावामध्ये ते मोठ्या प्रमाणावर काढतात. बियांत ३२.२% चरबी व एक प्रकारची राळ आणि काही राळ-अम्ले असतात. चरबीत ३०% पामिटिक व ७०% ओलेइक अम्ले असतात; ही चरबी औषधोपयोगी असते.



(Download Agrojay Mobile Application: - http://bit.ly/Agrojay)

Agrojay Towards Farmers Prosperity






Comments

Popular posts from this blog

Agricultural Innovation in India

Technology in Agriculture: Feeding the Future

India Vs. World Farm Mechanization and Technology