मका लागवड तंत्रज्ञान
मका लागवड तंत्रज्ञान
Agrojay Innovations Pvt. Ltd.
मका हे जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मनुष्यासाठी अन्न व जनावरांसाठी चारा म्हणून महत्त्वाचे तृणधान्याचे पीक होय. जगात तृणधान्य पिकांच्या उत्पादनामध्ये गहु व भात या पिकानंतर मक्याचा क्रमांक लागतो. उपलब्ध तृणधान्यपिकांच्या तुलनेत विक्रमी उत्पादन देण्याची क्षमता मका ह्या पिकात आहे म्हणूनच मका या पिकास तृणधान्य पिकांची राणी असे म्हणतात. मका हे पिक विविध हंगामाशी समरस होते व त्याची उत्पादनक्षमता अधिक आहे म्हणून उत्पादकता वाढविण्यासाठी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे.
हंगाम :
मका हे उष्ण हवामानाला उत्तम प्रतिसाद देणारे पीक असले तरी या पिकाची लागवड खरीप, रब्बी व उन्हाळी या तिनही हंगामात करता येते. खरीपात भरपूर उत्पन्नाच्या दृष्टीने या पिकाकरीता साधारणत: 60 सें.मी. पावसाची आवश्यकता भासते. परंतु यापेक्षा जास्त पावसात किंवा अनिश्चित परिस्थितीत सुद्धा हे पीक चांगल्या प्रकारे घेता येते.
जमीन :
पाण्याचा योग्य निचरा होणारी, भारी ते मध्यम प्रतिची जमीन उपयुक्त असली तरी कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये मक्याची लागवड करता येते. जमिनीचा सामू (पी.एच.) 6.5. ते 7 असावा. चोपण किंवा चिबड जमिनीमध्ये या पिकाची लागवड करू नये.
पूर्वमशागत :
जमीन नांगरणी करून वखराच्या 3-4 पाळ्या द्याव्यात आणि जमीन भुसभुशीत करावी. जमीन जरा घट्ट असावी. त्यातील धसकटे व तणे वेचून घ्यावीत 20 ते 25 गाड्या प्रति हेक्टरी शेणखत मिसळून द्यावे.
पेरणीची वेळ :
मका हे पीक विविध वातावरणाशी समरस होत असल्याने त्याची लागवड तिन्ही हंगामाध्ये करता येते. खरीप, जुलै ते जुलैचा दुसरा आठवडा. रब्बी - 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर, उन्हाळी - जानेवारी ते फेब्रुवारी दुसरा आठवडा.
पेरणी : मक्याची पेरणी पाभरीने पेरुन किंवा टोकून अशा दोन्ही प्रकारे करता येते.
टोकणी/पेरणीचे अंतर - 75.20 सेंमी मध्यम व उशीरा कालावधीच्या वाणांसाठी
बियाण्याचे प्रमाण - 15 ते 20 किलो / हेक्टरी
खोडकीड : ही मका पिकावरील प्रमुख हानीकारक कीड होय. या किडीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी उगवण झाल्यावर 8 ते 10 दिवसांनी क्विनॉलफॉस 35 टक्के प्रवाही 15 मि.ली. 10 लिटर पाण्यातून हेक्टरी 500 लिटर पाणी वापरावे.
लष्करी अळी : या किडीपासून खरिपात 30 ते 80 टक्के नुकसान आढळून येते. या किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने गवताळ डोंगरीभागात आढळून येतो. या किडीच्या बंदोबस्तासाठी मिथिल पॅराथिऑन 2 टक्के प्रवाही भुकटी हेक्टरी 20 ते 25 किलो धुरळावी.
मावा व तुडतुडे : ह्या मका पिकावरील प्रमुख रसशोषक किडी होत. यांचा प्रादुर्भाव सुरवातीच्या काळामध्ये जास्त आढळून येतो. या किडीच्या बंदोबस्तासाठी रोगर 30 टक्के प्रवाही 10 मि.ली. किंवा मोनोक्रोटाफॉस 36 टक्के प्रवाही 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
काढणी :
कणसे पिवळसर झाल्यावर व दाणे कडक झाल्यावर कणसे खुडुण काढावित व 2 ते 3 दिवस उन्हात वाळवावीत. कणसातील ओलाव्याचे प्रमाण 20 टक्क्यापेक्षा जास्त नसावे. त्यानंतर मळणी यंत्राच्या साहाय्याने दाणे वेगळे करावेत.
(Download Agrojay Mobile Application: - http://bit.ly/Agrojay)
Agrojay Innovations Pvt. Ltd.


Comments
Post a Comment