दुग्धव्यवसाय फायद्यात चालवण्याच्या ५ नामी युक्त्या
दुग्धव्यवसाय फायद्यात चालवण्याच्या ५ नामी युक्त्या
(Download Agrojay Mobile Application: - http://bit.ly/Agrojay)
Agrojay Towards Farmers Prosperity
काय आहे गुपित दुग्ध-व्यवसायातील यशाचे?
स्मार्ट दुग्ध व्यावसायिक त्यांचा ५०% म्हणजे निम्मा वेळ नियोजनामध्ये घालवतात.
जरा विचार करा
मेहनतीने कमविलेले किंवा अधिक व्याजाने कर्ज काढून लाखो रुपये धंद्यात लावल्यानंतर दगडी होऊन कास निकामी होणे, एखादी लस विसरल्याने मरतुक होणे, किंवा नियोजन नसल्याने चारा कमी पडणे अशी अवस्था झाल्यावर ते लाखो रुपये अक्षरशः महिन्या-२ महिन्यांत फुंकले जातात.
दुधाच्या धंद्यात यशस्वी होणाऱ्या आणि एखाद्या व्यूहात्मक युद्धात जिंकणाऱ्या लष्करी नेत्यांमध्ये बरेच साम्य असते.
असो, दुग्ध-व्यवसाय फायद्यात चालवण्याच्या ५ नामी युक्त्या खाली दिल्या आहेत.
१) प्रजनन नियोजन :
तुमच्या गोठ्यात प्रत्येक वेळी दूध उत्पादन समसमान असले पाहिजे.
नवीन गोठा सुरु करताना दर ४ महिने नंतर ३३% गाई आणू शकतो.
२) चारा व्यवस्थापन : Fodder Management
कुठल्याही वेळी, तुमच्या कडे पुढील वर्षभर पुरेल इतका चारा असला पाहिजे. कोरडा चारा साठवून ठेवता येतो.
हिरव्या चाऱ्यासाठी मुरघास करण्याचा पर्याय आहे.
३) कमी खर्च कमी कष्ट नियोजन
खर्च आणि कष्ट कमी करण्यासाठी मुक्त गोठ्याचा उत्तम पर्याय आहे. कामगार किंवा गडी मुक्त गोठ्यामध्ये जास्त जनावरे सांभाळू शकतो. जनावरांना २४ तास पाणी उपलब्ध करून द्यावे. ठराविक संख्ये नंतर दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीन - दूध काढणी यंत्राचा उपयोग करावा.
४) स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक काळजी
स्वच्छ दूध निर्मिती साठी कासेची काळजी घेऊन प्रि-डीप, पोस्ट-डीप वापरावे.
वेळच्या वेळी CMT सीएमटी किट वापरून दगडी चाचणी करावी, आणि सुप्त अवस्थेतील ओळखून अधिक भयंकर दगडी ला आळा घालावा.
वेळच्या वेळी लसीकरण, डिवर्मिंग (जंतनाशक औषध) आणि बायो सिक्युरिटी स्प्रे मारून घ्यावा.
गाई बसण्याची जागा, आणि गाईची कास कोरडी असावी. मुक्त गोठ्यामध्ये गाई बसण्याची जागा कोरडी ठेवणे सहज शक्य होते.
५) नोंदवही धंद्याचा हिशोब
तुम्हाला गणित येत नसले तरी इथे तक्रार करायची नाही. अधिक प्रगती आणि अधिक व्यवसाय वाढीसाठी दूध धंद्याच्या शक्य तितक्या नोंदी काटेकोर पणे वेळच्या वेळी ठेवाव्यात.
MBA म्हणजे उद्योगाच्या व्यवस्थापकीय शिक्षण मध्ये लाखो रुपये भरून विद्यार्थी धंदा चालवण्याचे म्हणजे व्यवस्थापन करण्याचे शिक्षण घेतात. त्यात वेळच्या वेळी निरनिराळे निर्णय कसे घ्यावेत, त्यासाठी काय काय माहिती - डेटा data लागेल याचा प्रामुख्याने समावेश असतो.
तुम्ही जर व्यवसाय करताय तर त्यात वेळोवेळी, नवीन गाय आणणे, एखादी गाय विकणे, चाऱ्याचे नियोजन, कामगारांचे नियोजन, साधने हत्यारे आदींचे नियोजन, प्रजनन नियोजन, गोठा वाढविणे इत्यादी निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील - अर्थात व्यवसायात वाढ करून प्रगती करायची असेल तरच
मग हे करण्यासाठी तुम्हाला सर्व माहिती लिहून ठेवणे, नोंदी करणे महत्वाचे आहे. नोंदी तुम्ही वहीवर, कॉम्पुटर वर किंवा छापील नोंदवही मध्ये करू शकता.
सर्वात आधी टॅग मारून प्रजनन नोंदी करायला सुरुवात करा.
याशिवाय हिरवा चारा, कोरडा चारा, पशुखाद्य, सप्लिमेंट इत्यादींच्या किलो आणि दर रु. प्रति किलोच्या नोंदी करा. दुधाच्या सकाळ संध्याकाळ लिटर, आणि रु प्रति लिटर तसेच फॅट एस एन एफ नोंदी करा. गोठ्यातील डॉक्टर चा खर्च, कामगार खर्च, कृत्रिम रेतन खर्च, औषध खर्च, जनावर खरेदी विक्री, इतर उत्पन्न या नोंदी करणे महत्वाचे आहे.
तुम्हाला वरील माहिती आवडली असल्यास उपयोगी वाटल्यास कॉपी करून ठेवा किंवा वहीत लिहून ठेवा.
(Download Agrojay Mobile Application: - http://bit.ly/Agrojay)
Agrojay Towards Farmers Prosperity
Comments
Post a Comment