आवळा लागवड - Aavla Planting

आवळा लागवड(Aavla Planting)

Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download Agrojay Mobile Application: - http://bit.ly/Agrojay)

Agrojay Towards Farmers Prosperity

जमीन :                                 

हलकी ते मध्यम

जाती :                 

कृष्णा, कांचन, चकैय्या व निलम

लागवडीचे अंतर :

७.० X ७.० मीटर

खते :

पूर्ण वाढलेल्या झाडास ४० ते ५० किलो शेणखत, ५०० ग्रॅम नत्र, २५० ग्रॅम   स्फुरद व २५० ग्रॅम पालाश प्रति झाड प्रति वर्ष, नत्र दोन हप्त्यांमध्ये विभागून द्यावे.

Agrojay Towards Farmers Prosperity

आंतरपिके :

आवळा पिकामध्ये डाळिंब किंवा सिताफळ यासारखी आंतरपिके घेतल्यास प्रति हेक्टरी उत्पादनामध्ये वाढ होते. या शिवाय या पिकात स्टायलो हेमॅटा या चारा पिकाची लागवड फायदेशीर दिसून आली आहे.

इतर महत्त्वाचे मुद्दे :

लागवडीपूर्वी रोपांवर सुधारित वाणाचे कलम केले असल्याची खात्री करुन मगच लागवड करावी.

भरपूर उत्पादन आणि अधिक आर्थिक उत्पन्न मिळण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील आवळ्याच्या लागवडीसाठी कांचन वाणाबरोबर जास्त परागीभवनासाठी १० % कृष्णा या वाणाची लागवड करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे.

पावसाळा लांबल्यास जून-जुलै महिन्यात फळगळती कमी करण्यासाठी एखादे संरक्षित पाणी द्यावे.

पावसाचे पाणी जमीनीत मुरविण्यासाठी उताराच्या विरुध्द दिशेने बांध घालावेत किंवा झाडाच्या खोडाभोवती इंग्रजी (V) आकाराचे बांध घालावेत.




Comments

Popular posts from this blog

How to Prevent Soil Erosion on Farmlands

Agrojay Fruit and Vegetable Processing an Agricultural Industry

वांगी लागवड