जमीन सुधारणा

जमीन सुधारणा  (Land Improvement).

Agrojay Innovations Pvt. Ltd.


(Download Agrojay Mobile Application: - http://bit.ly/Agrojay)

Agrojay Towards Farmers Prosperity


अ) निचरा पध्दतीचे फायदे:

१) विविध पध्दती पिकाच्या वाढीसाठी योग्य असे जमिनीत वातावरण तयार करते. जमिनीत हवा खेळती राहण्यास मदत करते. त्यामुळे जमिनीत असणाऱ्या पोषण जिवाणूंची वाढ होते.
२)पिकाच्या कार्यक्षम मुळांची खोली वाढली जाऊन त्यामुळे पीक जोमदार वाढते.
३)या पध्दतीने जमीनीची पोत सुधारुन पाणी मुरण्याच्या प्रक्रियेमध्ये वाढ होते.
४)प्रमाणशीर मशागत करण्यास सोयीस्कर जाते.
५)जमिनीचे तापमान पिकास योग्य असे राखले जाते.
६)जमिनीच्या भूपृष्ठावर क्षार साठवण्याची क्रिया मंदावते व जमीन लागवडीस योग्य होते.
७)वापसा लवकर आल्यामुळे लागवड लवकर करता येते व बीजांकुरण वाढण्यास मदत होते.
बंदिस्त निचरा पध्दती कार्यक्षम होण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे. शेतकऱ्यांमधील समन्वयाची गरज आहे तरच नापीक/क्षारपड/पाणथळ जमिनी लागवडीस योग्य या पद्धतीद्यारे आपण आणू शकतो. या शिवाय आपल्याकडील परंपरात शेती व्यवसायापासून शेतकरी दूर जाऊ शकत नाही.

ब) भूसुधारकांचा वापर

चोपण जमीन सुधारण्यासाठी जिप्सम, गंधक, फेरस सुल्फेट, आयर्न पायराईट, फॉस्पोजिप्सम यासारख्या रासायनिक भुसुधारकांचा उपयोग करता येतो.

Agrojay Towards Farmers Prosperity


जिप्सम-

माती परीक्षण करून जिप्समची गरज ठरवल्यानंतर आवश्यकतेच्या अर्धा भाग जिप्सम पहिल्या वर्षी आणि उरलेल्या अर्धा भाग जिप्सम दोन वर्षानंतर वापरावा. जिप्सममध्ये एक टक्केपेक्षा जास्त सोडियम ऑक्सिईटचे प्रमाण असू नये. जिप्सम पावडर जमिनीच्या पुष्टभागावर वरच्या २० से.मी.थरात चांगली मिसळून घ्यावी म्हणजे पावसानंतर भरपुर पाणी मिसळू जिप्समची प्रक्रिया चांगली होण्यास मदत होते.

क) जमिनीचे व्यवस्थापन:

१) जमिनीचे सपाटीकरण:

ज्या जमिनी उंच सखल आहेत किंवा अति चढ उताराच्या आहेत अशा जमिनीसाठी सपाटीकरण करणे आवश्यक आहे. शेतात उंचवट्याचे ठिकाणी पाणी पोहोचत नाही किंवा कमी प्रमाणात पोहोचते व सखल भागात ते वाजवी पेक्षा जास्त प्रमाणात साठते. शिवाय वाजवी पेक्षा जास्त उतार असेल तर वाफ्यात किंवा साऱ्यात दिलेले पाणी उतराऱ्याचे दिशेने निघून जाते व साऱ्यांना किंवा वाफ्यांना पाणी कमी उपलब्ध होते. क्षार समस्या असलेल्या जमिनीत व पाण्याची पातळी ज्या जमिनीत जास्त वाढलेली आहे त्या ठिकानी पाणी साचू नये.

२) पाणी नियोजन

जमिनीची क्षारता कमी करण्यासाठी व क्षारपड जमिनीची सुधारणा झाल्यानंतर जमिनीत पाण्याची पातळी वाढू यासाठी पाण्याचा वापर कमी केला पाहिज. ठिबक सिंचनासारखे प्रभावी अस्त्र वापरले पाहिजे. ठिबक सिंचनातून भूगर्भातील मचूळ अथवा खारपट पाण्याचा उपयोग कार्यक्षमरित्या करता येतो. पाण्याची प्रत, क्षाराचे प्रकार तसेच जमिनीचे प्रतवारी पहाणे हे आवश्यक असते.

Agrojay Towards Farmers Prosperity


३)जमिनीची मशागत

जमिनीत खोलवर मशागत केल्यामुळे जमिनीत हवा खेळती राहून पाणी मुरण्याची क्षमता वाढते व पुष्टभागावरील क्षार खोलवर जाण्यास मदत होते. सब सॉयलर सारखे औजार वापरून खोलवर नांगरणी करता येते.

४)पिकाची फेरपालट व निवड

जमिनीची समस्या कमी करण्याची दृष्टीने एकच पीक वारंवार न घेता थोडी फेरपालट करणे आवश्यक असते. कायम आडसाली ऊस लागण्यापेक्षा खरीप हंगामात सोयाबीन,भुईमूग यासारखी पीक शिवाय ताग, शेवरी यासारखी हिरवळीचे खते घेतल्यास समस्या कमी होऊ शकते तसेच जमिनीत सतत काहीतरी पीक घ्यावे.

५) माती परीक्षण

खराब जमिनीचे व्यवस्थापन करण्यापूर्वी या जमिनी कोणत्या प्रकारच्या आहेत त्याची तपासणी करावी





(Download Agrojay Mobile Application: - http://bit.ly/Agrojay)



Agrojay Towards Farmers Prosperity





#digitalplatformforfarmers
#BestAgricultureBusiness   #  BestFarmingBusiness #  agrifarmbusiness #  topcompaniesinnashik #  digitalfarmingsolutions #  digitalagriculture #  digitalfarming #digitalplatformforfarmers #digitalbusiness




Comments

Popular posts from this blog

Agricultural Innovation in India

Technology in Agriculture: Feeding the Future

India Vs. World Farm Mechanization and Technology