टरबूज उत्पादन

टरबूज उत्पादन


(Download Agrojay Mobile Application :- http://bit.ly/Agrojay)

Agrojay Towards Farmers Prosperity

जमिनीची तयारी : 


चांगल्या वाढीसाठी 15 टन शेणखत किंवा एरंड पेंड 500 किलो प्रती एकर जमीन तयार करताना द्या.खोल नांगरट व सपाट करा.1.5 ते 2 मी. अंतराच्या ओळी तयार करा. ट्राइकोडर्मा विरडी 250 ग्रॅम 10 किलो शेणखतासोबत  पिकाच्या सुरवातीच्या काळात ओळींमध्ये टाकल्याने मातीतून येणा-या रोगांचे व तसेच बुरशीजन्य रोगांमुळे येणा-या मर रोगापासून पिकाचे रक्षण होवू शकते.

जाती : 


चांगल्या उत्पादनासाठी नन-8674, मधुबाला (ननहेम्स), एन एस-252, 701 (नामधारी सीड्स), एफ1 बॉक्सर, एफ1 मिडनाइट (महिको). या जातींची निवड करा.

बीजप्रक्रिया ; 


बियाणांची चांगली उगवण होण्यासाठी व बियाणे नरम होण्यासाठी बियाणे 30 मिनिटे कोमट पाण्यात भिजत ठेवा.ज्यामुळे बियाणातील सुप्तावस्था दूर होईल. सुरवातीच्या काळात मातीतून येणारे रोग व बियाणांच्या अन्य समस्यांच्या नियंत्रणासाठी कार्बेनडाझिम 50WP @ 3gm प्रती किलो बियाणे याप्रमाणे लागवडीपूर्वी बीज प्रक्रिया करा.

पेरणी आणि लागवड पद्धती : 


चांगल्या वाढीसाठी लागवड जुन-जुलै मध्ये करावी.लागवडीचे अंतर 1.5 X 1 मी. किंवा 2.0 X 0.5 मी. ठेवावे.लागवडीसाठी 800gm ते 1 किलो बियाणे प्रती एकर लागते. उन्हाळी पिकाची लागवड जानेवारी-फेब्रुवारी मध्ये करावी. चांगल्या वाढीसाठी उगवण झाल्यावर 8-10 दिवसांनी कमजोर आणि रोगट रोपे काढून 1 जागी एकच निरोगी रोप ठेवा.

तण व्यवस्थापन ; 


तण नियंत्रण. पेंडीमेथलीन(पेंडालिन/स्टॉंप)@1.3Ltr/acre प्रती 200Ltr पाण्यामध्ये मिसळून पेरणीनंतर 48 तासांच्या आत जमीन ओलसर असताना फवारा.

आंतर मशागत : 


बियाणांची उगवण झाल्यावर 10-12 दिवसांनी एक व फुले येण्यापूर्वी 2-3 वेळा अंतर मशागत करणे गरजेचे आहे.

Agrojay Towards Farmers Prosperity

जैविक खते : 


लागवडीपूर्वी 15 टन शेणखत किंवा 500 किलो एरंड पेंड प्रती एकर द्या.

रासायनिक खते : 


चांगल्या उत्पादनासाठी व वाढीसाठी 20 किलो नत्र (43 किलो युरिया)+20 किलो फॉस्फरस (125 किलो एसएसपी) + 20 किलो पोटॅशियम (33 किलो एमओपी) प्रती एकर लागवडीच्यावेळी द्या. चांगल्या उत्पादनासाठी व वाढीसाठी 20 किलो नत्र (43 किलो युरिया किंवा 97किलो अमोनियम सल्फेट) प्रती एकर लागवडीनंतर 30-35 दिवसांनी द्या.

पाण्यात विरघळणारी खते :


फुलगळ रोखण्यासाठी,उत्पादनात 10% वाढ होण्यासाठी व चांगला आर्थिक परतावा मिळण्यासाठी पिक फुलोरा अवस्थेत असताना हुमिक एसिड @3ml + MAP (12: 61: 00) @5gm/Ltr पाण्यातून फवारा. फुले,फळे येण्याच्या व पक्व होण्याच्या काळात,सॅलिसीलिक ऍसिड(ऍस्पिरिन टॅबलेट 350mg,4-5गोळ्या)/15Ltr पाण्यातून 30दिवसाने 1/2वेळा फवारा. चांगली फुलधारणा व उत्पादन मिळण्यासाठी 00: 52: 34 @150 gm / 15 Ltr पाण्यातून फुलोरा अवस्थेत व फळे तयार होताना फवारा . चांगले उत्पादन व गुणवत्ता मिळण्यासाठी 13: 0: 45 @ 100g/10 Ltr+हाइ बोरान (बायफॉलॉन) 1 ml/Ltr पाण्यातून फळ धारणा अवस्थेत फवारा. 

सिंचन :


पाणी व्यवस्थापन रबी हंगामात 10-20 दिवसाच्या अंतराने पाणी द्या.उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई भासू देवू नका. चांगले उत्पादन व वाढीसाठी पिकाला ठिबक मधून 1-2 Ltr/प्रती झाड/प्रती दिवस आणि 3-6 Ltr/प्रती झाड/प्रती दिवस पाणी परंपरागत पद्धतीद्वारे पाणी द्या. ठिबक सिंचनाचा वापर केल्यास उत्पादनात 18% वाढ होते व पारंपारिक पद्धती पेक्षा 40% पाण्याची बचत होते.
 
कीड नियंत्रण 


फळ माशी :


हे किटक फळातील गरामध्ये दिसून येतात व त्यामुळे फळगळ दिसून येते. वेळोवेळी बाधित फळे काढून नष्ट करा. पिकाच्या काढणी नंतर उन्हाळ्यात शेताची खोल नांगरट करा .मुख्य पिकाबरोबर लसूण घास,मुळा,कोथिंबीर या पिकांची लागवड एकाच शेतात करू नका. रासायनिक नियंत्रणासाठी इंडोक्साकार्ब 14.5 SC (सर्वदा/ अवांट) @ 5ml + स्प्रेडिंग एजेंट (सॅंडोविट/अप्सा80) @ 6ml 10 Ltr पाण्यातून फवारा किंवा स्पिनोसॅड 45SC (स्पिनटर, ट्रेसर) @ 735ml/15Ltr किंवा फिप्रोनिल 5SC (रिजेन्ट,रॅबिड,फॅक्स) 30ml /15Ltr किंवा लॅंब्डा सायहॅलोथ्रिन (कराटे, सिल्वा प्लस, रीवा 5)7.5ml/15Ltr किंवा थियोडिकर्ब 75WP (लारविन, चेक)@ 40gm/15Ltr ची फवारणी करा.

पांढरी माशी :


पांढरी माशी पिकात मोझाईक व्हायरस पसरवते. प्रतिबंध करण्यासाठी 2Ltr गोमुत्र+ 2Ltr ताक/15Ltr पाण्यात मिसळून 8-10दिवसाच्या अंतराने दोनदा फवारा. पांढरी माशी दिसून येताच नियंत्रणासाठी डाइफेनथियौरॉन 50WP (पेगासस,पजेरो) 20 gm किंवा स्पीरोमेसिफेन 240 SC (ओबेरॉन) 18 ml किंवा अ‍ॅसिफेट 50%+इमीडाक्लोप्रिड 1.8 SC (लांसरगोल्ड) 50 gm किंवा फ्लोनीकॅमिड (उलाला) 6 ml/15 Ltr पाण्यातून फवारा.

अंकुर आणि मुळे खाणारी अळी :


अळी पिकाचे मातीपासून मुळे व खोड नष्ट करते प्रतिबंध करण्यासाठी कार्बोफ्युरान 3G (फुराडन/फुरान/कार्बोमाइन) 12 kg प्रती एकर सरीत टाका.उभ्या पिकातील नियंत्रणासाठी फिप्रोनिल 5%SC (रीजेंट, सॅल्वो)500 ml किंवा क्लोरपायरीफॉस 20EC (ट्रेकडेन, फोर्स, ताफबन) 2 Ltr सिंचनाच्या पाण्यासोबत द्या किंवा फिप्रोनील + इमीडाक्लोप्रिड 80WG (लेसेंटा) 150 ml 250 Ltr पाण्यातून प्रती एकर भिजवणी करा.

पान पायांचा ढेकूण :


गर्द काळी जांभळी अळी अंकुर आणि फळातील रस सोशून घेते. अंकुर वाळतात व फळांवर गर्द काळा वर्तुळाकार ठिपका दिसून फळे गळतात. तीव्रता कमी असल्यास घायपात (केतकी)चा अर्क 350 ml/15 Ltr पाण्यातून फवारा. तीव्रता जास्त असल्यास इमीडाक्लोप्रिड (कॉनफ़िडॉर, टाटामीडा) 3ml किंवा थायामेथोक्सॅम 25WG (अक्टारा, अनंत) 4gm 10 Ltr पाण्यातून किंवा अ‍ॅसिफेट 50%+इमीडाक्लोप्रिड 1.8 SC (लांसरगोल्ड) 50 gm किंवा फ्लोनीकॅमिड (उलाला) 6 ml/15 Ltr पाण्यातून फवारा.

नाग अळी :


नाग अळीमुळे पानांवर सफेद रंगाच्या रेषा दिसतात. नियंत्रणासाठी अबामेक्टिन 1.9 EC(अ‍ॅग्री-मेक,व्हर्टीमेक) 6 ml/15 Ltr पाण्यातून किंवा डाइफेनथियौरॉन 50WP (पेगासस,पजेरो) 20 gm किंवा स्पीरोमेसिफेन 240 SC (ओबेरॉन) 18 ml किंवा अ‍ॅसिफेट 50%+इमीडाक्लोप्रिड 1.8 SC (लांसरगोल्ड) 50 gm किंवा फ्लोनीकॅमिड (उलाला) 6 ml/15 Ltr पाण्यातून फवारा. गाठी करणारे कीटक हे किटक पिकातील मुळांवर गाठी तयार करतात. रासायनिक नियंत्रणासाठी इंडोक्साकार्ब 14.5 SC (सर्वदा/ अवांट) @ 5ml + स्प्रेडिंग एजेंट (सॅंडोविट/अप्सा80) @ 6ml 10 Ltr पाण्यातून फवारा किंवा स्पिनोसॅड 45SC (स्पिनटर, ट्रेसर) @ 735ml/15Ltr किंवा फिप्रोनिल 5SC (रिजेन्ट,रॅबिड,फॅक्स) 30ml /15Ltr किंवा लॅंब्डा सायहॅलोथ्रिन (कराटे, सिल्वा प्लस, रीवा 5)7.5ml/15Ltr किंवा थियोडिकर्ब 75WP (लारविन, चेक)@ 40gm/15Ltr ची फवारणी करा.

रोग नियंत्रण

डाऊनी : 


डाऊनी (केवडा). पिवळसर, तांबूस होवून पाने सूकून जातात.नियंत्रणासाठी बिटरटेनोल 25WP(बायकॉर) 30 gm/15 Ltr किंवा क्लोरोथॅलोनील 75 WP (कवच, डेकोनील )30 gm/15 Ltr किंवा टेब्युकोनॅझोल 250 EC(टॉरग्यु, फोलिक्यूर) 15 ml/15 Ltr किंवा कार्बनडॅझिम 12%+ मॅनकोझेब 63 WP (साफ,कॉंबिप्लस,डेलमिक्स) 30gm/15 Ltr पाण्यातून फवारा.

भूरी :


या रोगामध्ये पानांवर पांढरी पावडर दिसून येते.प्रतिबंध करण्यासाठी गंधक पावडर 10 किलो/एकर सकाळी पानांवर दव असताना द्या.प्रभावी नियंत्रणासाठी बिटरटेनोल 25WP(बायकॉर) 30 gm/15 Ltr किंवा क्लोरोथॅलोनील 75 WP (कवच, डेकोनील )30 gm/15 Ltr किंवा टेब्युकोनॅझोल 250 EC(टॉरग्यु, फोलिक्यूर) 15 ml/15 Ltr किंवा कार्बनडॅझिम 12%+ मॅनकोझेब 63 WP (साफ,कॉंबिप्लस,डेलमिक्स) 30gm/15 Ltr पाण्यातून फवारा.

पाना फळांवरील ठिपके : 


सुरवातीच्या काळात पानांवर पाण्याने भरलेले डाग दिसून येतात.या ठिपक्यांमध्ये मध्यभागी पांढरा आणि काठावरुन राखाडी रंग दिसून येतो.प्रभावी नियंत्रणासाठी बिटरटेनोल 25WP(बायकॉर) 30 gm/15 Ltr किंवा क्लोरोथॅलोनील 75 WP (कवच, डेकोनील )30 gm/15 Ltr किंवा टेब्युकोनॅझोल 250 EC (टॉरग्यु, फोलिक्यूर) 15 ml/15 Ltr किंवा कार्बनडॅझिम 12%+ मॅनकोझेब 63 WP (साफ,कॉंबिप्लस,डेलमिक्स) 30gm/15 Ltr पाण्यातून फवारा.

काढणी योग्य अवस्था आणि तंत्रज्ञान : 


देठाजवळील बाळी सुकल्यास तसेच जमिनीलगतचा पांढरट रंग बदलून पिवळसर झाल्यास फळे काढणीस तयार आहेत असा समजा. तयार फळ हाताने ठोकून पाहिल्यास "बद बद" असा आवाज येतो. अपरिपक्व फळावर मारल्यास धातूची वस्तू ठोकल्यासारखा आवाज येतो.



See Below for More Information

Agrojay Towards Farmers Prosperity

(Download Agrojay Mobile Application :- http://bit.ly/Agrojay)


Comments

Popular posts from this blog

Agricultural Innovation in India

Technology in Agriculture: Feeding the Future

India Vs. World Farm Mechanization and Technology