मातीचा नमुना कसा घ्यावा


मातीचा नमुना कसा घ्यावा

Download Agrojay Mobile Application :- http://bit.ly/Agrojay)

मातीची नमुना घेताना घ्यावयाची काळजी 

१) नमुना घेण्यासाठी वापरली जाणारी औजारे स्वच्छ असावीत. 

२) पीक काढल्यावर व नागरणीपूर्वी नमुना घ्यावा. 

३) रासायनिक खते दिली असल्यास तीन महिन्यात नमुना घेवू नये. 

४) निरनिराळ्या प्रकारच्या जमिनीचे, मातीचे नमुने एकत्र मिसळू नयेत. 

५) नमुन्यासाठी रासायनिक खतांच्या रिकाम्या पिशव्या वापरू नये. 

६) खताळ जागा, सावलीखालील, विहीर व पाणी पाट व बाधा जवळील नमुने घेऊ नयेत. 


मातीचा नमुना कसा घ्यावा 

१) जमिनीच्या प्रकारानुसार रंग, खोली, पोत, उंच-सखलपणा, पाणथळ किंवा चोपण जागा यांचा विचार करून शेताचे विभाग पाडावे. अशा प्रकारे विभागातून एक स्वतंत्र प्रातिनिधिक नमुना घ्यावा. 

२) एका हेक्टरमधून १५ ते  २० ठिकाणची माती घ्यावी, मातीचा नमुना घेण्यासाठी प्रत्येक विभागात नागमोडी रेषा काढून प्रत्येक वळणावर खड्डा घ्यावा, काडीकचरा, दगड बाजूला करावेत. 

३) प्रत्येक ठिकाणी इंग्रजी आकाराची हंगामी पिकासाठी २५ सें. मी. , तर फळपिकासाठी ६० सें. मी खोलीचा खड्डा घेऊन त्यातील माती बाहेर काढून खड्डा मोठा करावा. 

४) खाद्याच्या सर्व बाजूने सारख्या जाडीची माती वरपासून खालपर्यंत तासून, ती  स्वच्छ घमेल्यात गोळाकरून  गोणपाटावर ठेवावी. 

५) प्रत्येक खुणेजवळ खड्डे घेऊन एका शेतातून गोळा केलेली माती चांगली एकत्र मिसळावी, तिचे सारखे चार भाग करावेत. समोरासमोरचे दोन भाग वगळून उरलेले दोन भाग पुन्हा एकत्र मिसळून, त्याचे चार भाग करावे आणि पुन्हा समोरासमोरचे दोन भाग वगळावे. 

६) अशा प्रकारे शेवटी दोन ओंजोळी किंवा अर्धा किलो ग्राम माती शिल्लक उरेपर्यंत असे करावे मातीच्या नमुन्या सोबत शेतकऱ्याचे नाव, गाव, जिल्हा, सर्व्हे नंबर / गट नंबर व पुढील हंगामात घेवयाचे पीक याबाबत सविस्तर माहिती लिहून मातीपरीक्षण प्रयोगशाळेत पाठवावे. 

माती हे वनस्पतींच्या वाढीचे मुख्य माध्यम आहे.  पिकांच्या वाढीसाठी विविध प्रकारचे अन्नद्रव्ये आवश्यक असतात. ती मुळांवाटे जमिनीतून उपलब्ध होतात पिकाच्या वाढीसाठी व सर्वोत्तम उत्पादनासाठी सर्व मुख्य, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्य पिकाला योग्य प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक असते.  मुख्य अन्नद्रव्य,  दुय्यम अन्नद्रव्ये व  सूक्ष्म अन्नद्रव्ये असे या अन्नद्रव्यांचे तीन प्रकार आहेत. 


       अ) मुख्य अन्नद्रव्य -
              १) नत्र (N )                  २) स्फुरद (P )            ३) पालाश (K )
       आ) दुय्यम अन्नद्रव्य
              १)  कॅल्शिअम (ca )     २) मॅग्नेशियम (Mg )     ३) गंधक (s )
       इ ) सूक्ष्म अन्नद्रव्य
            १) जस्त (Zn )              २) लोह (Fe )              ३) तांबे (Cu )  
            ४) बोरॉन (B )              ५) मोलाब्द (Mo )        ६) मंगल (Ml )



           See Below for More Information


Download Agrojay Mobile Application :- http://bit.ly/Agrojay)

Comments

Popular posts from this blog

Agricultural Innovation in India

Technology in Agriculture: Feeding the Future

India Vs. World Farm Mechanization and Technology