उन्हाळी मूग लागवड करणे ठरते फायद्याचे
उन्हाळी मूग लागवड करणे ठरते फायद्याचे
(Download Agrojay Mobile Application: - http://bit.ly/Agrojay )
Agrojay Towards Farmers Prosperity
मूग हे पिक कमी वेळात कमी वेळात आणि कमी पाण्यात येणारे पीक असल्यामुळे मूग लागवडीकडे शेतकरी प्राधान्य देत आहे. कडधान्य पिकामध्ये मूग हे पिक पोषण तत्वाच्या तुलनेत इतर पिकांपेक्षा जास्त आहे. रब्बी हंगामात या पिकाची गहू आणि हरभरा काढणीनंतर लागवड केली जाते.
योग्य हवामान कोणते?
उन्हाळ्यातील स्वच्छ सूर्यप्रकाश आणि उष्ण हवामानामध्ये विशेषतः साधारणपणे २१ ते ३५ अंश से. तापमानात मूग पीक चांगले येते. उन्हाळ्यामध्ये रोग व किडी यांचा उपद्रव कमी प्रमाणात होतो. सर्वसाधारणपणे मूग
पिकाच्या वाढीसाठी ६० ते ७० सें. मी. वार्षिक पर्जन्यमान पुरेसे ठरते.
कोणत्या जमीनीत चांगले येऊ शकते ?
मध्यम ते भारी व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडली तर उत्तम. चोपण, पाणथळ व क्षारयुक्त जमिनीमध्ये या पिकाची लागवड करू नका. साधारणतः ६.५ ते ७.५ p.h.(सामू) असलेली जमीन या पिकाला योग्य असते.
Agrojay Towards Farmers Prosperity
पूर्वमशागत
रब्बी पिकाच्या काढणीनंतर जमिनीतील पालापाचोळा व पूर्वीच्या पिकाची धसकटे वेचून जमीन स्वच्छ करावी.
नांगरटीपूर्वी एकरी चार-पाच गाड्या शेणखत अथवा कुजलेले कंपोस्ट मातीत मिसळावे. आवश्यकता असल्यास
ढेकळे फोडून घ्यावीत. त्यानंतर जमिनीची हलकी नांगरट करून घ्यावी. वखराच्या साह्याने उभ्या आडव्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी. सिंचनासाठी योग्य 'अंतरावर सरी वरंबा पद्धतीने रान बांधणी करून घ्यावी.
पेरणीची वेळ आणि कोणती पद्धत वापरावी ?
उन्हाळी मुगाची पेरणी फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा ते मार्चचा पहिला पंधरवाडा या काळात करावा. त्यापेक्षा लवकर पेरणी केली तर थंड हवामानाचा पिकाच्या उगवणीवर आणि वाढीवर परिणाम होतो. उशिरा पेरणी केल्यास पिकाची काढणी मॉन्सुनच्या पावसात सापडण्याची शक्यता असते. दोन ओळीतील अंतर ३० सें. मी. व दोन रोपांतील अंतर १० सें. मी. अंतर ठेवून पाभरीने किंवा तिफणीने मूग पेरावा. हेक्टरी १२-१५ किलो बियाणाची आवश्यकता लागते.
Agrojay Towards Farmers Prosperity
बीज प्रक्रिया :
करपा या रोगाच्या पूर्वनियंत्रणासाठी थायरम 2.5 ग्रॅम किंवा कार्बन्डॅझीम २.५ ग्रॅम व ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे चोळावे. त्यानंतर रायझोबियम व स्फुरद रॉग विरघळविणारे जिवाणू संवर्धक २५ ग्रॅम प्रति किलो प्रमाणे प्रति बीजप्रक्रिया करा.
आंतरमशागत :
पेरणी केल्यानंतर ३० ते ३५ दिवसांपर्यंत शेत तणविरहीत ठेवा. त्यानंतर १५ ते २० दिवसांनी कोळपणी करा, गरज भासल्यास १० ते १२ दिवसांनी परत एखादी खुरपणी करा.
खत व्यवस्थापन :
- पूर्वमशागतीच्यावेळी पुरेसे कंपोस्ट खत द्या.
- पेरणीच्यावेळी हेक्टरी २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद द्या. पीक फुलोरा अवस्थेत असताना युरिया (२ टक्के) २०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे मिसळून फवारा.
- मुगाच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत डीएपी २ टक्के (२०० ग्रॅम डीएपी ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) मिसळून फवारा.
पाणी नियोजन कसे करावे ?
पेरणीआधी रान ओले करून रान वापसा स्थितीत आल्यानंतर पेरणी करा. उन्हाळी मुगाला पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे. या पिकासाठी (sprinkler)तुषार सिंचन उपयोगी ठरते. विशेषतः पीक फुलोऱ्यात असताना व शेंगा भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडून देऊ नका, अन्यथा उत्पादनात घट येते.
See Below for more information
Agrojay Towards Farmers Prosperity
(Download Agrojay Mobile Application: - http://bit.ly/Agrojay )
Comments
Post a Comment