क्रॉप कव्हर : फळ पिकांसाठी सुरक्षा कवच
क्रॉप कव्हर : फळ पिकांसाठी सुरक्षा कवच
(Download Agrojay Mobile Application: - http://bit.ly/Agrojay )
Agrojay Towards Farmers Prosperity
भारत कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जात असला तरी धान्य आणि फळे तसेच कृषी पूरक उत्पादनांना योग्य काळजी न घेतल्यामुळे चांगला हमीभाव मिळत नाही. फळांच्या बाबतीत म्हणायचे झाले तर एकाच शेतात पिकविल्या गेलेल्या फळांच्या आकारमानात तफावत पाहायला मिळते. बऱ्याचवेळा एखाद्या रोगामुळे किंवा हवामानातील बदलामुळे फळांवर डाग आढळून येतात. क्रॉप कव्हर सुधारित तंत्रज्ञान उपयोगात आणले तर शेतकरी बांधवांना फायदा होऊ शकतो.
‘क्रॉप कव्हर’ किंवा ‘फ्रुट कव्हर’ च्या वापरामुळे यावर निश्चित तोडगा निघू शकतो आणि दर्जेदार उत्पादनामुळे चांगला हमीभाव मिळू शकतो. या सुधारित नॉन वुवन स्कर्टींग कापडापासून तयार करण्यात येणाऱ्या बॅग्ज चा वापर फ्रुट कव्हर म्हणून केला जातो. तर क्रॉप कव्हर म्हणून वापरले जाणारे उत्पादन हे रोल स्वरूपात उपलब्ध असते.
वापर केव्हा करावा?
कापणीच्या तीन महिने आधी फळाच्या मुळापासून वर आलेल्या भागावर नॉन वुवन कापड लावून घ्यावे आणि नंतर दोरीने वरती बांधून घ्यावे. जर या बॅगचा व्यवस्थित वापर केला तर पुढील कापणीच्या वेळी देखील याचा पुन्हा वापर करणे शक्य होते.
कसा करावा?
- जमिनीत पेरणी करून घ्यावी.
- गंज प्रतिरोधक तारा, लाकडाच्या पट्ट्या यांचा वापर करून ‘यु’ आकारात वळवून घ्यावे.
- गरजेनुसार व्यास ठरवावा, वरून क्रॉप कव्हर आच्छादावे.
- शेतातील मातीच्या मदतीने किनारे बंद करून घ्यावेत. यामुळे जिवाणूंचा आणि रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही.
फ्रुट कव्हर (फळ कव्हर) चे फा यदे –
- दव, बर्फ, जंतू, पाऊस, वारा आणि पक्षांपासून फळांचे प्रभावी संरक्षण होते.
- ताजी फळे आणि फुलांचे गुच्छ बांधण्यासाठी वापर करणे शक्य.
- फळांचे काळ्या डागांपासून संरक्षण.
- अपायकारक जंतुनाशकांचा वापर टाळणे शक्य.
- नैसर्गिक आपत्ती तसेच वातावरणीय बदलांपासून फळांचे रक्षण.
- फळांना एक प्रकारचे कवच मिळाल्याने उच्च दर्जाचे उत्पादन मिळते.
Agrojay Towards Farmers Prosperity
कोणत्या फळांसाठी वापर करता ये तो?
केळी, सफरचंद, टरबूज, आंबा, लिची, पेरू, साईट्रस, पपई, द्राक्ष आणि इतर फळांसाठी वापर शक्य.
क्रॉप कव्हर (पीक कव्हर) चे फा यदे –
- पिकाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक मायक्रोक्लायमेन्ट ची निर्मिती होते.
- पीक लवकर तयार होते.
- पिकांचे जीव जंतू आणि पक्षांपासून संरक्षण करते.
- गारा, बर्फ, वारा तसेच पावसापासून पिकांचे संरक्षण करते.
- रासायनिक खतांचा वापर मर्यादित होतो.
- हवा, पाणी आणि गॅसचे चांगले प्रसरण होते.
कोणत्या पिकांसाठी वापर करता ये तो?
कोबी, गाजर, मुळा, फ्लॉवर, बटाटे, टोमॅटो, जिरे, टरबूज इत्यादी पिकांसाठी.
www.Agrojay.in
Agrojay Towards Farmers Prosperity
(Download Agrojay Mobile Application: - http://bit.ly/Agrojay )
#digitalplatformforfarmers
#BestAgricultureBusiness #BestFarmingBusiness #agrifarmbusiness #topcompaniesinnashik
Comments
Post a Comment