पिकांमधील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे

पिकांमधील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे


(Download Agrojay Mobile Application :- http://bit.ly/Agrojay)

नत्र- 
झाडाची खालची पाने पिवळी होतात, मुळांची व झाडांची वाढ थांबते, फूट व फळे कमी येतात. 

स्फुरद - 
पाने लांबट होऊन वाढ खुंटते, पानाची मागची बाजू जांभळट होते.

पालाश -
पानाच्या कडा तांबटसर होऊन पानांवर तांबडे व पिवळे ठिपके पडतात. खोड आखूड होऊन शेंडे गळून पडतात.

जस्त - 
पानांचे आकारमान कमी होते पानांतील शिरांमधील भाग पिवळा पडतो. त्यामुळे पिकांची वाढ खुंटते. कळ्या सुरकुतलेल्या असतात.   पिकांमध्ये पेरे लहान पडतात. 

Agrojay Towards Farmers Prosperity


लोह - 
लोहाच्या कमतरतेमुळे पानांत पुरेशे हरितद्रव्य तयार होत नाही, त्यामुळे नवीन येणारी कोवळी पाने पिवळसर दिसून पाने गळून पडतात.

मॅगेनीज -
पानांच्या शिरा हिरव्या व शिरांमधील भाग क्रमाक्रमाने पिवळा, नंतर पांढरट व करडा होतो. कोवळी पाने फिक्कट पिवळसर दिसून येतात.

तांबे - 
पिकाच्या शेंड्याची वाढ खुंटते व पाने लगेच गळून पडतात. तसेच पाने अरुंद वाटतात. पानांचे टोक व कडा फिक्कट पिवळ्या दिसतात. कणसात किंवा ओंबीत दाणे भरत नाही.

बोरॉन - 
टोकांवरील नवीन पालवीचा रंग देठाकडून फिक्कट होऊ लागतो. नवीन पाने मारतात. पानांना सुरकुत्या पडून पिवळे पट्टे पडतात. पिकाच्या शेंड्याकडील पाने मरतात. टोमॅटो, डाळिंबामध्ये फळ तडकते.

मॉलिब्डेनम - 
पाने फिक्कट हिरवी पडतात. तपकिरी ठिपके पानांवर दिसतात, पानांच्या खालच्या भागातून तपकिरी डिंकासारखे द्रव्य स्र्वते.

गंधक - 
पानांचा मूळ हिरवी रंग कमी होतो,नंतर पाने पूर्ण पिवळी पडतात. 



See Below for More Information

Agrojay Towards Farmers Prosperity


Visit Website www.agrojay.in

(Download Agrojay Mobile Application :- http://bit.ly/Agrojay)


Comments

Popular posts from this blog

Agricultural Innovation in India

Technology in Agriculture: Feeding the Future

India Vs. World Farm Mechanization and Technology