नेमके कसे आणि किती उत्पन्न शेळीपालनातून मिळते ?

नेमके कसे आणि किती उत्पन्न शेळीपालनातून मिळते ?

(Download Agrojay Mobile Application: -  http://bit.ly/Agrojay )

राज्यभरात गेल्या काही वर्षांपासून अनेकजण शेळीपालन व्यवसायाकडे वळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या व्यवसायाकडे खासकरून सुशिक्षित तरूण मंडळी अधिक आकर्षित होताना दिसत आहे. या व्यवसायाकडे अनेक गलेलठ्ठ पगारांची नोकरी करणारे तरूण नोकरी सोडून हा व्यवसाय करत आहेत. शासनही या व्यवसायाला वाढत असलेला प्रतिसाद पाहून अनेक योजना काढत आहेत. या व्यवसायाबद्द्ल मात्र तरूणांमध्ये अनेक गैरसमजही पसरत आहेत. भरमसाठ उत्पन्न या व्यवसायात मिळते असाच समज परसताना दिसत आहे. उत्पन्न तर आहेच पण त्याची आकडेवारी चुकीची फिरत आहे. खरच किती आणि कसे उत्पन्न शेळीपालनातून मिळते हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्याबद्दलची सविस्तर माहिती शेळीपालनातून मिळणा-या उत्पन्नांबद्दल खालील दोन व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे.

Agrojay Towards Farmers Prosperity

जगात एकंदर ६२० दशलक्ष शेळया असून त्यापैकी १२३ दशलक्ष शेळया भारतात असून शेळयांच्या संख्येने जरी भारत प्रथम क्रमांकावर असला तरी त्यापासून मिळणारे उत्पन्न फार कमी आहे. देशातील दुध, मांस, व कातडीच्या एकंदर उत्पादनापैकी ३ टक्के दुध ४५ ते ५० टक्के मांस तर ४५ टक्के कातडी शेळयापासून मिळते.

शेळयांच्या प्रमुख २५ जाती भारतात आढळतात. दुध उत्पादनाकरिता आपल्याकडील जमनापरी बिंटल सुर्ती, मारवाडी, बारबेरी इत्यादी जाती तर बिटल, उस्मानाबादी, सुर्ती, अजमेरी, इत्यादी जाती लोकर उत्पादनाकरीता बिटल, उस्मानाबादी,सुर्ती अजमेरी इत्यादी जाती लोकर किंवा मोहेर उत्पादनाकरीता वापरतात. मंद गतीने या सर्व जातींची वाढ होते.साधारणपणे एका वर्षात सरासरी वजन २० किलो होते. या उलट विदेशी जातीच्या शेळया उदा.सानेन, टोने, बर्ग, अल्पाईन, एम्लोन्यूबियन, अंगोरा इत्यादी सुधारित जाती फारच झपाटयाने वाढतात.

Agrojay Towards Farmers Prosperity

अफ्रिकेतील बोयर जातीच्या शेळया वजनदार जाती फारच झपाटयाने वाढतात. अफ्रिकेतील बोयर जातीच्या शेळया वजनदार असून नराचे सरासरी वजन १०० ते १२५ किलो तर मादीचे सरासरी वजन ९० ते १०० किलो असते. आपल्याकडे शुध्द जातीच्या शेंळया वापरावयाच्या असल्यास उस्मानाबादी किंवा संगमनेरी शेळया वापराव्या संकरित शेळया वापरल्यास अधिक उत्पन्न मिळते.



See Below for more information

Agrojay Towards Farmers Prosperity


(Download Agrojay Mobile Application: -  http://bit.ly/Agrojay )

Comments

Popular posts from this blog

Agricultural Innovation in India

Technology in Agriculture: Feeding the Future

India Vs. World Farm Mechanization and Technology