डाळिंबाचा मररोगापासून बचाव
डाळिंबाचा मररोगापासून बचाव
Agrojay Towards Farmers Prosperity
मररोगापासून पूर्णपणे बचाव करण्यासाठी पिकाची लागवड करण्यापासुनच सुरुवात केली पाहिज.डाळिंबाची लागवड करतांनाच खड्डे भरतांना शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा पावडर मिसळली पाहिजे.त्यानंतर प्रत्येक वर्षी तिचा वापर करावा. फळे घ्यायला सुरुवात केल्यावर बहार धरतांना तिचा वापर करावा. अशा प्रकारे दरवर्षी ट्रायकोडर्मा पावरल्यामुळे आपल्या शेतात तिची भरपूर वाढ होईल आणि मग केवळ फ्यूजॅरियमच नव्हे तर इतर सर्वच अपायकारक बुरशिंना थारा मिळणार नाही. रासायनिक बुरशीनाशकांचा उपयोग करतांना बोर्डोमिश्रण १ टक्का कार्बो कार्बोनडेंझिन २०० लिटर पाण्यासाठी २०० ग्रॅम किंवा सी.ओ.सी ५०० ग्रॅम वापरावे. या द्रावणाची ड्रीपरखाली किंवा ठिंबक नसल्यास खोडाभोवती अर्धा ते एक फूट अंतरावर ड्रेचिंग करावी. भारी जमिनीमध्ये दीड ते दोन फूट उंचीचे वरंबे करून त्यावर लागवड करावी. या पध्दतीने लागवड केल्यामुळे ठिबकने जास्त पाणी दिले गेले किंवा जास्त पाऊस पडला तरी पाण्याचा चांगला निचरा होतो.
वेळीच उपाययोजना केली नाही तर एखाद्या भयंकर संसर्गजन्य रोगासारखा हा मररोग पसरायला व अनेक झाडांचा बळी घ्यायला चुकत नाही. डाळिंब पिकाचा जास्त अनुभव घेतलेल्या शेतकऱ्यांनी मररोगाचा हा भयानक प्रकार अनुभवला असेलच याबद्दल शंका नाही. मररोगापासुन पूर्णपणे बचाव करण्यासाठी पिकाची लागवड करण्यापासूनच सुरुवात केली पाहिज. डाळिंबाची लागवड करतांनाच खड्डे भरतांना शेंणखतामध्ये ट्रायकोडर्मा पावडर मिसळली पाहिजे. त्यानंतर प्रत्येक वर्षी तिचा वापर करावा. फळे घ्यायला सुरुवात केल्याबद्दल बहार धरतांना तिचा वापर करावा. अशा प्रकारे दरवर्षी ट्रायकोडर्मा वापरल्यामुळे आपल्या शेतात तिची भरपूर वाढ होईल आणि मग केवळ फ्यूजॅरियमच नव्हे तर इतर सर्वच अपायकारक बुरशींना थारा मिळणार नाही. माररोगामुळे पूर्ण झाडच मरत असल्यामुळे मोठं नुकसान होतं. या रोगाच्या जोडीला आपण तेल्याचीही आयात केलेली आहे. त्यामुळे डाळिंब शेती धोक्यात आली आहे. दरवर्षी परदेशातून डाळिंबाला मागणी वाढतच आहे. त्याचप्रमाणे तेल्याने मालाची प्रत अतिशय निकृष्ट बनते. टेल्यग्रस्त फळे सोडल्यास निरोगी फळांना आकर्षक भाव मिळत आहे. त्यामुळे डाळिंबाच्या पीकसंरक्षणाकडे जागरूकपणे लक्ष देण्याची गरज आहे. बऱ्याच शेतकऱ्यांकडे माररोग औषधालाही सापडणार नाही. म्हणून ह्या रोगाचा निश्चितपणे सर्व शेतकऱ्यांना बंदोबस्त करता येईल.
Agrojay Towards Farmers Prosperity
मररोगावर रासायनिक उपाय
पहिला प्रयोग प्रयोगशाळेत घेण्यात आला होता. त्यानंतर शेतामध्ये चाचण्या घेण्यात आल्या. पंधरा वर्षांपूर्वी जी बुरशीनाशके बाजारात उपलब्ध होती, त्यांचा या प्रयोगात उपयोग करण्यात आला होता. त्यापैकी कार्बोनडेंझिम, कॉपरआक्झी क्लोराईड आणि बोर्डोमिश्रण ही तीन बुरशीनाशके प्रभावशाली आढळुन आली. याच क्रमाने ते परिणामकारक आहेत. परंतु आर्थिकदृष्ट्या विचार केली तर बोर्डो मिश्रण सर्वात स्वस्त आढळले.
या बुरशीनाशकांचा उपयोग करतांना बोर्डोमिश्रण १ टक्के तयार करावे. साधारण २०० लिटर पाण्याचा ड्रम वापरावा, किंवा सिमेंटच्या टाक्यांचा उपयोग करावा. कार्बोनडेंझिम २०० लिटर पाण्यासाठी २०० ग्रॅम आणि कॉपरआक्झी क्लोराईड ५००ग्रॅम वापरावे. हे द्रावण झाडाच्या दोन्ही बाजूकडील ड्रीपर्सखाली ओतावे. यालाच ड्रिंचिग म्हणतात. ही रासायनिक औषधे वापरत असाल तर ट्रायकोडर्मा इतर जैविक औषधांचा उपयोग करता येणार नाही. कारण या रासायनिक औषधांमुळे ट्रायकोडर्मासारख्या उपयुक्त बुरशी मरतील. पूर्ण झाड मेल्यावर या ड्रेनचिंगचाही काहीच उपयोग होणार नाही. झाडावरील एखादी फांदी पिवळी होत असेल तर त्यावेळी या ड्रेचिंगचा चांगला उपयोग होईल. परंतु ती फांदी खोडकीड किंवा खोडअळीमुळे पिवळी होत नाही, याची खात्री करावी. या किडीचा परिणाम असल्यास त्यांनी केलेल्या छिद्रामध्ये कीटकनाशकांचे द्रावण सिरिंजच्या साहाय्याने छिद्रांमध्ये टाकावे किंवा कापसाचा बोळा भिजवून छिद्रात कोंबावा. छिद्र चिखलाने बंद करावे.
Agrojay Towards Farmers Prosperity
#digitalplatformforfarmers
#BestAgricultureBusiness # BestFarmingBusiness # agrifarmbusiness # topcompaniesinnashik # digitalfarmingsolutions # digitalagriculture # digitalfarming #digitalplatformforfarmers #digitalbusiness
Comments
Post a Comment