राजा मरतोय,करोना नाही तर शेती करून मरतोय
राजा मरतोय,करोना नाही तर शेती करून मरतोय
(Download Agrojay Mobile Application:- http://bit.ly/Agrojay)
Agrojay Towards Farmers Prosperity
राजा मरतोय,करोना नाही "शेती" करून ना
कोरोनाचा प्रादुर्भाव चीनमधून सगळ्या जगात पोहचला.आधी सहज वाटणारा हा विषाणू जेव्हा प्रगतिशील म्हणवल्या जाणाऱ्या राष्ट्रात थैमान घालायला लागला तेव्हा कुठे भारतासारख्या विकसनशील राष्ट्राने याकडे अधिक गांभीर्याने पाहायला सुरुवात केली...ह्या महामारीला रोखण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या,कर्फ्यु लावले,लॉकडाऊन केले,यंत्रणा उभ्या केल्या.
परंतु हे सर्व करताना ह्या जागतिक संकटाला तोंड देताना अनेकांना त्रास झालाय, अनेकांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे मात्र सर्वाधिक जास्त भरडला गेला, पिचला गेला कोण तर राजा...होय राजाच....तोच ज्याला जग शेतकरी राजा म्हणतं ... हा कफल्लक, हतबल झालेला राजा?
आधीच कर्जबाजारी..त्यात भरमसाट खर्च...अवकाळी पावसाने केलेली हाल, बेसुमार उत्पादन खर्च आणि शाश्वत नसलेले बाजारभाव....घरचे झालं थोडं आणि त्यात व्याह्याने धाडलं घोड....द्राक्ष उत्पादक तर अक्षरशः कंबरडे मोडल्यागत झाला आहे...काही द्राक्ष शेतकरी ह्या वर्षी उधाऱ्या, हफ्ते, घरखर्च सोडा पण जगू शकणार नाही इतकी हतबलता त्याच्या जीवनात आली आहे....
सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर मधल्या पावसाने आधीच डावणी, कुज होऊन बागा गेल्या....त्या बागा वाचवण्यासाठी एकरी 1 लाखापर्यंत खर्च करूनही संपूर्ण नुकसान झाले...काहींनी मात केली आणि बागा वाचवल्या.....एकरी 3 लाख खर्च केले,उधाऱ्या केल्या,सोने मोडले ....ज्यांच्या वाचल्या त्यांना आशा लागली की आता माल कमी आहे, मागणी चांगली राहील..... त्या वेड्या अपेक्षेने परत बेसुमार खर्च .... गेल्या 40 वर्षात नाही बघितलं असे खराब वातावरण आणि त्याला तोंड देऊन तयार केलेला माल आता विकायला सुरवात केली....सुरुवात तशी कमी अधिक उतार चढाव भरून झाली...लोकल देशांतर्गत खूप थँडी आणि पाऊस म्हनून कमी बाजार तेव्हा एक्स्पोर्टला बरी मार्केट पण एक्सपोर्टला माल कमी..... 15 मार्च नंतर खऱ्या अर्थाने माल भरपूर,गोड,रसरशीत,उत्पन्न भरपूर ...ऊन वाढायला लागले, बाजारभाव सुद्धा सुधारून 2 पैसे मिळायला सुरुवात झाली होती....आता सर्व सुरळीत होईल अशी वेडी आशा लागताना हे कोरोना रुपी भूत मानगुटीवर बसले आणि अक्षरशः होत्याचे नव्हते करून गेले....एक्स्पोर्ट बंद, लोकल बंद....डोळ्यासमोर अतिशय बिकट परिस्थितीत तयार केलेला माल झाडावर पिकून खराब व्ह्यायला सुरुवात झाली आहे....कोणी घेईल की नाही एवढा मोलामहागाचा माल हे बघून चिंतेचे ढग जमा होऊ लागले आहे....पुढे कसे होईल...काय वाढून ठेवले आहे ....देनेदारी फिरवून परत हातात काही राहील का?? वर्ष कसे घालवायचे याची विवंचना!!! हो ही राजाची संकटे आहे माय बापानो.... ज्याला जगाचा पोशिंदा म्हणता ना तो आता जग सोडून जाण्याच्या मानसिकतेत आलाय.........
राजा तू जगाचा पण आज रंक होण्याची वेळ आली आहे!!!
सरकार माय बाप,गडगंज श्रीमंती बाळगणाऱ्यांनो याचा विचार करणार का?? हा मोडलेला पाय कसा दुरुस्त करणार...आणि नाही करणार तर तुम्ही कसे उभे राहणार...म्हणता ना लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगायला हवा...मग पोशिंदा मरतोय ना....त्यांला करोना झाला तरी तो जगेल एकवेळ पण शेती करू का नको ना हा महाभयंकर रोग जडला आहे त्याचा उपचार शोधा आधी.......
राजा मरतोय,करोना नाही तर शेती करून मरतोय.
Agrojay Towards Farmers Prosperity
(Download Agrojay Mobile Application:- http://bit.ly/Agrojay)
Comments
Post a Comment