ठिबक सिंचनाचा योग्य वापर महत्त्वाचा...

ठिबक सिंचनाचा योग्य वापर महत्त्वाचा (Proper use of drip irrigation is important)

Agrojay Innovations Pvt. Ltd.

(Download AgrojayMobile Application: - http://bit.ly/Agrojay)

Agrojay Towards Farmers Prosperity


ठिबक सिंचन तंत्रामुळे जमिनीत कायम वाफसा ठेवता येतो. ठिबक सिंचनामधून पाणी तसेच पाण्यात विरघळणारी रासायनिक खते ही पिकांच्या अवस्थेनुसार दिली जातात. जमिनीनुसार ठिबक सिंचन संच निवडताना दोन झाडांमधील अंतर, ड्रीपर्समधील अंतर, ड्रीपर्सचा प्रवाह याची निवड केल्यास हा ठिबक सिंचन संच शंभरहून अधिक पिकासाठी वापरणे शक्य आहे.
पीक उत्पादनामध्ये पाणी आणि रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर आवश्यक आहे. पारंपरिक शेतीमध्ये पाणी आणि रासायनिक खत वापर कार्यक्षमता ३० ते ४० टक्के मिळत असल्याने त्यांचा अधिक वापर करूनही अपेक्षित उत्पादन मिळत नाही. उत्पादन खर्चामध्ये मात्र वाढ होते, शिवाय जमिनी क्षारयुक्त होतात.
पिकांच्या कार्यक्षम मुळांच्या क्षेत्रात पाणी आणि रासायनिक खतांचा वापर करावा. जमिनीत कायम वाफसा ठेवावा. परंतु, पारंपरिक सिंचन पद्धतीमध्ये हे शक्य होत नाही यावर उपाय म्हणजे ठिबक सिंचन तंत्राचा वापर. ठिबक सिंचन तंत्रामुळे जमिनीत कायम वाफसा ठेवता येतो. ठिबक सिंचनामधून पाणी तसेच पाण्यात विरघळणारी रासायनिक खते ही पिकांच्या अवस्थेनुसार दिली जातात. त्यामुळे पाणी आणि खतांचा कार्यक्षम वापर होऊन दोन्ही घटकांची कार्यक्षमता ८० ते ९० टक्के मिळते, पिकांचे चांगले उत्पादनमिळते.

Agrojay Towards Farmers Prosperity


ठिबक सिंचन यंत्रणेचे नियोजन

● ठिबक सिंचन निवड करताना आपल्याकडील जमीन कशी आहे? पाण्याचा स्रोत काय आहे? पाण्याची गुणवत्ता कशी आहे? त्यानुसार फिल्टरची निवड करावी.
● जमिनीच्या प्रकारानुसार ठिबक सिंचनाच्या दोन लॅटरलमधील आणि दोन ड्रीपर्समधील अंतर आणि ड्रीपर्सचा प्रवाह निवडावा.
● आपल्याकडील जमिनीनुसार ठिबक सिंचन संच निवडताना दोन झाडांमधील अंतर, ड्रीपर्समधील अंतर, ड्रीपर्सचा प्रवाह याची निवड केल्यास हा ठिबक सिंचन संच शंभरहून अधिक पिकासाठी वापरणे शक्य आहे.
● ठिबक सिंचन तंत्रज्ञानाने पाणी देण्याच्या बरोबरीने ज्या वेळी पिकांना सिंचन करतो, त्या वेळी पाण्यासोबत विरघळणारी रासानिक खते व्हेंचुरी किंवा फर्टिलायझर टँकद्वारे देता येतात. यामुळे पाणी आणि रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर वाढून चांगल्या गुणवत्तेचे उत्पादन मिळते.

बहुउद्देशीय ठिबक सिंचन पद्धती

● जवळच्या अंतराच्या पिकासाठी ठिबक सिंचनाची निवड करताना इनलाइन ठिबक लॅटरलची निवड करावी. या लॅटरल १२, १६ आणि २० मिमी. व्यासामध्ये उपलब्ध आहेत.
● ठिबक सिंचन संचाची उभारणी करताना जमिनीच्या प्रकारानुसार दोन इनलाइनमधील अंतर ४.५ फूट किंवा ५ फूट ठेवावे. दोन ड्रीपरमधील अंतर ४० किंवा ५० सें.मी. आणि ड्रीपर प्रवाह २.४ किंवा ४.२ लिटर प्रतितास अशी निवड करावी.
● पाण्याचा स्रोत आणि पाण्याच्या गुणवत्तेनुसार फिल्टरची निवड करावी. रासायनिक खते ठिबकमधून देण्यासाठी व्हेंचुरी किंवा फर्टिलायझर टँक बसवावा.

Agrojay Towards Farmers Prosperity


विविध पिकांसाठी वापर

आराखड्यानुसार, शेतामध्ये ठिबक सिंचन संचाची उभारणी करावी. उभारणी केलेल्या या ठिबक सिंचनाचा उपयोग कोणताही बदल न करता शंभरहून अधिक पिकांसाठी करता येतो. भाजीपाला, फुलशेती, तेलबिया, कडधान्ये, तृणधान्ये आणि कापूस ही पिके घेतल्यास वर्षातून दोन ते तीन पिकांसाठी याच ठिबक सिंचनाचा वापर सहजपणे करता येऊ शकतो.
◆ भाजीपाला : टोमॅटो, ढोबळी मिरची, मिरची, वांगे, बटाटे, कांदा, लसूण, हळद, आले, कोबी, प्लॉवर, नवलकोल, ब्रोकोली, ब्रुसेलस स्प्राऊट, रेड कॅबेज, टरबूज, खरबूज, काकडी, घरकीन, कारले, दुधी, भोपळा, काशीफळ, गिलकी, दोडकी, तोंडली, ढेमसे, घेवडा, वाल, शेवगा, गवार, चवळी, स्क्वॅश, पार्सली, शतावरी, झुकिनी, पालेभाजी, पालक, कोथिंबीर, मेथी, गाजर, मुळा, बीट, रताळे, याम, आर्वी, साबुकंद, लेट्यूस, लीक, पडवळ, परवल.
◆ तृणधान्ये : मका, गहू, ज्वारी, बाजरी, भात.
◆ कडधान्ये : हरभरा, तूर, चवळी, वाटाणा, राजमा.
◆ तेलबिया : भुईमूग, सोयाबीन, सूर्यफुल, मोहरी, एरंडी.
◆ नगदी पिके : ऊस, कापूस, तंबाखू.
◆ फळपिके : आंबा, पेरू, काजू, सीताफळ, अंजीर, केळी, पपई, स्ट्रॉबेरी, द्राक्ष, अननस तसेच अतिघनदाट फळबाग लागवड पद्धती आदी फळपिके.
◆ फुल पिके : गुलाब, कार्नेशन, जरबेरा, झेंडू, अन्थुरियम, ऑर्किड, शेवंती, निशिगंध, मोगरा, लिली, शेवंती.
◆ औषधी आणि सुगंधी वनस्पती : कोरफड, शतावरी, सफेद मुसळी, जिरॅनियम, लेमनग्रास, स्टिव्हिया, पुदिना, विड्याची पाने, कढीपत्ता, चहा, कॉफी, व्हॅनिला, ओवा.
◆ वनपिके : साग, बांबू, निलगिरी, सुबाभूळ, पॉपलर, मिलिया डुबिया, जट्रोफा, महोगनी
◆ मसाला पिके : मिरी, जिरा, हळद, आले.
◆ चारा पिके : लसूणघास, बरसी, स्टायलो, गजराज, दशरथ, यशवंत, जयवंत, मका, ज्वारी.



(Download AgrojayMobile Application: - http://bit.ly/Agrojay)


Agrojay Towards Farmers Prosperity




  • Check other blogs


#digitalplatformforfarmers #BestAgricultureBusiness #BestFarmingBusiness #agrifarmbusiness #topcompaniesinnashik #digitalfarmingsolutions #digitalagriculture #digitalfarming #digitalplatformforfarmers #digitalbusiness #riseofadigitalagricultureplatform




Comments

Popular posts from this blog

How to Prevent Soil Erosion on Farmlands

Agrojay Fruit and Vegetable Processing an Agricultural Industry

वांगी लागवड