तीळ लागवड
तीळ लागवड
Agrojay Towards Farmers Prosperity
जमीन:
तीळ या पिकास मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा असलेली जमीन निवडावी.
पूर्व मशागत:
एक नांगरणी करून 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. त्यानंतर मैंद फिरवून जमीन सपाट करवी व दाबून घ्यावी. यामुळे पेरणी चांगली होऊन उगवणसुद्धा चांगली होते.
बीजप्रक्रिया :
बियाण्यापासून व जमिनीमधून उदभवणारे बुरशीजन्य रोग होऊ नये म्हणून थायरम 3 ग्रॅम किंवा कार्बनडेंझीम 2.5 ग्रॅम किंवा ट्रायकोडेर्मा 4 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे त्यानंतर 25 ग्रॅम औझोटोबॅक्टर प्रति किलो बियाणे या प्रमाणात लावावे.
पेरणीची वेळ:
जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत.
Agrojay Towards Farmers Prosperity
पेरणीचे आंतर:
45×10 सें.मी किंवा 30×15 सें.मी अंतरावर अनुक्रमे 45 सें.मी किंवा 30 सें.मी अंतराच्या पाभरीने पेरणी करावी. पाभरीने पेरणी करतांना बियाण्यास बियाणा एवढेच बारीक वाळू अथवा चाळून घेतलेले शेणखत मिसळावे. त्यामुळे बियाण्याचे वितरण प्रमाणशीर होते. पेरणी 2.5 सें.मी पेक्षा जास्त खोलीवर करू नये.
बियाणे:
पेरणीसाठी हेक्टरी 2.5 ते 3 किलो ( एकरी 1 किलो) बियाणे वापरावे.
खते:
पूर्व मशागतीच्या वेळी शेवटच्या कुळवाच्या अगोदर प्रति हेक्टरी 5 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे किंवा हेक्टरी एक टन निंबोळी पेंड पेरणी बरोबर द्यावी. अधिक 25 किलो नत्र प्रति हेक्टर पेरणीच्या वेळी व 25 किलो नत्र प्रति हेक्टर पेरणीनंतर तीन आठवड्यांनी पेरून द्यावे. सूक्ष्म अन्नद्रव्यांची जमिनीत कमतरता असल्यास पेरणीच्यावेळी 20 किलो गंधक प्रति हेक्टरी द्यावे.
काढणी:
साधारणपणे 75% पानाचा व खोडाचा रंग पिवळसर होतो तेव्हा पीक काढणीस योग्य झाले असे समजावे. साधारण 80 ते 95 दिवसात पीक काढणीस येते. काढणी लवकर केल्यास बोडातील तीळ पोचट व बारीक राहून उत्पादनात घट येते, काढणी उशिरा केल्यास बोड फुटून तीळ शेतात गळून पडते म्हणून वेळेवर काढणी करावी.
Agrojay Towards Farmers Prosperity
#digitalplatformforfarmers
#BestAgricultureBusiness # BestFarmingBusiness # agrifarmbusiness # topcompaniesinnashik # digitalfarmingsolutions # digitalagriculture # digitalfarming #digitalplatformforfarmers #digitalbusiness
Comments
Post a Comment