मुळा लागवड तंत्रज्ञान
मुळा लागवड तंत्रज्ञान
(Download Agrojay Mobile Application:- http://bit.ly/Agrojay)
मूळवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये मुळा हेक्टरी एक महत्वाचे पीक आहे. मुळा हे थंड
हवामानातील पीक असून त्याची लागवड प्रामुख्याने रब्बी हंगामात केली
जाते. परंतु उष्ण हवामानात चांगल्या वाढू शकणा-या मुळयांच्या
जाती विकसित करण्यात आल्यामुळे मुळयाचे पीक
जवळ जवळ वर्षभर घेता
येते.
मुळा हया पिकाचे जमिनीत वाढणारे मुळ
आणि वरचा हिरवा पाला
यांचा भाजीसाठी उपयोग केला
जातो. मूळा किसून किंवा पातळ चकत्या
करून त्यावर
मीठ टाकून लिंबू पिळून खाल्यामुळे भूक वाढते. तसेच पचनशक्तीही वाढते. मुळयामध्ये असणा-या सारक गुणधर्मामुळे बध्दकोष्ठता
असणा-या व्यक्तींसाठी मुळा
अतिशय उपयुक्त
आहे. मुळा कच्चा खातात किंवा त्याची शिजवून भाजी
करतात. मुळयाच्या
हिरव्या पाल्याचीर आणि शेंगाची
(डिंग-याची ) भाजी करतात. मुळयाची कोशिंबीर करतात. मुळयाच्या
हिरव्या पानांमध्ये
अ आणि करतात.
जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. मुळयामध्ये
चुना फॉस्फरस, पोटॅशियम ही खनिजे आणि काही प्रमाणात अ
व क जीवनसत्वे
असतात.
Agrojay Towards Farmers Prosperity
हवामान आणि जमीन
मुळा हेक्टरी प्रामुख्याने
थंड हवामानातील पीक आहे. मुळयाची वाढ
20 ते 25 अंश सेल्सिअस तापमानाला झपाटयाने होते. परंतु चांगला स्वाद आणि कमी
तिखटपणा येण्यासाठी मुळयाच्या वाढीच्या काळात 15 ते
30 अंश से. तापमान असावे. मुळयाच्या
वाढीच्या काळात तापमान जास्त झाल्यास मुळा लवकर
जून होतो आणि त्याचा तिखटपणाही वाढतो. मुळयाची जमिनीतील वाढ
चांगली होण्यासाठी लागवड ागवडीसाठी निवडलेली जमीन भुसभूशीत असावी. भारी जमीनीची चांगली मशागत करावी. अन्यथा
मुळयाचा आकार वेडावाकडा होतो
आणि त्यावर
असंख्य तंतूमूळे येतात. अशा मुळयाला बाजारात मागणी नसते. मुळयांची लागवड अनेक
प्रकारच्या जमिनीत करता
येत असली तरी मध्यम ते खोल
भूसभूशीत अथवा रेताड जमिनीत मुळा
चांगला पोसतो. चोपण
जमिनीत मुळयाची लागवड करू
नये.
सुधारीत जाती
बियांची पेरणी करावी. मुळयाची लागवड
करतांना दोन ओळीतील अंतर 30 ते 45 सेमी आणि 2 रोपांमधील अंतर
8 ते 10 सेमी ठेवावे.
लागवड
मुळयाची लागवड सपाट
वाफयात किंवा सरी वरंब्यावर केली जाते. दोन वरंब्यामधील अंतर मुळयांच्या जातीवर अवलंबून असते. युरोपीय जातीसाठी हेक्टरी अंतर
30 सेमी ठेवतात. तर
आशियाई जातीकरिता 45 सेमी इतर
ठेवतात. वरंब्यावर 8 सेमी अंतरावर 2-3 बिया टोकून पेरणी करतात. सपाट
वाफयात 15 बाय 15 सेमी अंतरावर लागवड करतात. बियांची पेरणी
2-3 सेमी खोलीवर करावी.
पेरणी पूर्वी जमिनीत ओलावा असावा. मुळा लागवड अंतर
हेक्टरी मुळयाची जात. त्याची
वाढ आणि हंगामावर अवलंबून असते. तथापि कमी अंतरावर लागवड केल्यास मध्महिन्यातम
आकाराचे मुळे मिळून उत्पादन जास्त मिळते.
मुळयाच्या एक हेक्टर लागवडीसाठी 10 ते
12 किलो बियाणे लागते.
खते आणि पाणी व्यवस्थापन
मुळयाचे पिक कमी
कालावधीत तयार होणारे असल्यामुळे जास्त उत्पादन मिळण्यासाठी या पिकाला खते
वेळेवर द्यावीत. जमिनीची मशागत करतांना चांगले कुजलेले शेणखत 25
टन दर हेक्टरी जमिनीत मिसळून द्यावे. मुळयाच्या
पिकाला दर हेक्टरी 30 किलो नत्र 20 किलो स्फूरद आणि
80 किलो पालाश द्यावे. स्फूरद आणि पालाश यांची पूर्ण मात्रा आणि
नत्राची अर्धीमात्रा पेरणीपूर्वी द्यावी. नत्राची उरलेली अर्धीमात्रा ही
बी उगवून आल्यावर म्हणजेच पेरणीनंतर 20 ते
25 दिवसांनी द्यावी.
मुळयाच्या
वाढीसाठी जमिनीत सतत ओलावा असणे आवश्यक
आहे. कोरडया जमिनीत मुळयाची पेरणी करू नये. बियांची पेरणी केल्यानंतर लगेच हलके
पाणी द्यावे. मुळयाच्या पिकाला हिवाळयात
8 ते 10 दिवसाच्या
अंतराने आणि उन्हाळी हंगामात 4 ते
5 दिवसाच्या अंतराने पाणी
द्यावे.
आंतरमशागत
मुळयाची लागवड कमी
अंतरावर करतात म्हणून जमिनीची मशागत चांगली करणे आवश्यक आहे.
पिक कमी कालावधीत तयार
होणारे असल्यामुळे सुरूवातीच्या काळात पिकात खुरप्याच्या
साहायाने निंदणी वेळेवर करून
पिक तण रहित करावे. साधारणपणे दोन निंदण्या कराव्यात. एक
खोदणी आणि एक निंदणी सुरूवातीच्या काळात करावी. मुळे लांब वाढणा-या जातींना आवश्यकतेप्रमाणे भर द्यावी.
Agrojay Towards Farmers Prosperity
काढणी उत्पादन आणि विक्री
मुळयाची लागवड केल्यानंतर जातीनुसार 40 ते
55 दिवसांनी मुळे काढणीसाठी तयार
होतात. मुळे नाजूक आणि
कोवळे असतानाच मुळयांची काढणी करावी. मुळा जास्त दिवस जमिनीत राहिल्यास कडसर,
तिखट आणि जरड
होतो, मुळयाला गाभा रवाळ
होऊन भेगा पडतात.
मुळे काढण्यापूर्वी शेतीला पाणी
द्यावे आणि हाताने मुळे
उपटून काढावेत. नंतर
त्यावरील माती काढून मुळे पाण्याने
स्वच्छ
धुवून घ्यावेत. किडलेले, रोगट
मुळे वेगळे काढावेत. मुळे
पाल्यासह काढून विक्रीसाठी पाठवितात.
पाने आणि मुळै यांना इजा होवू नये म्हणून टोपलीत किंवा खोक्यात व्यवस्थित रचून विक्रीसाठी पाठवावीत
मुळयाचे उत्पादन हे
मुळयाची जात आणि लागवडीचा हंगाम हयांवर अवलंबून असते.
साधारणपणे रब्बी
हंगामात मुळयाचे दर हेक्टरी 10 ते
20 टन उत्पादन
मिळते.
(Download Agrojay Mobile Application:- http://bit.ly/Agrojay)
Agrojay Towards Farmers Prosperity
#digitalplatformforfarmers
#BestAgricultureBusiness #BestFarmingBusiness #agrifarmbusiness #topcompaniesinnashik #digitalfarmingsolutions #digitalagriculture #digitalfarming #digitalplatformforfarmers #digitalbusiness
Comments
Post a Comment