ग्रीन हाऊस(हरितगृह) कसे उभारावे ?

ग्रीन हाऊस(हरितगृह) कसे उभारावे ?

(Download Agrojay Mobile Application: -  http://bit.ly/Agrojay )

Agrojay Towards Farmers Prosperity


कमी क्षेत्रातून जास्तीत जास्त उत्पादन काढणे आणि जमीन, हवामान, उष्णता, आर्द्रता, ओलावा इत्यादींसारख्या नैसर्गिक घटकांवर पूर्ण नियंत्रण ठेवून जास्त आर्थिक फायदा मिळवून देणाऱ्या पिकांचे उत्पादन घेण्यासाठी ग्रीन हाऊसचा वापर केला जातो. ग्रीन हाऊसच्या उभारणीसाठी लोखंडी पाईपचा सांगाडा आणि प्लॅस्टिकच्या कागदाचा वापर केला जातो.

ग्रीन हाऊससाठी लागणारी जागा :

बिझनेससाठी ग्रीन हाऊसची उभारणी करताना कमीत कमी 10 गुंठे जागा (1000 वर्ग मीटर) जागा असावी जास्तीत जास्त एक एकरचे ग्रीन हाऊस असावे.

आर्द्रता :

ग्रीन हाऊसची उभारणी करताना त्यातील आर्द्रता वर्षभर कशी आहे, याचाअभ्यास करावा. आपल्या भागातील आर्द्रतेनुसार योग्य आकार पिके घ्यावीत. उदा. कोकणामध्ये जास्त आर्द्रता असल्यामुळे तेथे कार्नेशन पिकामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ते योग्यप्रकारे येत नाहीत. खर्चामध्ये वाढ होते. पर्यायाने पीक आर्थिक दृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे आपल्या प्रदेशातील वातावरणानुसार ग्रीन हाऊसची उभारणी करावी त्यानुसार पिके घ्यावीत.

Agrojay Towards Farmers Prosperity


ग्रीन हाऊसमध्ये घेतली जाणारी पिके :

फुलपिके : यामध्ये प्रामुख्याने दांड्यांच्या फुलांचे उत्पादन घेतले जाते. त्यात गुलाब, जरबेरा, कार्नेशन, आर्किड, लिलिनियम, शेवंती, यासारख्या फुलांचा समावेश असतो.

भाजीपाला : रंगीत ढोबळी मिरची, हिरवी ढोबळी मिरची, टोमॅटो, काकडी, कारली, घोसावळी .

पालेभाज्या : कोथिंबीर, मेथी, पालक, फुलकोबी, कोबी .

परदेशी भाजीपाला : ब्रोकोली, झुकेनी, लॅट्युस, लिक, पार्सेली .

औषधी पिके : हळद, आले, चिवस, मीट, बसीगील .

फळे : स्ट्रॉबेरी, टरबूज .

ग्रीन हाऊस लागवडीसाठी वाफ्याचे नियोजन :

ग्रीन हाऊसची उभारणी केल्यानंतर आवश्यक माध्यम म्हणजे माती, कोकोपीट, किंवा अन्य सुधारीत माध्यमे याचा विचार करणे आवश्यक आहे. ग्रीन हाऊसमधील बहुतांश लागवड ही एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीची असल्याने माती किंवा माध्यमाची निवड काळजीपूर्वक करावी.

माती :

योग्य सामू आणि विद्युतवाहकता या गुणधर्माबरोबरच निचरा होणारी माती लागवडीसाठी आवश्यक आहे. हरितगृहातील पिकांच्या लागवडीसाठी लाल मातीचा वापर करावा. लोहाची विविध ऑक्साईड्स असल्याने विशिष्ट असा लाल रंग मातीला प्राप्त होतो. या प्रकारची माती हलक्या सच्छिद्र, चुनाविरहीत, कमी विद्राव्य क्षार असलेली असते. या जमिनीचा सामू 5.5 ते 6.5 असावा. ग्रीन हाऊसमध्ये प्रस्तावित पिकाच्या वाफ्यांचा आकार, ऊंची या नुसार गरजेप्रमाणे योग्य ब्रास माती टाकून घ्यावी. ती सर्वत्र समप्रमाणात पसरून घ्यावी. या मातीचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे.

Agrojay Towards Farmers Prosperity


मातीचे जंतुंचा सर्वनाश (निर्जंतुकीकरण) करण्यासाठी काय करावे ?

जमिनीतील रोगकारक जीव, किटक तणांचा नाश करण्याची क्रिया म्हणजेच निर्जंतुकीकरण होय. या पध्दतीत जमिनीतील सूक्ष्मजीव हे काही भौतिक, रासायनिक प्रक्रियेद्वारे मारले अथवा दूर केले जातात. रासायनिक घटकातील मिथिल ब्रोमाईडसारखे काही घटक हे सामान्य तापमानाला वायुरूप धारण करतात. तसेच ते अत्यंत विषारी असतात. त्यामुळे योग्य प्रशिक्षित व्यक्तिनेच त्याचा वापर करावा. आपल्याकडे आर्थिकदृष्ट्या परवडणारे फॉरमॅलिन या रसायनाचा वापर मातीचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी केला जातो. बाजारात मिळणारे फॉरमॅलिन हे द्रावण 37-40 टक्के फॉर्मल्डेहाईडयुक्त असते. निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येणारे फॉरमॅलीन द्रावण पाण्यात 1:10 या प्रमाणाव मिसळावे.
 
ग्रीन हाउसमधील जमीनीतून जंतुंना काढून टाकण्यासाठी(निर्जंतुकीकरण) करताना पुढील काळजी घ्यावी.

1. हे रसायन वापरण्याआधी माती ही वाफसा स्थितीत असावी.
2. रसायन पहाटे किंवा सकाळी लवकर जमिनीवर टाकावे.
3. रसायन टाकल्यानंतर उपलब्ध उष्णतेनुसार तीन ते सात दिवस त्यावर काळ्या रंगाचे पॉलिथिन पसरावे. त्यात निर्माण होणारा वायू बाहेर जाऊ नये, याकरीता मातीने पॉलिथिनच्या कडा किंवा बाजू गाडून घ्याव्यात.
4. सात दिवसांनंतर पॉलिथिन काढून एकदिवस ग्रीन हाऊसच्या सर्व खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवून वायू बाहेर जाऊ द्यावा.
5. भरपूर पाण्याने रसायन मातीतून धुऊन जाईल ते पहावे.
6. त्यानंतर वाफसा आल्यानंतर वाफे तयार करण्यास सुरूवात करावी.

मातीचे वाफे कसे तयार करावेत?

फुलझाडे भाज्या लागवडीसाठी वाफे तयार करण्यासाठी लाल माती, शेणखत, भाताचे तूस पुढील प्रमाणात वापरून माध्यम तयार करावे.
1. लाल माती – 70 टक्के,
2. शेणखत – 20 टक्के
3. भाताचे तूस -10 टक्के
4. याशिवाय अन्य सेंद्रीय पदार्थ, उदा. निंबोळी पेंड, बोनमील, खतांची पायाभूत मात्रा यांसारख्या गोष्टी वाफे करताना घालाव्यात.
 वाफे तयार करण्याची पध्दत :
1. वाफ्याची लांबी पूर्व-पश्चिम असावी.
2. वाफे हरितगृह पिकाचा प्रकार यानुसार आखलेले असावेत.
3. मुख्य रस्त्यासाठी, विविध कामांसाठी पुरेशी जागा हरितगृहामध्ये त्याच्या आकारानुसार ठेवावी.
4. हरितगृहामध्ये कॉलम शक्यतो वाफ्याच्या वर यावेत. चालण्याच्या जागेमध्ये नकोत.
5. दोन वाफ्यांत मशागतीची कामे करण्याकरीता पुरेशी जागा असावी.
6. पिकांच्या आवश्यकतेनुसार आधाराच्या रचना लक्षात घेऊनच मग वाफ्याची बांधणी करावी. नंतर उगाचच रचना मोडली जाते.
अशा प्रकारे ग्रीन हाऊसची योग्य रचना, पिकाचा प्रकार वातावरण यांचा सुयोग्य संबंध साधल्यास निश्चितच जास्त उत्पादन मिळण्याची शक्यता असते.


www.Agrojay.in

(Download Agrojay Mobile Application: -  http://bit.ly/Agrojay )

Agrojay Towards Farmers Prosperity






#digitalplatformforfarmers
#BestAgricultureBusiness #BestFarmingBusiness #agrifarmbusiness #topcompaniesinnashik #digitalfarmingsolutions #digitalagriculture #digitalfarming #digitalplatformforfarmers

Comments

Popular posts from this blog

Agricultural Innovation in India

Technology in Agriculture: Feeding the Future

India Vs. World Farm Mechanization and Technology