चुनखडीयुक्त जमिनीतीत अन्नद्रव्य व्यवस्थापन
चुनखडीयुक्त जमिनीतीत अन्नद्रव्य व्यवस्थापन
(Download Agrojay Mobile Application: - http://bit.ly/Agrojay )
१) नत्र -
नत्र खताचे रुपांतर अमोनिया वायूमये होवू नये म्हणून युरिया हा निम कोटेड दिल्यास नत्र खताची उपयोगिता वाढते. शक्यतो नत्रयुक्त खते मातीत मिसळून दिल्यास जास्त फायदा होतो. जीवाणू खताचा वापर वाढवावा.
२) स्फूरद -
स्फूरद हे अन्नद्रव्य फारच कमी प्रमाणात उपलब्ध होत असते. दिलेल्या खतांचे जास्त प्रमाणात स्थिरीकरण होत असते. चुनखडीयुक्त जमिनीमध्ये स्फूरद खते पट्टा पद्धतीने मुळांच्या सानिध्यांत विशिष्ठ ठराविक खोलीवर दिल्यास खताची उपयोगिता वाढते. तसेच सिंगल सुपर फॉस्फेट हे स्फुरदयुक्त खत शेणात ५/६ मुरवत ठेवून फळझाडांना दिल्यास स्फुरदाची कार्यक्षमता वाढते व पांढरी मुळीचीही चागली वाढ होते. तसेच जमिनीतीत अविद्राव्य स्वरूपातील स्फूलदाचे विद्राव्य स्थितीत रूपातर करण्यासाठी फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया (PSB) या जीवाणू खताचा वापर करावा.
Agrojay Towards Farmers Prosperity
३)पालाश -
या अन्नद्रव्याचे प्रमाण चुनखडीयुक्त जमिनीत चांगल्या प्रमाणे असते. परंतु या जमिनीत कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्याने पालाशये शोषण कमी होते. द्राक्षासारख्या पिकामध्ये कॅल्शियम व पालाश हे एकमेकांच्या विरुध्द कार्य करत असतात. पोटॅशियम सल्फेट, पोटॅशियम सोनाईट, पोटॅशियम नायट्रेट सारखा खताचा वापर कराव. तसेच पोटॅश सोल्युबलायजीग बॅक्टरीया (KMB) या सारखा जीवाणू खतामुळे पालाशची उपलब्धता वाढते.
४) कॅल्शियम-
चुनखडीयुक्त जमिनीत कॅल्शियमचे प्रमाण मोठ्या स्वरूपात असते. परंतु कॅल्शियमची उपलब्धता बरीच कमी असते. कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी पानांवर फवारणी द्वारे भरून काढता येते. तसेच सेंद्रिय खताचा, हिरवळीच्या खतांचा, तसेच हाडांच्या चुऱ्याला गरम वाफ देवून त्याची बारीक पावडर करून त्याचा वापर केल्यास कॅल्शियमची उपलब्धता वाढते.
५) मॅग्नेशियम -
५) मॅग्नेशियम -
चूनखडीयुक्त जमिनीत कॅल्शियमचे प्रमाण जास्त होवून मॅग्नेशियमचे शोषण कमी होते. प्रकोश सश्लेषण क्रिया मंदावून हरितद्रव्याची कमतरता भासते. यासाठी मॅग्नेशियम सल्फेट तसेच मॅग्नेशियम नायट्रेटचा वापर केल्यास मॅग्नेशियमची उपलब्धता वाढते. तसेच चिलेटेड स्वरूपातील मॅग्नेशियममुळे लवकर अपटेक होते
६)गंधक -
चूनखडीयुक्त जमिनीत बहुदा गंधकाची कमतरता भासते. पिकाची वाढ जोमदार न होता पिवळी वाढ दिसते. यासाठी ९०% स्वरूपातील गंधकाचा वापर करावा. किंवा शेणखतात गंधक मिसळून दिल्यास गंधकाची उपलब्धता वाढते तसेच इतर अन्नद्रव्यांचीही उपलब्धता वाढते.
७) लोह -
चूनखडीयुक्त जमिनीत लोहाचे प्रमाण जास्त असते परंतु ते पिकांना उपलब्ध स्वरूपात नसते. लोहाची उपलब्धता वाढविण्यासाठी जमिनीत सेंद्रीय पदार्थांचे प्रमाण चांगले ठेवावे. यापुढे सामु असलेल्या जमिनीत e-EDDHA पा वापर केल्यास उपलब्धता वाढते. तसेच शेणस्लरीमधून फेरस सलेटचा वापर केल्यास लोहाची उपलब्धता वाढते.
Agrojay Towards Farmers Prosperity
८) जस्त (झिंक) -
या अन्नद्रव्याच्या उपलब्धतेसाठी चिलेटेड झिंक zn-EDTA चा वापर केल्यास उपलब्धता वाढते तसेच शेणस्लरी मधून झिंक सल्फेटचा वापर केल्यास झिंकचे शोषण वाढते.
९) मॅगनीज -
मॅगनीज उपलब्धतेसाठी पानावरून फवारणी केल्यास तात्काळ कमतरता भरून काढून येते. तसेच चिलेटेड मॅगनिज Mn- EDTA चा वापर जमिनील केल्यास शोषण चांगले होते.
१०) तांबे (कॉपर) -
या अन्नद्रव्याची गरज प्रामुख्याने कॉपर सल्फेट किंवा चिलेटेड कॉपर देवून भागवता येते. बऱ्याचदा फवारणी द्वारे ही गरज भागवली जावू शकते.
Agrojay Towards Farmers Prosperity
११) बोरान -
या अन्नद्रव्याची गरज भागवण्यासाठी २०% बोरानच्या दोन-तीन फवारणी घेता येवू शकतात किंवा बोरॉन चा वापर प्रति एकरी २ ते ३ कि.ग्रॅ करावा. बोरॉन शक्यतो फवारणीद्वारे द्यावा. जमिनीतून जास्त दिल्यास बोरॉनची (Toxicity) विषारता होते.
(Download Agrojay Mobile Application: - http://bit.ly/Agrojay )


Comments
Post a Comment