व्हर्टीकल फार्मिंग
व्हर्टीकल फार्मिंग
(Download Agrojay Mobile Application: - http://bit.ly/Agrojay )
Agrojay Towards Farmers Prosperity
वाढत्या लोकसंख्येमुळे, शहरीकरणामुळे, ग्रामिण भागात जमिनीची मोठ्या प्रमाणात विभागणी झाल्यामुळे उत्पादकता कमी झाली आणि याचा अभाव शेतक-यांच्या उत्पादनावर होतोय. उपलब्ध जागेत तयार करायचा असल्यास व्हर्टीकल फार्मिंग हे वरदानच ठरेल.
व्हर्टीकल फार्मिंग म्हणजेच उभ्या मांडण्यांमध्ये किंवा शेल्फमध्ये विविधप्रकारचे ट्रे व कुंड्या वापरुन त्यात सुपिक माती अथवा इतर माध्यमे वापरुन(कोकोपिट, व्हर्मीक्लाइत, राईसब्रान, हायड्रोप्रनिक्स वगैरे) वापरुन त्यात सुर्यप्रकाश किंवा कृत्रिम प्रकाश, वायु, पाणी, तापमान, आर्द्रता आणि विद्रव्य खते (आवश्यक अन्नद्रव्ये) यांचा नियंत्रित वापर करुन शेती केली जाते.
व्हर्टिकल फार्मिंगचे फायदे :
बदलणारे तापमान, अवकाळी पाऊस, गारपीट, गंभीर दुष्काळ ह्यासर्व समस्यांमध्ये हवामान नियंत्रित व्हर्टिकल फार्मिंग केल्यास लोकसंख्येच्या मागणी इतका पुरवठा आपण नक्कीच करु शकतो. व्हर्टीकल फार्मिंगचा अजुन एक फायदा म्हणजे हे तंत्र अवलंबल्यास यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीची बचत होईल. व्हर्टीकल फार्मिंग अधिक प्रभावी होण्यासाठी खालील गोष्टींचा
अवलंब करणे गरजेचे आहे.
हरितगृहाचा वापर :
व्हर्टिकल फार्मिंग करताना हरितग्रहाचा वापर करणे शक्य आहे. कारण हरितगृहामध्ये एकदा कोणते पीक घ्यायचे आहे याची निश्चिती झाल्यावर स्टॅन्ड चा चपखल वापर करून उत्पादन घेणे शक्य आहे. हरितगृहाच्या वापरामुळे पिकानुसार सूर्यकिरणांची तीव्रता कमी करणे शक्य होते. त्याचप्रमाणे पिकासाठी आवश्यक तापमान आणि वायू निर्मिती यांच्या मदतीने कमी जागेत दर्जेदार पीक घेता येते.
उभ्या मांडणीसाठी स्टँड :
पिकाची निवड केल्यानंतर उपलब्ध जागेचा पुरेपूर वापर करता यावा यासाठी योग्य नियोजन अत्यंत गरजेचे आहे. रोपं कशापद्धतीने लावायची हे निश्चित झाल्यानंतर स्टॅंड ची मांडणी कशी करता येईल याचा योग्य विचार करून आराखडा निश्चित करावा. असे करताना रोपांना वाढीसाठी कोणताही अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच प्रत्येक स्टँड मधील रोपाला योग्य पाणी. योग्य प्रकाश कसा मिळेल याकडे लक्ष द्यावे.
व्हर्टीकल फार्मिंग म्हणजेच उभ्या मांडण्यांमध्ये किंवा शेल्फमध्ये विविधप्रकारचे ट्रे व कुंड्या वापरुन त्यात सुपिक माती अथवा इतर माध्यमे वापरुन(कोकोपिट, व्हर्मीक्लाइत, राईसब्रान, हायड्रोप्रनिक्स वगैरे) वापरुन त्यात सुर्यप्रकाश किंवा कृत्रिम प्रकाश, वायु, पाणी, तापमान, आर्द्रता आणि विद्रव्य खते (आवश्यक अन्नद्रव्ये) यांचा नियंत्रित वापर करुन शेती केली जाते.
Agrojay Towards Farmers Prosperity
हायड्रोप्रोनिक्सचा वापर :
व्हर्टिकल फार्मिंग अंतर्गत शेती करताना आधुनि तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. हायड्रोप्रोनिक्सचा वापर हा त्यातील एक महत्वाचा घटक म्हणता येईल. यामध्ये, रोपांच्या लागवडीसाठी मातीचा वापर करणे टाळतात. कारण मातीमध्ये अनेक प्रकारचे जीवजंतू असतात. व्हर्टिकल फार्मिंग करताना रोगाचा किंवा कोणत्याही किडीचा प्रभाव होऊ नये याकडे लक्ष दिले जाते. हायड्रोप्रोनिक्सच्या वापराअंतर्गत मातीऐवजी कोकोपीट किंवा द्रव्यांच्या आधारे रोपाची लागवड केली जाते.
सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर :
व्हर्टिकल फार्मिंग करताना सेंद्रिय खतांचा अधिकाधिक प्रमाणात वापर करणे फायद्याचे ठरते. कारण सेंद्रिय खतांचा वापर केल्यास रोपांवर त्याचा विपरीत परिणाम होत नाही. तसेच दर्जेदार उत्पादन घेणे शक्य होते.
प्रकाशासाठी आवश्यक व्यवस्था :
व्हर्टिकल फार्मिंग करताना रोपांना प्रकाश मिळेल याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. जिथे शक्य आणि आवश्यक असेल तिथे सूर्यप्रकाश आणि जर सूर्यप्रकाश नसेल तर कृत्रिम प्रकाशाची व्यवस्था करणे आवश्यक आहे. अन्यथा रोपांच्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊन रोपांची वाढ थांबू शकते.
फर्टिगेशन द्वारे विद्राव्य खताचा वापर :
व्हर्टिकल फार्मिंग करताना ड्रीप इरिगेशन (ठिबक सिंचनाचा) वापर केला जातो. यामुळे विद्राव्य खतांचा वापर करून रोपांच्या मुळाशी प्रभावीपणे खत देणे शक्य होते.
सर्वेक्षणानुसार २०५० साली जगाची ८०% लोकसंख्या शहरीभागात विस्थापित होणार असुन लोकसंख्येत ३ अब्जांनी भर पडेल (Source : FAO & NASA) असा अंदाज आहे. आणि यासाठी लागणारा भाजीपाला उपलब्ध जागेत तयार करायचा असल्यास व्हर्टीकल फार्मिंग हे वरदानच ठरेल.
Agrojay Towards Farmers Prosperity
(Download Agrojay Mobile Application: - http://bit.ly/Agrojay )
#digitalplatformforfarmers
#BestAgricultureBusiness #BestFarmingBusiness #agrifarmbusiness #topcompaniesinnashik
Comments
Post a Comment