केळी लागवड
केळी लागवड
(Download Agrojay Mobile Application :- http://bit.ly/Agrojay)
भारतामध्ये आंब्यानंतर केळीच्या लागवडीचा दुसरा क्रमांक असून केळीची लागवड बाराही महिने करतात. परंतु बदलत्या मार्केटच अभ्यास करता केळीची लागवड योग्य वेळी केल्यास फायदेशीर ठरते. कारण ऑक्टोबरमध्ये दसर्याच्या सुमारास मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात केळीची आवक झाल्याने भाव घसरतात. दसर्यानंतर केळीचे दर घसरतात ते मार्चपर्यंत कमीच राहतात. एप्रिल, मे, जून महिन्यामध्ये केळीला दर जास्त मिळतो. तेव्हा मंदीचा काळ लक्षात घेऊन २ -३ महिने उशिरा म्हणजे डिसेंबर जानेवारीमध्ये लागवड केल्यास भरपूर नफा मिळतो.
केळीच्या 86 टक्केहून अधिक उपयोग खाण्याकरीता होतो. पिकलेली केळी उत्तम पौष्टिक खाद्य असून केळफूले, कच्ची फळे व खोडाचा गाभा भाजीकरिता वापरतात. फळापासून टिकावू पूड, मुराब्बा, टॉफी, जेली इत्यादी पदार्थ बनवितात. वाळलेल्या पानाचा उपयोग आच्छादनासाठी करतात. केळीच्या खोडाची व कंदाचे तुकडे करुन ते जनावरांचा चारा म्हणून उपयोगात आणतात. केळीच्या झाडाचा धार्मिक कार्यात मंगलचिन्ह म्हणून उपयोग केला जातो. सर्वसामान्यांना परवडणारे आणि वर्षभर उपलब्ध होणार्या या केळीचा उत्पादनाच्या बाबतीत जगात भारताचा पहिला क्रमांक लागतो. केळीमध्ये ए. बी व सी या जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असते. केळ हे गुरू, स्निग्ध, मधूर, कषाय (तुरट) व शीत गुणांचे असून वातपित्तशामक व कपवर्धक आहे. कृमीमुळे पाठीवर, छातीवर पांढरे डाग येतात त्याला सुरमा म्हणतात. यावर हळद आणि केळीचा गर लावल्यास पांढरे डाग जातात. मुतखड्यामध्ये खडा असल्यास केळीच्या सोपटाचा रस देतात, त्यामुळे मुतखडा पडण्यास मदत होते. खोकल्यामध्ये कफ सुटत नसल्यास केली खाण्यास द्यावी, त्याने कफ सुटतो. रक्त पित्त विकारात केळफुलाची भाजी किंवा पिकलेली केळी खाण्यास द्यावी. प्रमेहामध्ये (मधुमेहात) कमी करण्यासाठी कच्ची केळी वाळवून बनवलेल्या पावडरचा उपयोग होतो. शुक्र दौर्बल्य, स्त्रियांमध्ये अंगावरील जाणे इ. विकारात पिकलेले केळ उपयुक्त औषध ठरते.
Agrojay Towards Farmers Prosperity
जमीन :
भारी कसदार, भुसभुशीत, पाण्याचा चांगला निचरा होणारी, सेंद्रिय पदार्थयुक्त गाळाची सुपीक जमीन केळीस मानवते. केळीची मुळे फार खोलवर जात नसल्याने मध्यम ते कमी खोलीच्या जमिनीत देखील लागवड करता येते. मात्र हे
पीक खादाड असल्याने कमी खोलीच्या जमिनीतूनही चांगले उत्पादन घेण्यासाठी अन्नद्रव्याचा भरपूर पुरवठा करणे गरजेचे असते, त्यासाठी जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर करावा. सेंद्रिय खतामुळे जमिनीत ओलावा धरून ठेवण्याची क्षमता वाढते. खडकाळ किंवा जांभ्या खडकाच्या जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण कमी असल्याने अशा जमिनीत लागवड केली जात नाही किंवा कमी प्रतिच्या मानल्या जातात. खारवट जमिनी केळीला चालत नाहीत. क्षारांचे शेकडा प्रमाण ८.०५ च्या वर गेलेल्या जमिनी केली लागवडीस अयोग्य आहेत. जमिनीतील थोड्या प्रमाणातील चुनखडी केळीला उपयुक्त ठरते. सामू थोडा अल्कलीयुक्त असल्यास चालतो. विभागवार केळीबाबत जमिनीची निवड सांगायचेच झाल्यास जळगाव जिल्ह्यात तापी खोर्यातल्या मध्यम खोलीच्या काळ्या जमिनीत लागवड मोठ्या प्रमाणात करता येते. कोकण भागातील जांभ्या जमिनी केळीसाठी योग्य समजतात. ठाणे जिल्ह्यात समुद्र काठाची रेताड जमीन दख्खनमध्ये आढळणार्या खोल व तळाशी मुरमाड जमिनी मध्यम काळ्या नरम तांबड्या जमिनी तसेच गुजरातच्या खोल परंतु हलक्या गाळाच्या जमिनीत केली यशस्वीरित्या येते.
हवामान :
केळी हे उष्ण कटिबंधातील फळपीक असून त्यास उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. केळीच्या पानांच्या चांगल्या वाढीसाठी २३ ते २८ डिग्री सेल्सिअस तापमान आणि केळीच्या घडाच्या वाढीला थोडे अधिक २९ ते ३० डिग्री सेल्सिअस तापमान अधिक फायदेशीर ठरते. २९ ते २२ डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमानात लोह सोडून सर्वच अन्नद्रव्याचे ग्रहण करण्याचे प्रमाण कमी होते. अधिक तापमानात केळीच्या मुळ्या बोरॉन हे १० पटीने जास्त ग्रहण करतात. पालाश, सोडियम, चुना, लोह आणि जस्त ३ ते ४ वेळा जास्त ग्रहण करतात. नत्र, स्फुरद, मॅग्नेशियाम, मँगनीज, तांबे जास्त ग्रहण झाले तर थंड हवामान केली तयार होण्याचा कालावधी वाढतो. शिवाय कायम स्वरूपी केळीचे पीक घेतले जाते त्या भागात पिले बाहेर पडणे महत्त्वाचे असते. परंतु त्या ठिकाणी पिले कमी बाहेर पडतात.
जाती :
३०-३५ वर्षापुर्वी केळी दोन आणे डझन होती ती केळी साधारण १५ ते ३० रू. डझन या चढ्या भावाने विकली तरी केळीचे क्षेत्र वाढविण्याच्या मर्यादा आहेत. कारण लागवडीसाठी होणारा भरपूर खर्च, पाण्याची वाढती गरज टिकावूपणामुळे मागणी जरी वाढली तरी उत्पन्न घटत चालले आहे. त्याचप्रमाणे महत्त्वाचे कारण म्हणजे उत्पादक शेतकर्यापासून ते प्रत्यक्ष गिर्हाईकापर्यंत पोहचविताना होणारा दलालीचा अफाट खर्च यामुळे उत्पादक शेतकर्याला भाव कमी मिळतो आणि ग्राहकाला जादा दराने केळी खरेदी करावी लागते. केळीच्या अशा जाती निर्माण व्हाव्यात की जेणेकरून शेतकर्यांना लागवडीचा खर्च कमी येऊन केळीचे अधिक उत्पादन मिळावे.
१) बसराई : बसराई ही जात पनामा विल्ट मुळे होणार्या बंची टॉंप रोगास प्रतिकारक असून बुटकी आहे. मोठ्या आकाराचे घड असतात. कल्पतरू सेंद्रिय खतास चांगला प्रतिसाद देत असून उत्पादनात वाढ होते. हिवाळ्यामध्ये पक्क केळी पिवळ्या रंगाच्या होतात तर उन्हाळ्यामध्ये हिरव्या रंगाचीच राहतात. या जातीच्या केळी लवकर खराब होतात. या जातीच्या फळांना बाक असतो. वेलची सारखी एकदम सलळ येत नाही.
२) श्रीमंती : लांब आकाराची केळी असून महाराष्ट्रामध्ये खानदेश भागातील या केळींचा मोठ्या प्रमाणात मागणी असते. इतर भागातील केळीपेक्षा या भागातील केळी सरस ठरतात. बहुधा तो माती आणि हवामानाचा गुणधर्म असावा.
केळी उच्च दर्जाची,फळ देखणे व व्यवस्थित असते. चवीत फारसा फरक नसतो. मराठवाडा भागामध्ये या जातीच्या केळी चिवट वाटतात. गोडीला कमी असतात. एका झाडाच्या घडास साधारणपणे १० फण्या असतात. एका फणीमध्ये १८ केळी असतात. हिरवी साल गोल असते. फण्यामधील अंतर जास्त असून खालच्या फण्या चांगल्या पोसलेल्या असतात.
३) वेलची : या जातीची केळी एकदम सरळ येतात. आकार लहान असून साल पातळ असते. केळी वजनाला कमी असतात. परंतु भाव चांगला मिळतो. कर्नाटक भागातील या जातीच्या केळींना एप्रिल, मे महिन्यामध्ये जादा आवक असलेल्या केळीस ८००० रू. टनाप्रमाणे दर मिळतो. फळाचा रंग लाल असतो. पावसाळा सुरू झाल्यावर लागवड करतात.
४) सोनकेळी : महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर भागामध्ये या जातीची लागवड दिसून येते. या जातीच्या केळी वेलचीच्या आकारासारख्या येतात.
५) लालकेळी : या जातीस येरा, आरती, चंद्राबाले, चेन कटली, चेन वाझई अशीही नावे आहेत. आकर्षक लाल जांभळट रंगाची फळे अधिक पैसे मिळवून देणारी जात आहे. घडाचा दांडा, पानाचा देठ आणि झाडाचा बुंधा लालसर रंगाचा असतो. झाडे ७ ते ८ फुट उंचीची असतात. घडात ५ ते ८ फण्या असून प्रत्येक फणीत साधारण १२ ते १४ केळी असतात. केळी थोडीशी वक्राकार असून जाड सालीची, गर गोड, नारंगी पिवळसर रंगाचा असतो.
६) ग्रॅन्ड नैन : कॅव्हेन्डीशी या बुटक्या जातीतल्या केळीत ग्रॅन्ड नैनचा समावेश होतो. कॅव्हेन्डीशी या वर्गातील ही सर्वात बुटकी जात. केळीचे प्रचंड उत्पादन व निर्यात करणार्या मध्य व दक्षिण अमेरिकन देशात या जातीने आता प्रवेश केला आहे. बुटकेपपणामुळे ही जात जोमदार वार्याला यशस्वीपणे तोंड देऊ शकते. कॅव्हेन्डीशीच्या इतर जातींपेक्षा ही जात ३० टक्के अधिक उत्पादन देते. या जातीत पिले देण्याचे प्रमाण जास्त आहे. बुटकेपणामुळे पानांचा पसारा २० टक्के कमी असल्यामुळे एकरी जास्त झाडांची संख्या बसवता येते. मात्र ही जात पाण्याची कमतरता व पाणी साचून राहणे या परिस्थितीला तोंड देऊ शकते नाही. कमी तापमानाला इतर ठेंगण्या कॅव्हेन्डीशीपेक्षा ही जात जास्त यशस्वीपणे तोंड देऊ शकते.
महाराष्ट्राबाहेरील केळीच्या जाती :
१) आंध्र- चक्रकेळी, बोंथा, इ.
२) केरळ- कुन्नन, इ.
३) पश्चिम बंगाल- अमृतसागर, जायंट गव्हर्नर, इ.
४) तामिळनाडू- विरूपाक्षी, इ.
केळीच्या संकरित जाती: बोडलमस अल्टाफोर्ट, सी. ओ. १, इ.
Agrojay Towards Farmers Prosperity
लागवड :
या पिकाची लागवड त्याचे खोडापासून निघणारे मुनवे (सकर) लावून केली जाते. मुख्य झाडाच्या वाढीच्या काळात आसपास बरीच मुनवे उगवतात. यात दोन मुख्य प्रकार आहेत.
1) तलवारीच्या पात्याप्रमाणे टोकदार पाने असलेली व दणकट बुंध्याची.
2) रुंद पानाची गोल किरकोळ बुंध्याची.
यापैकी पहिल्या प्रकाराची मुनवे नारळाच्या आकाराची अर्धा ते एक किलो वजनाचे अभिवृध्दी करिता वापरतात.
जमीन लागवडी पूर्वी लोखंडी नांगराने खोलवर नांगरुन कुळव्याच्या पाळया देऊन भूसभुसीत कराव्या. नंतर त्यामध्ये हेक्टरी १०० गाडया चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत घालून मिसळावे. केळीच्या लागवडीचा मोसम हवामानानुसार बदलत असतो. कारण हवामनाचा परिणाम केळीच्या वाढीवर, फळे लागण्यास व तयार होण्यास लागणारा कालावधी या वरच होत असतो. जळगांव जिल्हयात लागवडीचा हंगाम पावसाळयाच्या सुरुवातीस सुरु होतो. यावेळी या भागातील हवामान उबदार व दमट असते. जून जुलै मध्ये लागवड केलेंडर बागेस मृगबाग म्हणतात. सप्टेबर ते जानेवारी पर्यात होणा-या लागवडीस कांदेबाग म्हणतात. जून जूलै पैकी लागवडीपेक्षा फेब्रूवारी मध्ये केलेंडर लागवडीपासून अधिक उत्पन्न मिळते. या लागवडी मुळे केळी १८ महिन्यांऐवजी १५ महिन्यात काढणे योग्य होतात.
लागवड करताना ०.५ बाय ०.५ बाय ०.५ मीटर आकाराचे खडडे खोदून किंवा स-या पाडून लागवड करतात. साधारणपणे केळीची लागवड १.८ बाय १.८ मीटर अंतरावर करतात. जळगाव भागामध्ये दाट अंतर असते. दोन झाडातील अंतर बसराई जाती करिता १.२५ बाय १.२५ किंवा १.५० बाय १.५० मीटर असते.
खत व्यवस्थापन :
सेंद्रीय खते - शेण खत १० किलो प्रति झाड किंवा गांडूळ खत ५ किलो प्रति झाड
जैवकि खते- अझोस्पिरीलम – २५ ग्रॅम प्रति झाड व पी एस बी २५ ग्रॅम प्रति झाड केळी लागवडीच्या वेळी
रासायनिक खते- केळीसाठी प्रति झाडास २०० ग्रॅम नत्र ४० ग्रॅम स्फूरद व २०० ग्रॅम पालाश् देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. जमिनीतून रासायनिक खते देताना त्यांचा कार्यक्षमपणे उपयोग होण्यासाठी खोल बांगडी पध्दतीने किंव कोली घेवून खते द्यावी.
केळीसाठी जमिनीतून रासायनिक खत देण्याचे वेळापत्रक (ग्रॅम प्रति झाड) :
अ.नं. खत मात्रा देण्याची वेळ युरिया सिंगल सुपर फॉस्फेट म्युरेट ऑफ पोटॅश
१ लागवडीनंतर 30 दिवसांचे आंत ८२ २५० ८३
२ लागवडीनंतर 75 दिवसांनी ८२ - -
३ लागवडीनंतर 120 दिवसांनी ८२ - -
४ लागवडीनंतर 165 दिवसांनी ८२ - ८३
५ लागवडीनंतर 210 दिवसांनी ३६ - -
६ लागवडीनंतर 255 दिवसांनी ३६ - ८३
७ लागवडीनंतर 300 दिवसांनी ३६ - ८३
एकूण ४३५ २५० 332
(तक्यात दिलेल्या खत मात्रेत माती परिक्षण अहवालानुसार योग्य ते बदल करावे)
केळीसाठी ठिबक सिंचनातून खत देण्याचे वेळापत्रक :
अ.नं. आठवडे हजार झाडांसाठी खतांची मात्रा (किलो प्रति आठवडा )
युरिया म्युरेट ऑफ पोटॅश
१ १ ते १६ (१६) ६.५ ३.
२ १७ ते २८ (१२) १३ ८.५
३ २९ ते ४० (१२) ५.५ ७
४ ४१ ते ४४ (४) - ५
स्फूरदाची संपूर्ण मात्रा २५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व १० किलो शेणखत केळी लागवडीच्या वेळी जमिनीतून द्यावे.
पाणी व्यवस्थापन :
केळी पिकास एकूण १८०० ते २२०० मि. मि. पाणी लागते. केळीसाठी ठिबक सिंचन अत्यंत उपयुक्त असून, ठिबक सिंचनासाठी सूक्ष्म नलीका पध्दतीपेक्षा (मायक्रोटयुब) ड्रिपर किंवा इनलाईन ड्रीपरचा वापर करणे अधिक योग्य असते. बाष्पीभवनाचा वेग, जमिनीची प्रतवारी वाढीची अवस्था इ. बाबींवर केळीची पाण्याची गरज अवलंबून असते.
केळीसाठी पाण्याची गरज ( लिटर प्रति झाड प्रति दिवस )
महिना पाण्याची गरज महिना पाण्याची गरज
जून ६ आक्टोबर ४-६
जूलै ५ नोव्हेंबर ४
ऑगस्ट ६ डिसेंबर ६
सप्टेबर ८ जानेवारी ८-१०
आक्टोबर १०-१२ फेब्रूवारी १०-१२
नोव्हेंबर १० मार्च १६-१८
डिसेंबर १० एप्रिल १८-२०
जानेवारी १० मे २२
फेब्रूवारी १२ जून १२
मार्च १६-१८ जूलै १४
एप्रिल २०-२२ ऑगस्ट १४-१६
मे २५-२८ सप्टेबर १४-१६
(वरील पाण्याच्या मात्रा मार्गदर्शक असून हवामान जमिनीचा प्रकार व पिकाच्या वाढीच्या अवस्था यानुसार योग्य तो बदल करावा.)
आंतरपिके :
केळीत घ्यावयाच्या मिश्र पिकांची निवड करतांना मुख्य पिकातील अंतर, अन्नद्रव्याचा पुरवठा मशागतीच्या पध्दती पिकांवर पडणारे रोग व किड पाणीपुरवठा वगैरे बाबींचा प्रामुख्याने विचार करणे अगत्याचे ठरते. जळगांव भागातील शेतकरी सुरुवातीला मिश्र पिक घेत नाहीत. परंतु पिक १६ ते १७ महिन्याने झाल्यावर आणि बागेतील ८५ ते ९० टक्के घड कापले गेल्यावर केळीच्या बागेत गहू हरबरा सारखी रब्बी हंगामातील पिके घेतात. अथवा कांद्याचे बियाण्यासाठी कांदे लावतात. कोकण किनारपटटीत नारळ पोफळीच्या बागेत केळीची पिके लावतात.
Agrojay Towards Farmers Prosperity
घडांची काढणी :
लोंगर येण्याचा काळ हा निरनिराळ्या जातीनुसार व लागणीच्या हंगामानुसार वेगवेगळा असतो. काही वेळेस एकाच जातीच्या झाडास लोंगर बाहेर येण्यास कमी जास्त वेळ लागतो. बुटक्या जातींना १२ ते १४ आणि उंच जातींना १४ ते १६ महिन्याचा कालावधी लागतो. लोंगर बाहेर आल्यानंतर ९० ते १४० दिवसात घड तयार होतो. बसराई केळीचे लोंगर ८ ते १२ महिन्यात बाहेर पडतात. लाल वेलची, सफेद वेलची व मुठेळी जातीचे लोंगर बाहेर पडण्यास ९ ते १३ महिन्याचा कालावधी लागतो. घडातील सर्व फण्या बाहेर पडल्यावर त्याच्या टोकाला असलेल्या वांझ फण्या कापून घ्याव्यात हे केळफुल कापल्याने घडातील केळी चांगली पोसून वजन वाढते. घडाचा गर्द हिरवा रंग फिक्कट हिरवा होऊन फळावरील शिरा जाऊन फळांना गोलाई येते. फळावर टिचकी मारल्यावर धातूवर टिचकी मारल्यासारखा आवाज येतो. तेव्हा घड कापणीस आला असे समजावे. चांगल्याप्रकारे तयार झालेला घड काढल्यावर ४ -५ दिवसांनी पिकतो. मात्र लांबच्या बाजारपेठेत माल पाठवायचा असल्यास ७५% पक्क झाल्यावर म्हणजे घड पक्क होण्यासाठी १० ते १५ दिवस वेळ असतानाच काढणी करावी. म्हणजे वाहतुकीच्या काळात घड न पिकता कठीण राहतो. घड काढताना लांब दांडा ठेवून काढावा. म्हणजे वाहतुकीत सोईचे होते. घड काढल्यानंतर मात्र झाड बुंध्यापासून कापून टाकावे. काही भागात खोड ३ -४ महिने तसेच ठेवतात किंवा अर्धे कापतात. त्या मागचा हेतू हाच की, पील बाग ठेवायचा (धरायचा) असल्यास खोडातील अन्नद्रव्ये पिले बागेला मिळावीत. घड डोक्यावरून वाहताना खरचटणार नाहीत याची काळजी घ्यावी. कारण साल खरचटल्याने केळ पिकल्यावर काळे पडते. घड काढल्यानंतर ट्रक वॅगनमध्ये भरण्यापुर्वी ऊन, पावसापासून बचाव होण्यासाठी सावलीत ठेवावेत.भारतामध्ये आंब्यानंतर केळीच्या लागवडीचा दुसरा क्रमांक असून केळीची लागवड बाराही महिने करतात. परंतु बदलत्या मार्केटच अभ्यास करता केळीची लागवड योग्य वेळी केल्यास फायदेशीर ठरते. कारण ऑक्टोबरमध्ये दसर्याच्या सुमारास मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात केळीची आवक झाल्याने भाव घसरतात. दसर्यानंतर केळीचे दर घसरतात ते मार्चपर्यंत कमीच राहतात. एप्रिल, मे, जून महिन्यामध्ये केळीला दर जास्त मिळतो. तेव्हा मंदीचा काळ लक्षात घेऊन २ -३ महिने उशिरा म्हणजे डिसेंबर जानेवारीमध्ये लागवड केल्यास भरपूर नफा मिळतो.
केळीच्या 86 टक्केहून अधिक उपयोग खाण्याकरीता होतो. पिकलेली केळी उत्तम पौष्टिक खाद्य असून केळफूले, कच्ची फळे व खोडाचा गाभा भाजीकरिता वापरतात. फळापासून टिकावू पूड, मुराब्बा, टॉफी, जेली इत्यादी पदार्थ बनवितात. वाळलेल्या पानाचा उपयोग आच्छादनासाठी करतात. केळीच्या खोडाची व कंदाचे तुकडे करुन ते जनावरांचा चारा म्हणून उपयोगात आणतात. केळीच्या झाडाचा धार्मिक कार्यात मंगलचिन्ह म्हणून उपयोग केला जातो. सर्वसामान्यांना परवडणारे आणि वर्षभर उपलब्ध होणार्या या केळीचा उत्पादनाच्या बाबतीत जगात भारताचा पहिला क्रमांक लागतो. केळीमध्ये ए. बी व सी या जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असते. केळ हे गुरू, स्निग्ध, मधूर, कषाय (तुरट) व शीत गुणांचे असून वातपित्तशामक व कपवर्धक आहे. कृमीमुळे पाठीवर, छातीवर पांढरे डाग येतात त्याला सुरमा म्हणतात. यावर हळद आणि केळीचा गर लावल्यास पांढरे डाग जातात. मुतखड्यामध्ये खडा असल्यास केळीच्या सोपटाचा रस देतात, त्यामुळे मुतखडा पडण्यास मदत होते. खोकल्यामध्ये कफ सुटत नसल्यास केली खाण्यास द्यावी, त्याने कफ सुटतो. रक्त पित्त विकारात केळफुलाची भाजी किंवा पिकलेली केळी खाण्यास द्यावी. प्रमेहामध्ये (मधुमेहात) कमी करण्यासाठी कच्ची केळी वाळवून बनवलेल्या पावडरचा उपयोग होतो. शुक्र दौर्बल्य, स्त्रियांमध्ये अंगावरील जाणे इ. विकारात पिकलेले केळ उपयुक्त औषध ठरते.
जमीन :
भारी कसदार, भुसभुशीत, पाण्याचा चांगला निचरा होणारी, सेंद्रिय पदार्थयुक्त गाळाची सुपीक जमीन केळीस मानवते. केळीची मुळे फार खोलवर जात नसल्याने मध्यम ते कमी खोलीच्या जमिनीत देखील लागवड करता येते. मात्र हे
पीक खादाड असल्याने कमी खोलीच्या जमिनीतूनही चांगले उत्पादन घेण्यासाठी अन्नद्रव्याचा भरपूर पुरवठा करणे गरजेचे असते, त्यासाठी जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर करावा. सेंद्रिय खतामुळे जमिनीत ओलावा धरून ठेवण्याची क्षमता वाढते. खडकाळ किंवा जांभ्या खडकाच्या जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण कमी असल्याने अशा जमिनीत लागवड केली जात नाही किंवा कमी प्रतिच्या मानल्या जातात. खारवट जमिनी केळीला चालत नाहीत. क्षारांचे शेकडा प्रमाण ८.०५ च्या वर गेलेल्या जमिनी केली लागवडीस अयोग्य आहेत. जमिनीतील थोड्या प्रमाणातील चुनखडी केळीला उपयुक्त ठरते. सामू थोडा अल्कलीयुक्त असल्यास चालतो. विभागवार केळीबाबत जमिनीची निवड सांगायचेच झाल्यास जळगाव जिल्ह्यात तापी खोर्यातल्या मध्यम खोलीच्या काळ्या जमिनीत लागवड मोठ्या प्रमाणात करता येते. कोकण भागातील जांभ्या जमिनी केळीसाठी योग्य समजतात. ठाणे जिल्ह्यात समुद्र काठाची रेताड जमीन दख्खनमध्ये आढळणार्या खोल व तळाशी मुरमाड जमिनी मध्यम काळ्या नरम तांबड्या जमिनी तसेच गुजरातच्या खोल परंतु हलक्या गाळाच्या जमिनीत केली यशस्वीरित्या येते.
हवामान :
केळी हे उष्ण कटिबंधातील फळपीक असून त्यास उष्ण व दमट हवामान चांगले मानवते. केळीच्या पानांच्या चांगल्या वाढीसाठी २३ ते २८ डिग्री सेल्सिअस तापमान आणि केळीच्या घडाच्या वाढीला थोडे अधिक २९ ते ३० डिग्री सेल्सिअस तापमान अधिक फायदेशीर ठरते. २९ ते २२ डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमानात लोह सोडून सर्वच अन्नद्रव्याचे ग्रहण करण्याचे प्रमाण कमी होते. अधिक तापमानात केळीच्या मुळ्या बोरॉन हे १० पटीने जास्त ग्रहण करतात. पालाश, सोडियम, चुना, लोह आणि जस्त ३ ते ४ वेळा जास्त ग्रहण करतात. नत्र, स्फुरद, मॅग्नेशियाम, मँगनीज, तांबे जास्त ग्रहण झाले तर थंड हवामान केली तयार होण्याचा कालावधी वाढतो. शिवाय कायम स्वरूपी केळीचे पीक घेतले जाते त्या भागात पिले बाहेर पडणे महत्त्वाचे असते. परंतु त्या ठिकाणी पिले कमी बाहेर पडतात.
जाती :
३०-३५ वर्षापुर्वी केळी दोन आणे डझन होती ती केळी साधारण १५ ते ३० रू. डझन या चढ्या भावाने विकली तरी केळीचे क्षेत्र वाढविण्याच्या मर्यादा आहेत. कारण लागवडीसाठी होणारा भरपूर खर्च, पाण्याची वाढती गरज टिकावूपणामुळे मागणी जरी वाढली तरी उत्पन्न घटत चालले आहे. त्याचप्रमाणे महत्त्वाचे कारण म्हणजे उत्पादक शेतकर्यापासून ते प्रत्यक्ष गिर्हाईकापर्यंत पोहचविताना होणारा दलालीचा अफाट खर्च यामुळे उत्पादक शेतकर्याला भाव कमी मिळतो आणि ग्राहकाला जादा दराने केळी खरेदी करावी लागते. केळीच्या अशा जाती निर्माण व्हाव्यात की जेणेकरून शेतकर्यांना लागवडीचा खर्च कमी येऊन केळीचे अधिक उत्पादन मिळावे.
१) बसराई : बसराई ही जात पनामा विल्ट मुळे होणार्या बंची टॉंप रोगास प्रतिकारक असून बुटकी आहे. मोठ्या आकाराचे घड असतात. कल्पतरू सेंद्रिय खतास चांगला प्रतिसाद देत असून उत्पादनात वाढ होते. हिवाळ्यामध्ये पक्क केळी पिवळ्या रंगाच्या होतात तर उन्हाळ्यामध्ये हिरव्या रंगाचीच राहतात. या जातीच्या केळी लवकर खराब होतात. या जातीच्या फळांना बाक असतो. वेलची सारखी एकदम सलळ येत नाही.
२) श्रीमंती : लांब आकाराची केळी असून महाराष्ट्रामध्ये खानदेश भागातील या केळींचा मोठ्या प्रमाणात मागणी असते. इतर भागातील केळीपेक्षा या भागातील केळी सरस ठरतात. बहुधा तो माती आणि हवामानाचा गुणधर्म असावा.
केळी उच्च दर्जाची,फळ देखणे व व्यवस्थित असते. चवीत फारसा फरक नसतो. मराठवाडा भागामध्ये या जातीच्या केळी चिवट वाटतात. गोडीला कमी असतात. एका झाडाच्या घडास साधारणपणे १० फण्या असतात. एका फणीमध्ये १८ केळी असतात. हिरवी साल गोल असते. फण्यामधील अंतर जास्त असून खालच्या फण्या चांगल्या पोसलेल्या असतात.
३) वेलची : या जातीची केळी एकदम सरळ येतात. आकार लहान असून साल पातळ असते. केळी वजनाला कमी असतात. परंतु भाव चांगला मिळतो. कर्नाटक भागातील या जातीच्या केळींना एप्रिल, मे महिन्यामध्ये जादा आवक असलेल्या केळीस ८००० रू. टनाप्रमाणे दर मिळतो. फळाचा रंग लाल असतो. पावसाळा सुरू झाल्यावर लागवड करतात.
४) सोनकेळी : महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर भागामध्ये या जातीची लागवड दिसून येते. या जातीच्या केळी वेलचीच्या आकारासारख्या येतात.
५) लालकेळी : या जातीस येरा, आरती, चंद्राबाले, चेन कटली, चेन वाझई अशीही नावे आहेत. आकर्षक लाल जांभळट रंगाची फळे अधिक पैसे मिळवून देणारी जात आहे. घडाचा दांडा, पानाचा देठ आणि झाडाचा बुंधा लालसर रंगाचा असतो. झाडे ७ ते ८ फुट उंचीची असतात. घडात ५ ते ८ फण्या असून प्रत्येक फणीत साधारण १२ ते १४ केळी असतात. केळी थोडीशी वक्राकार असून जाड सालीची, गर गोड, नारंगी पिवळसर रंगाचा असतो.
६) ग्रॅन्ड नैन : कॅव्हेन्डीशी या बुटक्या जातीतल्या केळीत ग्रॅन्ड नैनचा समावेश होतो. कॅव्हेन्डीशी या वर्गातील ही सर्वात बुटकी जात. केळीचे प्रचंड उत्पादन व निर्यात करणार्या मध्य व दक्षिण अमेरिकन देशात या जातीने आता प्रवेश केला आहे. बुटकेपपणामुळे ही जात जोमदार वार्याला यशस्वीपणे तोंड देऊ शकते. कॅव्हेन्डीशीच्या इतर जातींपेक्षा ही जात ३० टक्के अधिक उत्पादन देते. या जातीत पिले देण्याचे प्रमाण जास्त आहे. बुटकेपणामुळे पानांचा पसारा २० टक्के कमी असल्यामुळे एकरी जास्त झाडांची संख्या बसवता येते. मात्र ही जात पाण्याची कमतरता व पाणी साचून राहणे या परिस्थितीला तोंड देऊ शकते नाही. कमी तापमानाला इतर ठेंगण्या कॅव्हेन्डीशीपेक्षा ही जात जास्त यशस्वीपणे तोंड देऊ शकते.
महाराष्ट्राबाहेरील केळीच्या जाती :
१) आंध्र- चक्रकेळी, बोंथा, इ.
२) केरळ- कुन्नन, इ.
३) पश्चिम बंगाल- अमृतसागर, जायंट गव्हर्नर, इ.
४) तामिळनाडू- विरूपाक्षी, इ.
केळीच्या संकरित जाती: बोडलमस अल्टाफोर्ट, सी. ओ. १, इ.
लागवड :
या पिकाची लागवड त्याचे खोडापासून निघणारे मुनवे (सकर) लावून केली जाते. मुख्य झाडाच्या वाढीच्या काळात आसपास बरीच मुनवे उगवतात. यात दोन मुख्य प्रकार आहेत.
1) तलवारीच्या पात्याप्रमाणे टोकदार पाने असलेली व दणकट बुंध्याची.
2) रुंद पानाची गोल किरकोळ बुंध्याची.
यापैकी पहिल्या प्रकाराची मुनवे नारळाच्या आकाराची अर्धा ते एक किलो वजनाचे अभिवृध्दी करिता वापरतात.
जमीन लागवडी पूर्वी लोखंडी नांगराने खोलवर नांगरुन कुळव्याच्या पाळया देऊन भूसभुसीत कराव्या. नंतर त्यामध्ये हेक्टरी १०० गाडया चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत घालून मिसळावे. केळीच्या लागवडीचा मोसम हवामानानुसार बदलत असतो. कारण हवामनाचा परिणाम केळीच्या वाढीवर, फळे लागण्यास व तयार होण्यास लागणारा कालावधी या वरच होत असतो. जळगांव जिल्हयात लागवडीचा हंगाम पावसाळयाच्या सुरुवातीस सुरु होतो. यावेळी या भागातील हवामान उबदार व दमट असते. जून जुलै मध्ये लागवड केलेंडर बागेस मृगबाग म्हणतात. सप्टेबर ते जानेवारी पर्यात होणा-या लागवडीस कांदेबाग म्हणतात. जून जूलै पैकी लागवडीपेक्षा फेब्रूवारी मध्ये केलेंडर लागवडीपासून अधिक उत्पन्न मिळते. या लागवडी मुळे केळी १८ महिन्यांऐवजी १५ महिन्यात काढणे योग्य होतात.
लागवड करताना ०.५ बाय ०.५ बाय ०.५ मीटर आकाराचे खडडे खोदून किंवा स-या पाडून लागवड करतात. साधारणपणे केळीची लागवड १.८ बाय १.८ मीटर अंतरावर करतात. जळगाव भागामध्ये दाट अंतर असते. दोन झाडातील अंतर बसराई जाती करिता १.२५
बाय १.२५ किंवा १.५० बाय १.५० मीटर असते.
खत व्यवस्थापन :
सेंद्रीय खते - शेण खत १० किलो प्रति झाड किंवा गांडूळ खत ५ किलो प्रति झाड
जैवकि खते- अझोस्पिरीलम – २५ ग्रॅम प्रति झाड व पी एस बी २५ ग्रॅम प्रति झाड केळी लागवडीच्या वेळी
रासायनिक खते- केळीसाठी प्रति झाडास २०० ग्रॅम नत्र ४० ग्रॅम स्फूरद व २०० ग्रॅम पालाश् देण्याची शिफारस करण्यात आलेली आहे. जमिनीतून रासायनिक खते देताना त्यांचा कार्यक्षमपणे उपयोग होण्यासाठी खोल बांगडी पध्दतीने किंव कोली घेवून खते द्यावी.
केळीसाठी जमिनीतून रासायनिक खत देण्याचे वेळापत्रक (ग्रॅम प्रति झाड) :
अ.नं. खत मात्रा देण्याची वेळ युरिया सिंगल सुपर फॉस्फेट म्युरेट ऑफ पोटॅश
१ लागवडीनंतर 30 दिवसांचे आंत ८२ २५० ८३
२ लागवडीनंतर 75 दिवसांनी ८२ - -
३ लागवडीनंतर 120 दिवसांनी ८२ - -
४ लागवडीनंतर 165 दिवसांनी ८२ - ८३
५ लागवडीनंतर 210 दिवसांनी ३६ - -
६ लागवडीनंतर 255 दिवसांनी ३६ - ८३
७ लागवडीनंतर 300 दिवसांनी ३६ - ८३
एकूण ४३५ २५० 332
(तक्यात दिलेल्या खत मात्रेत माती परिक्षण अहवालानुसार योग्य ते बदल करावे)
Agrojay Towards Farmers Prosperity
केळीसाठी ठिबक सिंचनातून खत देण्याचे वेळापत्रक :
अ.नं. आठवडे हजार झाडांसाठी खतांची मात्रा (किलो प्रति आठवडा )
युरिया म्युरेट ऑफ पोटॅश
१ १ ते १६ (१६) ६.५ ३.
२ १७ ते २८ (१२) १३ ८.५
३ २९ ते ४० (१२) ५.५ ७
४ ४१ ते ४४ (४) - ५
स्फूरदाची संपूर्ण मात्रा २५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व १० किलो शेणखत केळी लागवडीच्या वेळी जमिनीतून द्यावे.
पाणी व्यवस्थापन :
केळी पिकास एकूण १८०० ते २२०० मि. मि. पाणी लागते. केळीसाठी ठिबक सिंचन अत्यंत उपयुक्त असून, ठिबक सिंचनासाठी सूक्ष्म नलीका पध्दतीपेक्षा (मायक्रोटयुब) ड्रिपर किंवा इनलाईन ड्रीपरचा वापर करणे अधिक योग्य असते. बाष्पीभवनाचा वेग, जमिनीची प्रतवारी वाढीची अवस्था इ. बाबींवर केळीची पाण्याची गरज अवलंबून असते.
केळीसाठी पाण्याची गरज ( लिटर प्रति झाड प्रति दिवस )
महिना पाण्याची गरज महिना पाण्याची गरज
जून ६ आक्टोबर ४-६
जूलै ५ नोव्हेंबर ४
ऑगस्ट ६ डिसेंबर ६
सप्टेबर ८ जानेवारी ८-१०
आक्टोबर १०-१२ फेब्रूवारी १०-१२
नोव्हेंबर १० मार्च १६-१८
डिसेंबर १० एप्रिल १८-२०
जानेवारी १० मे २२
फेब्रूवारी १२ जून १२
मार्च १६-१८ जूलै १४
एप्रिल २०-२२ ऑगस्ट १४-१६
मे २५-२८ सप्टेबर १४-१६
(वरील पाण्याच्या मात्रा मार्गदर्शक असून हवामान जमिनीचा प्रकार व पिकाच्या वाढीच्या अवस्था यानुसार योग्य तो बदल करावा.)
आंतरपिके :
केळीत घ्यावयाच्या मिश्र पिकांची निवड करतांना मुख्य पिकातील अंतर, अन्नद्रव्याचा पुरवठा मशागतीच्या पध्दती पिकांवर पडणारे रोग व किड पाणीपुरवठा वगैरे बाबींचा प्रामुख्याने विचार करणे अगत्याचे ठरते. जळगांव भागातील शेतकरी सुरुवातीला मिश्र पिक घेत नाहीत. परंतु पिक १६ ते १७ महिन्याने झाल्यावर आणि बागेतील ८५ ते ९० टक्के घड कापले गेल्यावर केळीच्या बागेत गहू हरबरा सारखी रब्बी हंगामातील पिके घेतात. अथवा कांद्याचे बियाण्यासाठी कांदे लावतात. कोकण किनारपटटीत नारळ पोफळीच्या बागेत केळीची पिके लावतात.
घडांची काढणी :
लोंगर येण्याचा काळ हा निरनिराळ्या जातीनुसार व लागणीच्या हंगामानुसार वेगवेगळा असतो. काही वेळेस एकाच जातीच्या झाडास लोंगर बाहेर येण्यास कमी जास्त वेळ लागतो. बुटक्या जातींना १२ ते १४ आणि उंच जातींना १४ ते १६ महिन्याचा कालावधी लागतो. लोंगर बाहेर आल्यानंतर ९० ते १४० दिवसात घड तयार होतो. बसराई केळीचे लोंगर ८ ते १२ महिन्यात बाहेर पडतात. लाल वेलची, सफेद वेलची व मुठेळी जातीचे लोंगर बाहेर पडण्यास ९ ते १३ महिन्याचा कालावधी लागतो. घडातील सर्व फण्या बाहेर पडल्यावर त्याच्या टोकाला असलेल्या वांझ फण्या कापून घ्याव्यात हे केळफुल कापल्याने घडातील केळी चांगली पोसून वजन वाढते. घडाचा गर्द हिरवा रंग फिक्कट हिरवा होऊन फळावरील शिरा जाऊन फळांना गोलाई येते. फळावर टिचकी मारल्यावर धातूवर टिचकी मारल्यासारखा आवाज येतो. तेव्हा घड कापणीस आला असे समजावे. चांगल्याप्रकारे तयार झालेला घड काढल्यावर ४ -५ दिवसांनी पिकतो. मात्र लांबच्या बाजारपेठेत माल पाठवायचा असल्यास ७५% पक्क झाल्यावर म्हणजे घड पक्क होण्यासाठी १० ते १५ दिवस वेळ असतानाच काढणी करावी. म्हणजे वाहतुकीच्या काळात घड न पिकता कठीण राहतो. घड काढताना लांब दांडा ठेवून काढावा. म्हणजे वाहतुकीत सोईचे होते. घड काढल्यानंतर मात्र झाड बुंध्यापासून कापून टाकावे. काही भागात खोड ३ -४ महिने तसेच ठेवतात किंवा अर्धे कापतात. त्या मागचा हेतू हाच की, पील बाग ठेवायचा (धरायचा) असल्यास खोडातील अन्नद्रव्ये पिले बागेला मिळावीत. घड डोक्यावरून वाहताना खरचटणार नाहीत याची काळजी घ्यावी. कारण साल खरचटल्याने केळ पिकल्यावर काळे पडते. घड काढल्यानंतर ट्रक वॅगनमध्ये भरण्यापुर्वी ऊन, पावसापासून बचाव होण्यासाठी सावलीत ठेवावेत.
See Below for More Information
Agrojay Towards Farmers Prosperity
(Download Agrojay Mobile Application :- http://bit.ly/Agrojay)
Comments
Post a Comment