ढेमसे लागवड

ढेमसे लागवड 

(Download Agrojay Mobile Application :- http://bit.ly/Agrojay)

ढेमसे लागवड 
एका ठिकाणी दोन बिया टोकून 2 फुट अंतर ठेवावे.
एकरी पिकास 200 किलो निंबोळीपेंड, 2 ट्रेलर शेणखत, 2 किलो पीएसबी, 2किलो ट्रायकोडर्मा, 1.5 (दिड) पोते युरीया,2 पोते सुपर फॉस्फेट, 25 किलो पोटॅश देणे.
युरीया खत 2 ते 3 हप्त्यांत मुळापासून थोडे अंतर ठेवून द्यावे.
त्याशिवाय झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, मॅग्नीज सल्फेट, एकरी 3 ते 4 किलो प्रत्येकी देणे.
तसेच दोन किलो अँझोटोबॅक्टर देणे.
जमीन
हलकी ते मध्यम आणि उत्तम निचऱ्याची जमीन लागते.
हलक्‍या जमिनीत हे पीक लवकर तयार होते.
या पिकास उष्ण हवामान मानवते. कमी तापमान आणि जास्त आर्द्रता असल्यास पिकाची वाढ चांगली होत नाही.
रोग व किडींचे प्रमाण वाढते.
भरपूर सूर्यप्रकाश या पिकाला चांगला मानवतो.

 ढेमशाची लागवड
 १)पावसाळ्यात-जून-जुलै
 २)उन्हाळ्यात जानेवारी-फेब्रुवारी
 ३) पावसाच्या भागात हिवाळ्याच्या सुरवातीला सप्टेंबर-ऑक्‍टोबर
या पिकास उष्ण हवामान चांगले मानवते, त्यामुळे ढेमशाचे पीक प्रामुख्याने जानेवारी- फेब्रुवारी या महिन्यात घेतात.
जाती
 अर्का टिण्डा, टिण्डा एस - 48 ,महिको.
 सफेद हिरवा टिण्डा व गर्द हिरवा टिण्डा 
बियाणे 
  • एक हेक्‍टर लागवडीसाठी ढेमशाचे 3 ते 4 किलो बियाणे लागते.
  • बियांचे कवच जाड असते, त्यामुळे बियाण्याला बीजप्रक्रिया करावी.
  • बियांची चांगली उगवण होण्यासाठी बिया 24 ते 48 तास ओल्या फडक्‍यात बांधून ठेवाव्यात.
  • लागवडीपूर्वी बिया 2 ग्रॅम बाविस्टीन प्रति लिटर पाण्यात मिसळून या द्रावणात बुडवून घ्याव्यात. ढेमशाची लागवड पट्टा पद्धतीने किंवा आळे पद्धतीने करतात.
  • आळे पद्धतीने पिकाला जास्त पाणी द्यावे लागते आणि तणांची वाढही जास्त होते.
  • लागवड करताना दोन ओळींत 90 सें. मी. आणि दोन वेलींत 60 सें. मी. अंतर ठेवून करावी. एका ठिकाणी 2-3 बिया खुरप्याच्या साहाय्याने टोकून मातीने झाकून हाताने दाबून घ्याव्यात.
शेणखत
ढेमशाच्या पिकासाठी हेक्‍टरी 25 टन शेणखत जमीन मशागतीच्या वेळीच जमिनीत चांगले मिसळून घ्यावे.
रासायनिक खता
रासायनिक खतामध्ये 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश माती परिक्षणानुसार द्यावे.
संपूर्ण स्फुरद आणि पालाश आणि अर्धा नत्र लागवड करताना द्यावा आणि उरलेली अर्धी नत्राची मात्रा लागवडीनंतर 30 दिवसांनी वेलीभोवती बांगडी पद्धतीने द्यावी.
पाणी व्यवस्थापन 
 पिकास हलके पाणी द्यावे. लागवडीपूर्वी सऱ्या/आळी ओलावून घ्याव्यात आणि नंतर वापशावर लागवड करून हलके पाणी द्यावे.
 खरिपामध्ये पावसाचा अंदाज घेऊन 10 ते 12 दिवसांच्या अंतराने, तर उन्हाळ्यात 5 ते 7 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
 जमिनीचा मगदूर, पिकाची वाढ व हवामान यांचा विचार करून पिकास पाणी द्यावे.
वेलवर्गीय पीक असल्याने वेलींना वळण देणे
  • वेली सरीच्या काठावर लावलेल्या असल्यामुळे पाण्यात वाढणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
  • वेली दोन पाटांमधील मोकळ्या जागेत पसराव्यात.
  • लागवडीपासून 30 दिवसांनंतर वेली झपाट्याने वाढतात.
  • अशा वेळी वळण देणे आवश्‍यक असते.
  • फुले व कोवळी फळे यांचा पाण्याशी संपर्क येऊ देऊ नये.
बी उगवून आल्यावर 
  •  विरळणी करावी.
  •  एका जागी फक्त दोन जोमदार रोपे ठेवावीत.
  •  पाट-सऱ्या तणरहित ठेवाव्यात.
  •  2-3 वेळा खुरपणी करावी.
  •  पीक आंतरपीक म्हणून नवीन फळबागेमध्ये पण घेता येते.
  •  या पिकामध्ये नर आणि मादी फुले एकाच वेलीवर वेगवेगळी येतात.
  •  नर फुले अगोदर आणि अधिक संख्येने येतात.
  •  जातीपरत्वे हे प्रमाण 1:2 ते 1:4 पर्यंत असते.
फळांचे उत्पादन वाढविण्यासाठी
  •  वेल दोन पानांवर असताना एन.ए.ए. 100 किंवा
  •  जिब्रेलिक ऍसिड 10-25 किंवा
  •  इथ्रेल 250 पी.पी. एम. किंवा
  •  सायकोसील 500 किंवा एम.एच. 100 किंवा
  •  बोरॉन 3 पी.पी.एम. यांची फवारणी केल्याने आणि
  •  याचीच फवारणी परत आठ दिवसांनी पीक चार पानांवर असताना करावी. 
भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी
  • कॅलिक्‍झीन 5 मि.लि. किंवा
  • कॅरेथेन 10 मि.लि. किंवा
  • बाविस्टीन 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
पानावरील ठिपके या रोगाच्या नियंत्रणासाठी
१)पेरणीपूर्वी बियाणे बाविस्टीनच्या द्रावणात (1 लिटर पाण्यात 1 ग्रॅम) पाच मिनिटे बुडवून नंतर पेरणीसाठी वापरावे.
२)रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास डायथेन एम-45, 20 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
ढेमशाची तोडणी
  •  फळे कोवळी असतानाच करावी.
  •  फळे मोठी झाल्यास टणक आणि तंतुमय होतात.
  •  अशी फळे भाजीसाठी उपयुक्त राहात नाहीत.
  •  फळे काढताना साल नखाने दाबून पाहावी.
  •  फळधारणेपासून साधारणपणे 7 ते 10 दिवसांच्या अंतराने फळे काढावीत.
  •  फळे काढल्यानंतर रोगट व किडकी फळे बाजूला काढून चांगली फळे व्यवस्थित पॅकिंग करून विक्रीसाठी पाठवावीत.
उत्पादन 
हेक्‍टरी सरासरी 15-25 टन उत्पादन मिळते.





See Below for More Information  http://bhushankhairnar1.blogspot.com


(Download Agrojay Mobile Application :- http://bit.ly/Agrojay)

Comments

Popular posts from this blog

Agricultural Innovation in India

Technology in Agriculture: Feeding the Future

India Vs. World Farm Mechanization and Technology