गाजर गवतापासून कंपोस्ट खतनिर्मिती
गाजर गवतापासून कंपोस्ट खतनिर्मिती
(Download Agrojay Mobile Application :- http://bit.ly/Agrojay)
महाराष्ट्रात हे गवत फक्त शेतकर्यांसाठीच नाहीतर मनुष्यप्राणी , पर्यावरण तसेच जैवविविधतेसाठी एक मोठा धोकाच बनत चाला आहे. यासाठी गाजर गवतापासून कंपोस्ट खत कसे तयार करावे त्याचे फायदे व पर्यावरणाची सुरक्षा कशी राखावू या संबंधीची माहिती सदरच्या लेखात दिली आहे.
भारतात गाजर गवत प्रथम 1950 मध्ये आढळून आले. कारण 1950 मध्ये भारतात भीषण दुष्काळ पडला होता व त्यासाठी भारताने अमेरिकेतून गहू आयात केला होता व त्यामधून गाजर गवताचा प्रसार भारतात झाला.
गाजर गवतास कांग्रेस गवत, चटक चांदणी, कडू गवत अशा अनेक नावांनी ओळखले जाते. आज भारतामध्ये हे गवत फक्त शेतकर्यासाठीच नाहीतर मनुष्य प्राणी, पर्यावरण तसेच जैवविविधतेसाठी एक मोठा धोका बनत चालले आहे. गाजर गवताचे शास्त्रीय नाव पार्थेनियम हिस्टेरोफोरस हे आहे. गाजर गवतास आधी फक्त पीडित क्षेत्रातील समस्या मानली जायची, पण आता ते प्रत्येक प्रकारच्या पिकामध्ये, उद्याने, वनांमधील एक भीषण समस्या बनली आहे.
भारतात गाजर गवत प्रथम 1950 मध्ये आढळून आले. कारण 1950 मध्ये भारतात भीषण दुष्काळ पडला होता व त्यासाठी भारताने अमेरिकेतून गहू आयात केला होता व त्यामधून गाजर गवताचा प्रसार भारतात झाला.
गाजर गवतास कांग्रेस गवत, चटक चांदणी, कडू गवत अशा अनेक नावांनी ओळखले जाते. आज भारतामध्ये हे गवत फक्त शेतकर्यासाठीच नाहीतर मनुष्य प्राणी, पर्यावरण तसेच जैवविविधतेसाठी एक मोठा धोका बनत चालले आहे. गाजर गवताचे शास्त्रीय नाव पार्थेनियम हिस्टेरोफोरस हे आहे. गाजर गवतास आधी फक्त पीडित क्षेत्रातील समस्या मानली जायची, पण आता ते प्रत्येक प्रकारच्या पिकामध्ये, उद्याने, वनांमधील एक भीषण समस्या बनली आहे.
- गाजर गवतापासून कंपोस्ट खत बनवा, सोबत दोन लाभ मिळवा :
- गाजर गवतापासून कंपोस्ट खत बनविण्यास शेतकर्यांना भीती का वाटते :
वरील सर्व कारणांमुळे शेतकरी गाजर गवतापासून कंपोस्ट बनवण्यास भीतात, पण जर शास्त्रीय पद्धतीने कंपोस्ट बनवल्यास ते एक सुरक्षित व उपयुक्त कंपोस्ट खत आहे.
- गाजर गवतापासून कंपोस्ट बनविण्याची पद्धत :
- खाली दिलेल्या पद्धतीप्रमाणे गाजर गवतापासून कंपोस्ट बनवले जाऊ शकते. :
1) कंपोस्टचा खड्डा बनविण्यासाठी शेतामध्ये थोडी उंचावरील जागा निवडावी, जेणेकरून तेथे पाणी साचणार नाही.
2) खड्ड्याचा आकार 3 ग 6 ग 10 (खोली ग रूंदी ग लांबी) असावा. तसेच आवश्यकतेनुसार खड्ड्याची लांबी व रुंदी कमी करू शकतो, पण त्याची खोली 3 फुटांपेक्षा कमी नसावी.
3) खड्ड्याच्या आतील बाजूस ठोकून कडक करून घ्यावे. कारण खड्ड्याचा आतील भाग समतल व पक्का असणे गरजेचे आहे. त्यामुळे कंपोस्टमधील पोषक तत्त्वे जमिनीने शोषण घेऊ नयेत.
4) आपल्या शेतामधील, तसेच आसपासचे गाजर गवत मुळासकट उपटून खड्ड्याच्या जवळ एकत्र करावे.
5) खड्ड्याच्या जवळ 75-100 कि.ग्रॅम ओले शेण, 5-10 कि.ग्रॅम युरिया किंवा रॉक फॉस्फेट, चांगली चाळलेली 1-2 क्विंटल माती आणि एक पाण्याची टाकी इ. व्यवस्था करून घ्यावी.
6) नंतर 50 कि.ग्रॅ. गाजर गवताचा थर खड्ड्यामध्ये द्यावे व त्यावर 5 ते 7 कि.ग्रॅ.शेण 20 लीटर पाण्यामध्ये मिसळून गाजर गवताच्या थरावर समप्रमाणात शिंपडावे.
7) त्यावर 500 ग्रॅ. युरिया किंवा 3 कि.ग्रॅ रॉक फॉस्फेटचा शिडकावा करावा. जर कंपोस्ट खताचा वापर सेंद्रिय शेतीसाठी करायचा असेल तर युरियाचा वापर करू नये.
तसेच प्रतिथर 10 ते 12 कि.ग्रॅ. माती टाकावी.
8) उपलब्ध असल्यास ट्रायकोडरमा विरीडी किंवा ट्राईकोडरमा हारजनिया या बुरशीनाशकाचा वापर 50 ग्रॅ. प्रतिथर याप्रमाणे करावा. या बुरशीनाशकाचा वापर केल्यास गाजर गवताच्या मोठ्या झाडांचे अपदान जलद व कंपोस्ट बनण्याची प्रक्रिया जलद होते व कंपोस्ट खतांची प्रत सुधारते. पण याचा वापर उपलब्धतेवर अवलंबून आहे.
9) अशाप्रकारे सर्व बाबींचा मिळून पहिला थर द्यावा.
10) याप्रमाणे एकावर एक असे थर देत जावे की, जोपर्यंत थरांची जाडी खड्ड्यापासून एक फूट वर येत नाही तोपर्यंत खड्डा चांगला दाबून व पायांनी तुडवून भरावा.
11) खड्ड्याचा वरचा थर असा दाबावा की त्याचा आकार डोमसारखा झाला पाहिजे.
12) गाजर गवतास मुळासकट उखडण्यामागील कारण म्हणजे मुळांना लागून येणार्या मातीचा उपयोग कंपोस्ट बनविण्याठी व्हावा, पण जर आपल्याला वाटले की, मुळांना लागून आलेली माती कमी आहे. तर प्रतिथर 10 ते 12 कि.ग्रॅ. माती टाकावी.
13) शेण, माती व भ्ाुसा यांचे मिश्रण तयार करून खड्ड्याचे तोंड चांगल्या प्रकारे बंद करावे.
14) गाजर गवतापासून चांगल्या प्रतीचे कंपोस्ट बनण्यास साधारणत: 5 ते 6 महिन्यांचा कालावधी लागतो.
15) वरील खड्ड्यामध्ये भरण्यासाठी 37 ते 42 क्विंटल गाजर गवत लागेल व त्यापासून 37 ते 45 टक्के कंपोस्ट प्राप्त होते.
- कंपोस्ट खताची चाळण :
- गाजर गवतापासून बनवलेल्या कंपोस्टमधील अन्नद्रव्यांचे प्रमाण :
अन्नद्रव्यांचे प्रमाण (टक्के)
सेंद्रिय खतांचे प्रकार छ च् ज्ञ ब्ं डह
गाजर गवतापासून बनवलेले कंपोस्ट खत
1.05 0.84 1.11 0.90 0.55
गांडुळखत 1.61 0.68 1.31 0.65 0.43
शेणखत 0.30 0.54 0.30 0.59 0.25
- गाजर गवतापासून कंपोस्ट बनवताना खालील गोष्टींची काळजी घ्यावी. :
1. कंपोस्टसाठी खड्डा बनवताना सावलीत, उंच जागेवर, मोकळ्या हवेत व पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी बनवावा.
2. गाजर गवतास कोणत्याही परिस्थितीमध्ये फुले येण्याच्या आधी उपटावे. त्यामुळे गाजर गवतापासून अधिक चांगले कंपोस्ट बनते.
3.कंपोस्ट खड्डा भरल्यानंतर माती, शेण, भ्ाुसा याच्या निमित्ताने चांगल्या प्रकारे बंद करावा. कारण त्यामध्ये हवा जाऊन वरील थरामधील गाजर गवताचे बीज मरणार नाही.
4. आवश्यकतेनुसार एका महिन्याच्या अंतराने पाण्याचा शिडकावा करावा. पाणी टाकण्यासाठी केलेली छिद्रे पुन्हा व्यवस्थित बंद करावीत.
- गाजर गवतापासून बनविलेल्या कंपोस्टपासून होणारे फायदे :
2) कंपोस्ट बनवल्यानंतर गाजर गवतामध्ये आढळणारे विषारी रसायन पार्थेकिनचे पूर्ण पणे विघटन होते.
3) गाजर गवतापासून बनविलेले कंपोस्ट एक संतुलित खत असून त्यामध्ये नत्र, स्फुरद व पालाश यांचे प्रमाण शेणखतापेक्षा जास्त असते. त्याव्यतिरिक्त त्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याचे प्रमाणसुद्धा जास्त असते.
4) सेंद्रिय खत असल्याने याला पर्यावरणमित्र म्हणूनसुद्धा संबोधले जाते.
5) गाजर गवतापासून बनविलेले कंपोस्ट कमी मात्रेमध्ये जमिनीची सुपीकता वाढवते.
6) गाजर गवतापासून सेंद्रिय खत बनविण्यासाठी शेतकरी शेतातील गाजर गवत काढून एक प्रकारे आपल्या पिकांची उत्पादकता वाढवतो व बनविलेले कंपोस्ट शेतात वापरून जमिनीची सुपीकता तसेच विकून पैसेसुद्धा मिळवू शकतो. त्यामुळे फायदाच फायदा होतो.
- वापरायचे प्रमाण :
2) भाजीपाला लागवडीदरम्यान 4 ते 5 टन/हे.
3) गाजर गवतापासून बनवलेल्या कंपोस्ट खतांचा उपयोग अन्य सेंद्रिय खताप्रमाणेच करावा.
श्री. सुनील साबळे, डॉ. उषा डोंगरवार, डॉ. प्रवीण खिरारी,
कृषिविज्ञान केंद्र, साकोली
(Download Agrojay Mobile Application :- http://bit.ly/Agrojay)
See Below for More Information https://www.digitalbaliraja. com
Comments
Post a Comment