मका लागवड
मका लागवड
(Download Agrojay Mobile Application :- http://bit.ly/Agrojay)
मका हे उष्ण, समशीतोष्ण आणि थंड हवामानाशी समरस होणारे पीक आहे; मात्र पीकवाढीच्या कोणत्याही अवस्थेत धुके आल्यास ते या पिकास मानवत नाही या पिकाच्या योग्य वाढीसाठी २५ ते ३० अंश से तापमान चांगले असते ; परंतु जेथे सौम्य तापमान (२० ते २५ अंश से.) आहे अशा ठिकाणी मका वर्षभर घेता येतो. ३५ अंश से. पेक्षा अधिक तापमान असल्यास उत्पादनात घट येते. परागीभवनाच्या वेळी अधिक तापमान आणि कमी आर्द्रता असल्यास त्याचा विपरीत परिणाम परागीभवन व फलधारणेवर होऊन उत्पादनात घट येते. तेव्हा या बाबींचा बारकाव्याने अभ्यास करून मक्याचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी सुधारित पद्धतीचा अवलंब करावा
- जमीन
- पूर्वमशागत
- सुधारित वाण
- पेरणीची योग्य वेळ
- लागवड पद्धत
- बियाण्याचे प्रमाण, बीजप्रक्रिया
- रासायनिक खतमात्रा
- पेरणीनंतर घ्यावयाची काळजी
ब) विरळणी - मका उगवणीनंतर आठ ते दहा दिवसांनी विरळणी करून एका चौफुल्यावर जोमदार एकच रोप ठेवून विरळणी करावी, त्यामुळे पिकाची वाढ चांगली व जोमदार होते. गरज भासल्यास पीक उगवणीनंतर त्वरित नांग्या भराव्यात.
क) पिकात जास्त पाणी किंवा दलदल नसावी - मका पेरणीनंतर सुरवातीच्या २० दिवसांपर्यंतच्या कालावधीत पिकात जास्त पाणी किंवा दलदलीची स्थिती असल्यास कोवळी रोपे पिवळी पडून मरतात. कारण मक्याची रोपावस्था या स्थितीस खूपच संवेदनशील आहे. म्हणून पेरणीनंतरच्या सुरवातीच्या २० दिवसांपर्यंतच्या काळात पिकात पाणी साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
- आंतरमशागत
म्हणून तज्ज्ञांच्या सल्ल्याने तणनाशकांचा वापर करावा. पेरणी संपताच वाफशावर ऍट्राझीन (५० टक्के) तणनाशक एका हेक्टरसाठी दोन किलो या प्रमाणात प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून समप्रमाणात जमिनीवर फवारावे. फवारणी केलेले क्षेत्र तुडवू नये. याशिवाय तणनाशक फवारणीनंतर १५-२० दिवसांपर्यंत आंतरमशागत करू नये. त्यानंतरच्या कालावधीत आवश्यकता वाटल्यास एखादी भांगलण करावी.
- पाणी व्यवस्थापन
- पिकाच्या महत्त्वाच्या अवस्था कालावधी
१) रोपावस्था :- मक्याचे दाणे पक्क होताच त्यामध्ये उगवनशक्ती प्राप्त होते. पक्क झालेल्यादाण्यामध्ये सुप्तावस्था नसल्यामुळे कणीस पावसात सापडल्यास झाडावरच दाण्याची उगवण होते.रोपावस्था काळ अल्प असतो.
२) वृध्दीकाळ :- हा काळ साधारणपणे पीकाचे उगवणीनंतर ३०-४५ दिवसाचा असतो याअवस्थेमध्ये झाडाच्या खालून पाचव्या खड्यापर्यत दुय्यम मुळे निघतात व ती जमिनीत रूजतात.त्यामुळे झाडाला बळकटी येते. या अवस्थेत झाडाची झपाट्याने वाढ होते तसेच पानांची पूर्णपणेनिर्मिती होते. वाणाच्या गुणधर्मानूसार मक्यास साधारणपणे १५-२० पाने येतात ही क्रिया झाडावरतूरा येईपर्यत सुरू राहते.
३) तुरा येण्याचा कालावधी :- उगवणीपासून ४५ ते ६० दिवसापर्यतचा हा काळ आहे. तूरा वरच्याटोकापासून झुपक्यासारखा येतो. यामधून पुंकेसर बाहेर पडण्याची क्रिया साटक्कधारणत: १५दिवसापर्यत सुरू राहते.
४) कणसे उगवण्याचा कालावधी:- मक्याचे वरचे टोकापासून तुरा बाहेर पडल्यानंतर २-३ दिवसातझाडाच्या एकूण पानापैकी मधल्या प्रथम कणीस बाहेर पडण्यास सुरूवात होते. या कणसातून स्त्रीकेसरबाहेर पडतात व या स्त्रीकेसरावर तु-यामधून निघणारे पुंकेसर पडून त्यांचे संयोगीकरण होते व बीजधारणा होते, या कणसावर त्या पाणाचे वरचे पानामधून कणीस बाहेर पडण्यास सुरवात होते. कणीसनिघण्याचा व संयोगीकरणाचा कालावधी साधारणपणे ५० ते ७० दिवस पर्यतचा असतो. बीजधारणाझाल्यावर तर कणसात दाणे भरण्यास सुरूवात होते.
५) दुधाळ अवस्था :- दाणे भरताना प्रथमत: दाणे पक्क न होता हुरडा होण्याचा काळ समजतायेईल. हा काळ साधारणत: ४ ते ५ आठवड्याचा असतो. या काळात झाडाच्या शुष्क भागात सक्रियवाढ ( ८५ टक्कयापर्यत ) होते.
६) दाणे पक्व होण्याचा काळ :- दुधाळ अवस्थेनंतर दाणे पक्क होण्याकरीता १५ ते २० दिवसलागतात. दाणे पक्क होण्याची चिन्हे म्हणजे दाण्याच्या खालच्या भागाला काळा पट्टा, थर तयारहोतो. दाणे पक्क झाल्यानंतर कणसे पिवळी होताच कापणी करता येईल.
- मक्यामध्ये घ्यावयाची आंतरपिके
- मक्यावरील किडी
या किडीचा ओळख, नुकसानीचा प्रकार, जिवनक्रम इत्यादीची माहिती गहू या पिकाखाली दिलेली आहे. या किडीचे नियंत्रन करण्याचे दृष्टीने उपद्रव ग्रस्त क्षेत्रातील कडब्याचे कुटी करणे पिक कापणी नंतर नागरणी करणे, इत्यदी बाबत माहिती ज्वारी या प्रकरणात दिलेली आहे. या पिकाचे जैविक नियंत्रण करण्यासाठी ट्रायकोग्रामा चिलोनिस ह्या मित्रकिडी १.५ लाखप्रतिहेक्टरी याप्रमाणात उगवणीनंतर दोन आठवड्यानी सुरवात करून दर १० दिवसाच्या अंतराने ३ ते ४ वेळा पिकावर सोडावेत. याशिवाय या किडीचा प्रादुर्भाव वाढता असल्यास पिक सुमारे ३० दिवसाचे झाल्यानंतर एन्डोसल्फॉन ४ टक्के दानेदार किंवा कार्बोफ्युरॉन ३ टक्के दाणेदार हेक्टरी १० किलो या प्रमाणात झाडाच्या पोंग्यात टाकावी. किंवा अवश्यकता भासल्यास एन्डोसल्फॉन ३५ टक्के प्रवाही १४ मिली १० लिटर पाण्यात मिसळुन पिकावर फवारणी करावी.
कणसातील अळीः Heliothis zea Boddie (Noctuidae : Lepidoptera)
ह्या किडीचे पंतग मध्यम आकाराचे मळकट पिवळे, करड्या पिंगट रंगाचे असतात. त्यांची लांबी साधारणपणे १९ मि. मी इतकी असते. या किडीची अळी हिरव्या रंगाची असुन जवळपास ३८ ते ५० मि. मि. लांब असते. अंड्यातुन बाहेर आलेल्या अळ्या कणसामध्या जाउन वाढणा-या दाण्यावर उपजिवीका करतात. त्यामपळे उत्पनावर परीणाम होतो.
मादी पतंग कमसाच्या स्त्रिकेशरावर आपली अंडी घालतात. एक मादी सुमारे ३५० अंडी किंवा त्यापेक्षा जास्त अंडी घालु य़शकते. अंड्यातुन ४-५ दिवसात बरूक अळ्या बाहेर येतात. अळीची पुर्ण वाढ कणसामध्ये १५ ते ३५ दिवसात होते. नंतर अळ्या जमिणीत कोषावस्थेत जातात. कोषावस्था साधारणपणे हवामाणानुसार १० तो २५ द्वस टिकते. नंतर त्यातुन पतंग बाहेर येतात.
या किडीचा बंदबस्त करण्यासाटी कणसातुन दोरेबाहेर द्सताच (स्त्रिकेशर) एक किंवा दोन वेळा कार्बारील १०टक्के भुकटीहेक्टरी २० किलो या प्रमाणात कणसावर धुरळावी.

गवती नाकतोडे : Oedaleus sengalensis Krauss, Aliopus simulatrix Walker (Acrididae : Orthoptera)
ही किड अनेक पिकावर आढळुन येते. तसेच घोडे ह्या नावाने सर्वांचे परीचयाचे आहे. मका यापिकावर २-३ प्रकारचे नाकतोडे आढळुन येतात. त्यांचे विविध रंग काहिसा हिरवट व सुकलेल्या गवतासारखा असतो. ह्या किडीची पिल्ले व प्रौढ पिकांची पाणे खाउन नुकसान करतात. टोळांनी केलेले नुकसान लश्करी अळीसारथे वाटटते. सुरवातीला या किडीचे पिल्ले कोवळ्या गवतावर उपजिवीका करतात. त्यामुळे धु-याक़ील पिकावर या किडीचे प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसुन येते.
या किडीटा मादी साधारणपणे २० ते ४० अंडी एका पुमजक्यात घालते. अंडी जमिणीवर घातलेली आढळते. टोळांची पिल्ले अंड्यातुन बाहेर आल्यावर अनेकदा कात टाकतात. आणि सामान्यपणे दोन महिन्यामध्ये प्रौढावस्थेत पोचतात. या किडीचा प्रादुर्भाव दिसुन येताच मिथीलपरॉथीऑन २% भुकटी हेक्टरी २० किलो या प्रमाणात पिकावर धुरळावी.

See Below for More Information http://mr.vikaspedia.in
Comments
Post a Comment