टोमॅटोवरील किडी – रोग

टोमॅटोवरील किडी – रोग Agrojay Innovations Pvt. Ltd. (Download Agrojay Mobile Application: http://bit.ly/Agrojay ) टोमॅटोवरील प्रमुख किडीफुलकिडे (थ्रीप्स टॅबसी, सर्टोथ्रीप्स, डॉरसॉलिस, फ्रॅन्कीनिएला त्सल्झी) : लक्षणे : पिवळसर करड्या रंगाचे पिल्ले व प्रौढ पाने खरचटून त्यातून बाहेर येणारा रस शोषण करतात. त्यामुळे पानांवर पांढरे ठिपके निर्माण होऊन पिकामध्ये विषाणूजन्य "स्पॉटेड विल्ट" या रोगाचा प्रसार होतो. नियंत्रण अ) रोपवाटिकेत बी उगवणीनंतर एन्डोसल्फान ३५ टक्के प्रवाही ११ मि. लि. किंवा मॅलाथीऑन ५० टक्के प्रवाही १० मि. ली. किंवा डायमेथोएट ३० टक्के प्रवाही १० मि. ली. यापैकी कुठल्याही एका किटकनाशकाची १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. ब ) पुनर्लागणीनंतर प्रादुर्भाव दिसताच वरीलपैकी कुठल्याही एका किटकनाशकाची १५ दिवसाच्या अंतराने गरजेनुसार फवारणी करावी. क) एकात्मिक किडव्यवस्थापनांतर्गत पद्धतींचा वापर करावा. पांढरी माशी ( बेमिसीया टॅबॅसी) लक्षणे : पांढरट रंगाचे पिल्ले व प्रौढ पानांतून रस शोषण करतात. त्यामुळे पाने पिवळी पडुन पिकात ‘लिफकर्ल’ या विषाणुजन्य रोगाचा प्रस...