टोमॅटो पिकातील किड व्यवस्थापन

टोमॅटो पिकातील किड व्यवस्थापन Agrojay Innovations Pvt. Ltd. (Download Agrojay Mobile Application: http://bit.ly/Agrojay ) आपल्या देशात किडींमुळे होणारे पिकाचे नुकसान हे साधारणपणे एक हजार कोटी पेक्षा अधिक आहे. हे नुकसान थांबावीन्यासाठी मोठ्या प्रमाणावर कीड नियंत्रण करावयाच्या विविध कीटकनाशकांची माहिती असेल तर योग्य वेळी योग्य प्रमणात कीटनाशकांची फवारणी करून किडींपासून पिकाचे रक्षण करणे शक्य होते. त्यासाठी पिकांवर येणारी किड ओळखता येणे महत्वाचे आहे. म्हणजे योग्य त्या पद्धतीने किडींचा नाश करणे सहज शक्य होते. टोमॅटो हे महाराष्ट्रातील महत्वाचे भाजीपाला पीक आहे. विविध किडींच्या प्रादुर्भावामुळे टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते असते. या किडी कोणत्या आणि त्याचे नियंत्रण कसे करावे, याबाबतीची महिती या लेखात देत आहोत. अ) फळ पोखरणारी अळी टोमॅटो पिकातील ही किड अतिशय उपद्रवी असते या किडींमुळे टोमॅटो पिकाचे ३० टक्यापर्यंत नुकसान होते. ही किड वर्षभर आढळणारी आहे. ही किड टोमॅटो पिकाशिवाय हरभरा पिकात असल्यास तिला घाटे अळी म्हणतात...